Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 18:24:9.279554 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट
शेअर करा

T3 2019/06/16 18:24:9.285580 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 18:24:9.325686 GMT+0530

कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट

औरंगाबाद महामार्गावरील दुधा गावापासून दक्षिणेस s कि.मी. अंतरावर असलेल्या ढासाळवाडी (ता. जि. बुलडाणा) या गावात कोरडवाहू शेती अभियान राबविण्यापूर्वी ९० टक्के कोरडवाहू क्षेत्र होते.

औरंगाबाद महामार्गावरील दुधा गावापासून दक्षिणेस s कि.मी. अंतरावर असलेल्या ढासाळवाडी (ता. जि. बुलडाणा) या गावात कोरडवाहू शेती अभियान राबविण्यापूर्वी ९० टक्के कोरडवाहू क्षेत्र होते. अनियमित पावसामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये सातत्याने चठ्ठलुतार व्हायचा; मात्र शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याकरिता ढसाळवाडी गावाची कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१३-१४ मध्ये निवड करण्यात आली. त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या सुविधा निर्माण होऊन गावाचा कायापालट झाला आहे.

अभियानाचा उद्देश

 1. कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतक-यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे.
 2. मूलस्थानी जलसंधारणासह साखळी बंधारे, शेततळे माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे.
 3. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे.
 4. यांत्रेिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकxता वाढविणे.
 5. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती, प्राथमिक कृषेि प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे.
 6. कोरडवाहूतंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार ক্লািস্ট্রী,
 7. शेतकरी गटांची स्थापना, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करणे.

समाविष्ट घटक

 1. मनुष्यबळ विकास (कर्मचारी, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी संघट्न, अभ्यास दौरे).

 2. संरक्षित सिंचन सुविधा (शेततळे, पीव्हीसी पाईप पुरवठा, विद्युत/ डिझेल पंपसंच पुरवठा, सूक्ष्म सिंचन).
 3. मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, श्रेशर, कृषेि अवजारे).
 4. कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणांची प्रात्यक्षिके व माती तपासणी.
 5. नियंत्रित शेतीं (शेड़नेट हाउस).
 6. प्राथमिक कृषि प्रक्रिया व पणन (दालमिल, प्रक्रिया संयंत्रे, प्लस्टिक क्रेट्स).

मनुष्यबळ विकास कार्यक्रम

कर्मचारी प्रशिक्षण

प्रत्येक हंगामात ढासाळवाडी या गावाचे संबंधित मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र. बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्या अधीक्षक कृषि अधिकारी श्री. विवेक सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. संतोष डाबरे व तालुका कृषि अधिकारी श्री. ए. एस. भामरे तसेच कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. गुप्ता व कार्यक्रम समन्वयक श्री. गिरी यांनी प्रशिक्षण वर्गास तांत्रेिक मार्गदर्शन केले.

शेतकरी गट तयार करणे

ढासाळवाडी गावात १२६ खातेदार आहेत. गावातील २0 शेतक-यांचा एक गट तयार करून एकूण ६गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटामधून एका सक्षम व क्रियाशील गटप्रमुखाची निवड करण्यात आली. प्रत्येक गटासाठी रु. ५,000/- निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक गटप्रमुखाचे व सचिव यांच्या नावे बँकेमध्ये खाते उघडण्यात आले असून, प्रत्येक गटातील शेतक-यांचे प्रशिक्षण, रजिस्ट्रेशन, गटाच्या दरमहा सभा, साहित्यसामग्री इत्यादि तसेच गटांच्या बळकटीकरणासाठी शेतक-यांचे प्रशिक्षण, गटांचे आत्माअंतर्गत रजिस्ट्रेशन, कोरडवाहू शेतीसाठी प्रोसिडिंग रजिस्टर, पुस्तिका इत्यादि साहित्य सर्व सहाही गटप्रमुखांना वाटप करण्यात आले. गटांच्या नियमित बैठका सुरू झाल्या. दर महिन्याला रु. १00/- प्रमाणे गटाच्या खात्यामध्ये रक्कम रु. २0,000/- जमा झाले. त्यामधून कोड व रोग नियंत्रण, नावीन्यपूर्ण कामे, आय.पी.एम. आय.एन.एम. इत्यार्दीबाबत कार्यवाही केली.

