Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:21:26.257552 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून
शेअर करा

T3 2019/10/14 06:21:26.263420 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:21:26.322549 GMT+0530

कांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून

कांदा- मुळा- भाजी, अवघी विठाई माझी या पंक्‍ती शेतीत अवतरल्‍या तर ? होय कोपरगाव तालुक्‍यातील जेऊरकुंभारी येथील दिलीप दत्‍तात्रय शिंदे यांनी हे प्रत्‍यक्षात आणून दाखवलंय.

कांदा- मुळा- भाजी, अवघी विठाई माझी या पंक्‍ती शेतीत अवतरल्‍या तर ? होय कोपरगाव तालुक्‍यातील जेऊरकुंभारी येथील दिलीप दत्‍तात्रय शिंदे यांनी हे प्रत्‍यक्षात आणून दाखवलंय. कांदा, गहू, लसूण, चिकू आणि इतर पिकांच्‍या शेतीतून त्‍यांनी वर्षाकाठी लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न मिळविले आहे. राज्‍य शासनाच्‍या कृषी विभागा अंतर्गत सेंद्रिय शेती योजनेसह कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शेतीत केलेली प्रगती कौतुकास्‍पद आहे. राज्‍यातील शेतकऱ्‍यांसाठी शिंदे यांची शेतीतील प्रगती एक दिपस्‍तंभ ठरावा अशीच आहे.

जेऊरकुंभारी हे कोपरगाव तालुक्‍यातील गाव. गावातील बहुतांश कुटुंबाचा शेती हाच मुख्‍य व्‍यवसाय. नगर-मनमाड महामार्गालगत गावचे शिवार आहे. याच गावात दिलीप दत्‍तात्रय शिंदे नाविण्‍यपूर्ण प्रयोगासह शेती करतात. दिलीपराव बी. कॉम. आहेत, मात्र नोकरी न करता त्‍यांनी वडिलोपार्जित 18 एकर शेती कसण्‍याचा निर्णय घेतला. महामार्गानजीक शिंदे यांची शेती आहे. पूर्वी पाणी मुबलक होते, त्‍यावेळी ऊसाची शेती केली जात होती, मात्र कमी पाण्‍यात नियोजन करून शेती करण्‍याचा निर्णय दिलीप यांचे वडील कृषी पदवीधर कै.दत्‍तात्रय शिंदे यांनी घेतला व दोन हेक्‍टर क्षेत्रावर चिकूची लागवड केली.

सेंद्रिय शेतीची चळवळ


सेंद्रिय शेती करण्‍याचा निर्धार केलेल्‍या शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी कृषी विभाग व आत्‍मा यंत्रणेच्‍या मार्गदर्शनाखाली 20 शेतकऱ्‍यांना सोबत घेत गावात साई सेंद्रिय शेती गटाची स्‍थापना केली. सेंद्रिय शेती या विषयावर जेऊरकुंभारीच्‍या गावशिवारात दर शुक्रवारी सेंद्रिय शेती शाळा भरते. गावातील सहभागी प्रत्‍येक शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्‍याचा निर्णय कृतीत उतरविला. गटप्रवर्तक म्‍हणून दिलीपरावांकडे समन्‍वयाची जबाबदारी आहे. प्रत्‍येक शेतकऱ्‍यांकडे आठवड्यातून एक दिवस सेंद्रिय शेती शाळा भरते. शेतीवरच बायोडायनॅमिक कंपोष्‍ट बनविणे, जिवामृत, गांडुळखत, दशपर्णी अर्क, व्‍हर्मीवॉश व बिजामृत तयार करण्‍याबाबत प्रात्‍यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले जाते.

खर्च वाचविण्‍यासाठी प्रयोगशील


जेऊरकुंभारी शिवारात रब्‍बी कांदा लागवड केली जाते, याच पद्धतीने शिंदे कांदा लागवड करत, मात्र रासायनिक खतांचा वापर व फवारणीसह होणारा इतर खर्च वाढत होता व शेतीत होणारा बदल दिसत होता. उत्‍पादन वाढले तरी उत्‍पादन खर्चही वाढत होता, हाच खर्च कमी करण्‍यासाठी दिलीप शिंदे यांचा प्रयत्‍न होता.

