Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:16:53.655902 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक
शेअर करा

T3 2019/10/17 06:16:53.661488 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:16:53.691247 GMT+0530

कृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक

भंडारा जिल्ह्यातील साकोली कृषी विज्ञान केंद्रातील औजारे बँक माहिती.

पारंपरिक भात रोवणी सोबतच आधुनिक व यंत्रांच्या साहाय्याने भात रोवणीकडे तसेच शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मनुष्यबळाची उणीव, पेरणीसाठी लागणारा वेळ आणि वाढती मजूरी पाहता यांत्रिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिला जात आहे. हे लक्षात घेऊन भंडारा जिल्ह्यातील साकोली कृषी विज्ञान केंद्रात धान शेतीस आवश्यक अवजारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दसरा मैदान भंडारा येथे नुकत्याच आयोजित वैनगंगा कृषी महोत्सवात या औजार बँकेविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये बहुपयोगी राईस ग्रेन प्लांटरने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

प्रामुख्याने भात पीक नर्सरी करुन रोवणी पद्धतीने आणि रोवणी यंत्राच्या साहाय्याने घेतले जाते. कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध राईस ग्रेन प्लांटर हे यंत्र या परिसरातील जमिनीसाठी उपयुक्त असेच आहे. 11 जाती असलेल्या या यंत्राद्वारे धान आणि खत एकाच वेळी टाकता येत असल्याने तसेच एका तासात एक एकर रोवणी करण्याची क्षमता या यंत्रात असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.

राईस ग्रेन प्लांटरने रोवणी केलेल्या शेतात 12 ते 14 क्विंटल प्रती एकर धान पीक झाले आहे. हे यंत्र केवळ धानासाठीच नसून याद्वारे गहू, तीळ, जवस, लाखोरी व चना यांची सुद्धा पेरणी करता येते. साकोलीच्या कृ‍षी विज्ञान केंद्रात 22 रोवणी यंत्र व 2 राईस ग्रेन प्लांटर उपलब्ध आहेत. या बहुपयोगी यंत्रामुळे शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी कमी खर्च येणार आहेच एवढेच नव्हे तर, हे यंत्र खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर सुद्धा ते उपलब्ध आहे. कृषी महोत्सवात या विषयी विस्तृत माहिती देण्यात आली.

रोटाव्हेटर, बीबीएफ प्लांटर, सीड ड्रील, राईस ग्रेन प्लांटर, सीड कम फर्टिलायझर ड्रील, धान रोवणी यंत्र, पॅडल थ्रेसर, रेन गन, उस लागवड, यंत्र, धान कापणी यंत्र, पॉवर विडर, कानोविडर, ड्रम सिडर, युरिया डिएपी बिक्रेट ॲप्लीकेटर या औजारांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके व प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना वापरण्यास प्रोत्साहित करुन जागरुकता निर्माण केली जाते. या भागात कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग घेण्यास सुरूवात केल्यापासून मोठे क्षेत्र पेरीव धान सीड कम फर्टीलायजर सीड ड्रिलने केले जाते. यामुळे हेक्टरी 9 ते 10 हजारापर्यंतच्या खर्चात बचत होत असल्याने शेतकरी स्वत: या मशीन खरेदी करून वापरत आहेत तसेच भाडेतत्वावर इतरांना देखील उपलब्ध करीत आहेत.

-जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा

माहिती स्रोत: महान्युज

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:16:54.384426 GMT+0530

T24 2019/10/17 06:16:54.391353 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:16:53.487482 GMT+0530

T612019/10/17 06:16:53.507089 GMT+0530

T622019/10/17 06:16:53.645097 GMT+0530

T632019/10/17 06:16:53.646016 GMT+0530