शेतकरी गटप्रमुखाचे प्रशिक्षण

ढासाळवाडी येथे कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाण्याचे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या अधिपत्याखाली गटप्रमुखांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये पेिकंच्या लागवडीपूर्व मशागतीपासून ते पीककापणी, काढणीतोर तंत्रज्ञान व साठवणूक व्यवस्थापन, बाजार कौशल्य, विविध शेती अवजारांचा व यंत्राचा वापर, मूलस्थानी जलसंधारणाचा वापर, गट सक्षमीकरण कोशल्य. शेड़नेट शेततले, सिंचन सुविधा इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण घेऊन गटप्रमुखांनी त्याच गटातील इतर सदस्यांना प्रशिक्षित करण्याचे अभिवचन दिले. त्यानुसार कार्यवाहीसुद्धा करण्यात आली.


शेतीशाळा

या अभियानांतर्गत ढासाळवाडी गावात प्रत्येक हंगामात शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळेमध्ये खरीप पीक सोयाबीन व ख्बी हंगामात गहू व हरभरा पिकांची शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळेमध्ये ३० शेतक-यांची निवड केली असून २o प्रशिक्षण सत्रांपैकी १६ सत्रे आठवड्यातून एक याप्रमाणे शेतीशाळा कार्यक्रम घेण्यात आला. या शेतीशाळेमध्ये बीजप्रक्रिया, लागवडपूर्व प्रशिक्षण, मातीपरीक्षण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. क्यामध्यें आय.पी.एम. आय.एन.एम. प्रक्रिया उद्योग, यांत्रिकीकरण करणे इत्यार्दीबाबत चर्चा झाली.

शेतक-यांचा अभ्यास दौरा

खरीप पेिकांसाठी ५g शेतकरी व रब्बी पिकांसाठी ५o शेतकरी याप्रमाणे प्रत्येक हंगामामध्ये ५ दिवसांसाठी राज्यांतर्गत अभ्यास वैन्यांचे आयोजन केले जाते. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, कोरडवाहू कृषि संशोधन केंद्र. राष्ट्रीय कृषेि संशोधन केंद्र, कृषिक्षेत्रात विशेष काम करणा-या खाजगी कंपन्या तसेच संस्था, प्रगतिशील शेतक-यांची प्रक्षेत्रे, कृषि विभागांची विविध प्रक्षेत्रे इत्यादि ठिकाणी भेटी आयोजित करण्यात आल्या. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या प्रक्षेत्रांना भेट देऊन श्री. पोपटराव पवार व ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी कोरडवाहू पिंकाबाबत योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषि प्रक्रिया, नवीन सुधारित वाण, महिलांचा सहभाग, शेडनेट हाऊस इत्यादिविषयी चर्चा करण्यात आली.

संरक्षित सिंचन सुविधा

पीव्हीसी पाईप पुरवठा

गावातील शेतकरी पूर्वी मोकाट पद्धतीने पिकांना पाणी द्यायचे; परंतु या अभियानाद्वारे पी.व्ही.सी. पाईप पुरवठा केल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता आला. एकूण ४८ लाभाथ्यांना प्रत्येकी ५७ नग असे एकूण २७३६ पी.व्ही.सी. पाईप पुरवठा केले. त्यामुळे ७० हेक्टर क्षेत्र ओर्लिताखाली येऊन १० ते २० टक्के पाण्याची बचत झाली.