शेतकरी व शासन संवादाचा दुवा


कृषी विभागाच्‍या विविध चर्चासत्रासह मार्गदर्शन मेळाव्‍यात सहभाग घेणारे शिंदे यांची शेतकरी मित्र, शेती संघटक म्‍हणून कृषी विभागाने निवड केली आहे, त्‍यामुळे शेतकरी व शासन यांच्‍यामध्‍ये संवाद घडविण्‍याचे महत्त्वाचे काम शिंदे करतात. आपल्‍या शेतीतही नाविण्‍यपूर्ण प्रयोग करावेत, या हेतुने कृषी प्रदर्शने व शेतकरी मेळाव्‍यांच्‍या माध्‍यमातून नवे काही करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न होता, यादरम्‍यान जेऊरकुंभारी गावात कृषी सहायक म्‍हणून निर्मलाताई सोनवणे रूजू झाल्‍या, सेंद्रिय शेतीसंदर्भात त्‍यांचा अभ्‍यास पाहून सेंद्रिय शेती करण्‍याचा निर्णय घेतला. निर्मलाताईंच्‍या मार्गदर्शनाने गावशिवारात सेंद्रिय शेतीचा हा संवाद वाढतोच आहे.

सेंद्रिय कांदा लागवड


सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करण्‍याचा निर्णय घेतल्‍यांनतर शिंदे यांनी शेतीची नांगरणी करून घेतली. बायोडायनॅमिक पद्धतीने बनविलेले कंपोष्‍ट खत टाकले. एकरी दोन डेपो इतके प्रमाण ठेवण्‍यात आले, नंतर शेती सपाट करून व गादी वाफ्यावर रोपे तयार करून कांदा लागवड केली. मजुरांच्‍या मदतीने खुरपणी करून घेतली. तुषार संचाद्वारे सोळा दिवसातून एकदा सहा तास पाणी देण्‍यात आले, फुलकिडीसाठी दशपर्णी अर्क व निमार्कची फवारणी केली. 125 दिवसाच्‍या कालावधीत 5 ते 6 वेळा तुषार संचाने पाणी दिले व इतर कोणताही खर्च केला नाही. कांद्याची 125 दिवसांनी काढणी केली, दरवर्षीच्‍या तुलनेत कांद्याची वाढ चांगली झाली , रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी जाणवला तसेच कांद्याचा रंग गडद झाला. कांद्यासोबतच लसणाचीही लागवड केली, लसणाचा आकार मध्‍यम राहीला मात्र रंग व चवीने लसूण काही औरच होता.

कांद्याची रोपवाटिका


कांद्याची रोपवाटिका तयार करताना त्‍यावर कोणत्‍याही रासायनिक औषधांची फवारणी केली नाही. वाफ्यामध्‍ये पाण्‍याच्‍या सरीने जीवामृत देण्‍यात आले. नंतर खुरपणी केली, त्‍यामुळे चांगल्‍या पद्धतीने रोपांची वाढ झाली असून 45 दिवसांनी रोपे तयार झाली आहेत.

संपूर्ण कुटुंबाचा सहभाग


शेतीत नवनवे प्रयोग करताना संपूर्ण शिंदे परिवाराचा सहभाग असतो. दिलीप शिंदे यांना याकामी आई सुमन, पत्‍नी सुचिता, मुलगी पुजा यांचा सहभाग व मदत महत्त्वाची ठरते. बायोडायनॅमिक डेपो लावणे, दशपर्णीसाठी वनस्‍पती गोळा करणे, जीवामृत तयार करणे व रोपांवर प्रक्रिया करणे यासर्व कामामध्‍ये कुटुंबातील सदस्‍यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.

सेंद्रिय गटाची चळवळ विस्‍तारली


जेऊरकुंभारी गावात कृषी विभागाच्‍या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीची चळवळ विस्‍तारली आहे. शेतकऱ्‍यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षिकाद्वारे पटवून दिल्‍यामुळे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढू लागला. सुरूवातीला 20 शेतकरी सदस्‍य संख्‍या असलेल्‍या गटात आज 50 शेतकऱ्‍यांचा सहभाग आहे. तसेच परंपरागत सेंद्रिय शेती या कृषी विभागाच्‍या योजनेत शेतकऱ्‍यांनी प्रमाणिकरणासाठी नोंदणी केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे उत्‍पन्‍न न घटता प्रत सुधारते.
योग्‍य व्‍यवस्‍थापन केले तर खर्चात मोठी बचत होत असल्‍याचा अनुभव शिंदे सांगतात. आरोग्‍यासाठी उपयुक्‍त अन्‍नासोबतच जमिनीची प्रत टिकविता येते. पाण्‍याचा गरजेएवढाचा वापर व अच्‍छादनामुळे पिकांचे संरक्षण होते. बाजारपेठ उपलब्‍धीसोबतच शेतकरी गटाद्वारे इंटरनेटवर नोंदणी करून शेतीवरच विक्री करण्‍याचा शिंदे यांचा प्रयत्‍न आहे. शेतीसोबतच पशुपालन, गावरान कोंबडीपालन यावरही भर दिला, त्‍यातून चांगले आर्थिक उत्‍पन्‍न मिळते आहे. उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खटकाळे, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी सुनिल गावीत, कृषी सहायक निर्मला सोनवणे यांच्‍यासह आत्‍माचे तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक प्रकाश आहेर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

