Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:35:21.445076 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / जलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष
शेअर करा

T3 2019/10/18 14:35:21.450852 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:35:21.482788 GMT+0530

जलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष

दोन वर्षात ११,४९४ गावांची निवड; साडेबारा लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण.

टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे.

दोन वर्षातील कामाचा आढावा

  • ११ हजार ४९४  गावांची निवड
  • 2 लाख 79 हजार 172 कामे पूर्ण, 3 लाख 12 हजार 165 कामे सुरु
  • दोन वर्षात ३,४०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध
  • ४,७८६ गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण
  • 11 लाख 82 हजार 229.48 टी.सी.एम. निर्मित पाणीसाठा
  • 1472.77 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला
  • 3455.54 किलोमीटर लांबीच्या कामाचे खोलीकरण आणि रुंदीकरण
  • विशेष निधी आणि कन्हरजन्स मधून 3 हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख 82 हजार 229 टी.सी.एम. पाणीसाठी निर्माण झाला आहे. यातून 12 लाख 51 हजार 713 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. तर 4 हजार 786 गावांमधील कामे पूर्ण झाली आहे. टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे.

यासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाण5कांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाअभकांक्षी अभियानाचे नुकतेच जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ख्रिस्टलिना जॉर्जिया यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाच्या माध्यमातून या योजनेचे फलित समजून घेतल्यानंतर श्रीमती जॉर्जिया यांनी या योजनेचे मनसोक्त कौतूक केले.

ही योजना खूप प्रभावी असून ज्या पद्धतीने लोकसहभागातून ही योजना राबविली जात आहे ते अनुकरणीय असल्याचे गौरवोद्वगार त्यांनी यावेळी काढले आहे. त्याचबरोबर राज्याच्या या अभियानाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे. मागील वर्षी या अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे आणि यावर्षी राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे या अभियानाचे यश व दृष्य परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांमुळे हे अभियान दुष्काळी भागासाठी वरदान ठरले आहे. सन 2015-16 मध्ये या अभियानातंर्गत 6202 गावांची निवड करण्यात आली होती.

या गांवामध्ये जलसंधारणाची 2 लाख 44 हजार 722 कामे करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 34 हजार 9 कामे पूर्ण झाली तर 10 हजार 713 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांमध्ये गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. या अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची 9 हजार 578 कामे पूर्ण झाली आहे. या कामांच्या माध्यमातून 480.41 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 1749.79 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 313.25 कोटी रुपये आहे. तसेच लोक सहभागातून गाळ काढण्याची 6 हजार 181 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 563.85 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. तर 1149.11 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 400.65 कोटी रुपये आहे.

जलयुक्त शिवार अभियानासाठी पहिल्यावर्षी 2 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 1572.51 कोटींचा निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानात 8 हजार 273 साखळी/सिमेंट नाला बांधच्या कामांचा समावेश आहे. यापैकी 6 हजार 137 कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर आतापर्यंत 677.53 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच 69 हजार 468 इतर कामांचा समावेश असून त्यापैकी 56 हजार 528 कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर आतापर्यंत 894.98 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांपैकी 4 हजार 728 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली असून 788 गावामधील कामे 80 टक्के पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी मागील वर्षी विशेष निधी आणि कर्न्व्हजन्समधून 3 हजार 499.26 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या अभियानाचे यश लक्षात घेऊन चालूवर्षी हे अभियान 5 हजार 292 गावांमध्ये राबविण्याचे निश्चित करण्यात आले. यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये कोकण विभागातील 136, नाशिक विभागातील 900, अमरावती विभागातील 998, पुणे विभागातील 825, औरंगाबाद विभागातील 1518 तर नागपूर विभागातील 915 गावांचा समावेश आहे. या गांवामध्ये जलसंधारणाची 67 हजार 433 कामे सुरु असून त्यापैकी 45 हजार 163 कामे पूर्ण झाली आहे. तर 22 हजार 280 कामे प्रगतीपथावर आहे.

यावर्षी जलयुक्त शिवार अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची 2 हजार 215 कामे पूर्ण झाली आहे. या कामांच्या माध्यमातून 163.07 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 967.33 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 86.17 कोटी रुपये आहे. तसेच लोक सहभागातून गाळ काढण्याची 2 हजार 80 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 265.44 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच 589.31 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 140.76 कोटी रुपये आहे.

जलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी 1400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी 3 हजार 890 साखळी/सिमेंट नाला बांधच्या कामांचा तर 32 हजार 917 इतर कामांचा समावेश आहे. त्यापैकी 8 हजार 578 कामे पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी या दोन वर्षांत विशेष निधी आणि कर्न्व्हजन्समधून 3 हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी केलेली मदत, देवस्थान मंडळे, सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या मदतीचाही समावेश आहे.

या कामांमुळे राज्यात सुमारे 11 लाख 82 हजार 229.48 टी.सी.एम. पाणीसाठा निर्मीत झाला आहे. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून राज्यातील 12 लाख 51 हजार 713.4 हेक्टर क्षेत्रास एका संरक्षित सिंचनाची तर 6 लाख 28 हजार 512.92 हेक्टर क्षेत्रास दोन संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावरुन जलयुक्त शिवार अभियान हे आता अभियान न राहता लोकचळवळ झाल्याचे दिसून येते.

 

लेखक -विलास बोडके
विभागीय संपर्क अधिकारी

स्त्रोत - महान्युज
४ मार्च २०१७

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:35:22.619720 GMT+0530

T24 2019/10/18 14:35:22.626953 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:35:21.275797 GMT+0530

T612019/10/18 14:35:21.295610 GMT+0530

T622019/10/18 14:35:21.432592 GMT+0530

T632019/10/18 14:35:21.433629 GMT+0530