Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:13:9.920856 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / खडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप
शेअर करा

T3 2019/10/17 06:13:9.926567 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:13:9.956387 GMT+0530

खडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप

खडक माळेगावच्या शरद शिंदेची यांची यशोगाथा.

‘शेती करताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास असल्यास उत्पन्न वाढविता येते’ आत्मविश्वासाने हे अनुभवाचे बोल सांगणाऱ्या निफाड तालुक्यात खडक माळेगाव येथील शरद शिंदे या तरुण शेतकऱ्याने मोठी झेप घेत पॉलिहाऊस उभारले असून शेतीतील उत्पन्न लाखांच्या घरात नेले आहे.

शिंदे 9 एकर शेतात मका, कांदे, गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके ते घेत असत. त्यात वर्षाकाठी जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळत असे. काही वर्षापूर्वी त्यांनी शेडनेटचा प्रयोग करून पाहिला. त्यात त्यांना उत्पन्न तर अधिक मिळाले मात्र अधिक पाऊस झाल्यावर शेडनेटमधून पाणी झिरपत असल्याने तो प्रयोगही त्यांनी स्थगीत केला.

कृषी विभागामार्फत तळेगाव दाभाडे येथे दोन प्रशिक्षण सत्रात सहभागी झाल्यानंतर पॉलिहाऊसकडे त्यांचे आकर्षण वाढले. त्यांनी याबाबत अनेकांचे मार्गदर्शन घेतले, कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, प्रशिक्षणातून माहिती घेतली. पॉलिहाऊससाठी कृषी विभागाकडे नोंदणीदेखील केली. यावर्षाच्या प्रारंभी कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र मिळाल्यावर त्यांनी विचारपूर्वक मोठी झेप घेतली. एका फायनान्स कंपनीकडून पॉलिहाऊससाठी 41 लाखाचे कर्ज घेतले. त्यांना तालुका कृषी अधिकारी के.के.ढेपे आणि कृषी सहायक आर.एन.साठे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

दोन महिन्यात पॉलिहाऊस उभे राहिल्यानंतर एप्रिल 2017 मध्ये पहिले पीक म्हणून त्यांनी कलर शिमला मिर्चीची लागवड केली. या मिरचीला असलेल्या बाजारपेठेची माहिती त्यांनी पूर्वीच घेतली असल्याने मार्केटींगबाबत फारशी अडचण आली नाही. आतापर्यंत 25 टन मिरचीचे उत्पादन घेऊन त्यांनी केवळ आठ लाख खर्चात 20 लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. बँकेचा पहिला हप्तादेखील अदा करण्यात आला आहे.

त्यांच्या एक एकरवरील पॉलिहाऊससाठी कृषी विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 14 लाख 80 हजाराचे अनुदान मिळाले आहे. त्याशिवाय ठिबकसाठी एक लाख 80 हजार अनुदान मिळाले असून लागवड साहित्यासाठी दोन लाख 80 हजाराच्या प्रस्तावालादेखील मंजूरी मिळाली आहे.

त्यांच्यासारख्याच इतर उद्यमशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिंदे यांनी एकत्रितपणे युवान फार्मस प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे ते ग्राहकापर्यंत पोहोचतात. दिल्ली, इंदोर, मुंबई अशा विविध ठिकाणी त्यांची मिर्ची पोहोचली आहे. बाजारात चाईनीज पदार्थांसाठी लागणाऱ्या ब्रोकोली, झुकीनी आदी पिकांना जास्त मागणी असल्याने त्याकडे वळण्याचा शिंदे यांचा मनोदय आहे. आपल्या अभ्यास आणि परिश्रमाच्या बळावर अवघ्या 35 व्या वर्षी मोठी झेप घेणाऱ्या शरद शिंदे यांनी इतर युवा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या शेतीचा मार्ग दाखविला आहे.

शरद शिंदे - यावर्षी पावसामुळे मक्याचे नुकसान झाले. पॉलिहाऊसच्या उत्पन्नामुळे हे नुकसान सहज पेलता आले. यापुढे सेंद्रीय शेती करण्याचा विचार आहे. त्यासाठी गीर गायी घेतल्या आहेत. आता गांडुळखत तयार करायचे आहे. बाजाराची मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेत असल्याने जास्त फायदा झाला आहे.

- डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

2.88888888889
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:13:10.582182 GMT+0530

T24 2019/10/17 06:13:10.588877 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:13:9.753912 GMT+0530

T612019/10/17 06:13:9.773398 GMT+0530

T622019/10/17 06:13:9.909369 GMT+0530

T632019/10/17 06:13:9.910357 GMT+0530