डिझेल / विद्युत पंप पुरवठा

ज्या शेतक-यांकडे संरक्षित पाणी उपलब्ध आहे

अशा शेतक-यांना त्यांच्या मागणीनुसार ८ डिझेल पंपांचा पुरवठा करण्यात आला. डिझेल पंप ५ एचपीचे असून प्रत्येक लाभाथ्र्यास रु. १४,000/- तर विद्युत पंपाचे ३५ शेतक-यांना प्रत्येकी रक्रम रु. १0,000/- अनुदान देण्यात आले.

शेततळे

ढासाळवाडी गावात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत ३0 × ३0 × ३ फूट आकाराची दोन शेतातळी व २0 × २0 × ३ फूट आकाराची दोन शेतातळी अशा एकूण ४ लाभार्थ्यांना शेतातळ्यांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांना आपत्कालिन स्थितीत पिकांना संरक्षित पाणीं देता आले.

सूक्ष्म सिंचन

पाण्याचा काटकसरीने वापर करून जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी ५१ तुषार संचांचे वाटप केले. त्यांपैकी अल्प-अत्यल्प भूधारकांसाठी ६० टक्के व बहुभूधारक क्षेत्रासाठी ५0 टक्के अनुदान देण्यात आले. ठिबक व तुषार संचामुळे ३५ ते ४g टक्के पाण्यामध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये १५ ते २0 टक्के वाढ झाली.

मुलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण

मजुरांचा तुटवडा व उत्पादन खर्चात बचत व्हावी या उद्देशाने मूलस्थानी जलसंधारण कार्यक्रमावर विशेष भर देण्यात येत आहे. यामध्ये बी.बी.एफ. प्लांटसृद्धारे सरी-वरंबा पद्धतीमुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिला. तसेंच उताराला आड़वों पेरणीं करण्यात आलीं.

शेतकरी गठाना कृषेि अवजारे संच ५0 टक्के अनुदानावर पुरवण्यात आले. परंतु, शेतक-यांना वैयक्तिकपणे त्यांनी केलेल्या मागणीनुसार ५० टक्के अनुदानावर रोटॉव्हेटर, २५ एचपी श्रेशर, ५ एचपी श्रेशर, स्पायरल सेपरेटर, पलटी नांगर, प्लॅस्टिक क्रेट्स, चाप कटर, सीड कम फर्टीलायझर (पेरणी यंत्र), डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटार ट्रॅक्टर चलित बी.बी.एफ. प्लांटर, पीव्हीसी पाईप, ठिबक व तुषार संच, ३९ एचपी ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर तसेच शेडनेट हाऊस इत्यादींचा या योजनेमध्ये पुरवठा करण्यात आला.

यांत्रिकीकरणाचा फायदा

गावामध्ये मशागतीपासून काढणीपर्यंत लागणारी कृषेि अवजारे उपलब्ध नसल्यामुळे ती बाहेरगावाहून आणून पेरणी व मळणी करावी लागत होती. त्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढ्त होता. मात्र, यंत्रसामग्री गावामध्येच उपलब्ध झाल्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी झाला व कामे वेळेत होऊ लागली. अशाप्रकारे गावातील शेतक-यांना कोरडवाहू शेती अभियानांतर्गत विविध उपक्रमांसाठी तसेच कृषि अवजारे व उपकरणांसाठी अनुदान देण्यात आले. गावातील शेतक-यांनीसुध्दा आपला लोकवाटा देवून या कार्यक्रमास हातभार लावला आहे. तसेच राबविलेल्या विविध उपक्रमांचे/ कार्यक्रमांचे चांगले परिणाम गावात दिसून येत आहेत.


स्त्रोत- कृषी विभाग महाराष्ट्र शासन

3.0625
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 18:24:10.040624 GMT+0530

T24 2019/06/16 18:24:10.047370 GMT+0530
Back to top

T12019/06/16 18:24:9.014535 GMT+0530

T612019/06/16 18:24:9.079035 GMT+0530

T622019/06/16 18:24:9.263566 GMT+0530

T632019/06/16 18:24:9.264607 GMT+0530