नवे प्रयोग


चारसुत्री पद्धतीने गहू लागवडीचा यशस्‍वी प्रयोग शिंदे यांनी केला. गव्‍हाच्‍या जोड ओळीतील अंतर 6 व मधील अंतर 12 इंच अशा पद्धतीने गव्‍हाची पेरणी केली. यामध्‍ये गव्‍हाचे एकरी 22 क्विंटल उत्‍पादन मिळाले.
ऊसामध्‍ये पट्टा पद्धतीचा अवलंब केला असून ऊसाची लागवड साडेचार फुटावर केली, त्‍यात ठिंबकचा वापर केला.
ऊसामध्‍ये आंतरपीक म्‍हणून कांदा तसेच ताग लागवड केली. ताग फुलोऱ्‍यात आल्‍यावर ऊसामध्‍ये गाडले.
ऊसाची तोडणी झाल्‍यानंतर खोडवा राखताना पाचट न जाळता पाचटाची कुट्टी केली जाते.
सेंद्रिय शेतीमुळे रासायनिक खते, औषधे यावर होणाऱ्‍या खर्चात बचत झाली आहे. शेतीसाठी लागणारी अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध झाल्‍याने आरोग्‍य, पाणी आणि जमीन निरोगी राहण्‍यास मदत होईल.
शेतीत पेरणी करताना बिजप्रक्रिया केली जाते.

चिकूचा गोडवा


वीस वर्षापूर्वी चिकू लागवड केली असून चिकुची बाग बहारात आली आहे. जिवामृत, गांडुळखत तसेच शेणखत देण्‍यात येते. चिकुच्‍या बागेतील वर्षाची रक्‍कम घेत एका व्‍यापाऱ्‍याला देण्‍यात आली आहे.

शिंदे यांच्‍या शेतीचे अर्थकारण

शिंदे यांच्‍याकडे एकूण 18 एकर शेती आहे. यात चिकू 4 एकर 20 गुंठे आहे. चिकूची साडेचार एकराची बाग एका व्‍यापाऱ्‍याला दोन लाख 60 हजार रूपयांना देण्‍यात आली आहे. दरवर्षी यामध्‍ये वीस हजार रूपयांची वाढ करण्‍यात येते. ऊस दिड एकर असून यामध्‍ये एकरी 60 टनापर्यंत तर दिड एकरातून 90 टनापर्यंत उत्‍पादन होते, खर्च वजा जाता दिड लाख रूपयापर्यंत नफा मिळतो. कांदा लागवड दोन एकर 20 गुंठे आहे, यात खर्च कमी करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे शिंदे सांगतात. एकरी 150 क्विंटल कांद्याचे उत्‍पादन त्‍यांनी घेतले आहे. गव्‍हाचे एकरी 22 क्विंटल उत्‍पादन झाले असून खर्च वजा जाता 20 हजार रूपये निव्‍वळ नफा राहतो. यासोबतच सोयाबीन, हरभरा व लसूण पिकांचेही उत्‍पादन घेतले जाते. वर्षाकाठी शेतीत पाच ते सहा लाख रूपयांची उलाढाल होत असल्‍याचे शिंदे सांगतात. सेंद्रिय शेतीमुळे उत्‍पादन वाढ झाली नसली तरी खर्चात बचत करण्‍यात यश आले असून तोच आपला नफा असल्‍याचेही शिंदे सांगतात.

लेखक - गणेश फुंदे
माहिती सहाय्यक, उप माहिती कार्यालय, शिर्डी
स्त्रोत - महान्युज

 

3.28571428571
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:21:27.010947 GMT+0530

T24 2019/10/14 06:21:27.017295 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:21:26.074591 GMT+0530

T612019/10/14 06:21:26.093912 GMT+0530

T622019/10/14 06:21:26.246323 GMT+0530

T632019/10/14 06:21:26.247293 GMT+0530