Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:20:59.964369 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / देशी तांदुळाचे पुनरागमन
शेअर करा

T3 2019/10/14 06:20:59.969731 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:20:59.999999 GMT+0530

देशी तांदुळाचे पुनरागमन

सहजा समृद्ध , सेंद्रिय शेतकऱ्यांचे एक संघटन , ज्याने एका दशका अगोदर शाश्वत शेतीच्या कल्पना, बियाणे आणि ज्ञानाच्या देवान घेवाणाची मुहूर्तमेढ रोवली.

सहजा समृद्ध , सेंद्रिय शेतकऱ्यांचे  एक संघटन , ज्याने एका दशका अगोदर शाश्वत शेतीच्या कल्पना, बियाणे  आणि ज्ञानाच्या देवान घेवाणाची मुहूर्तमेढ रोवली. तिच्या दमदार सुरुवातीपासून आजतागायत देशी बियाण्यांचे पुनरुजीतन अभियानाद्वारे भारतीय शेती पद्धतीत नवचैतन्य  निर्माण करणारी एक ताकतवर संस्था म्हणून उदयास आली. तो दिवस फारच शीण आणणारा होता. तांदूळाच्या मेळाव्यामध्ये दोन दिवसाच्या सततच्या बोलण्याने आमचे आवाज बसले होते आणि बोलण्यासाठी शरीरात त्राण उरले नव्हते.

दुसरा दिवस सरते वेळी आमच्या जवळच्या तांदूळाच्या विविध वाणांचे खरीददार नाराज झालेले दिसत  होते कारण त्यांना मोकळ्या  हाताने परतावे लागते . अगदी एखाद्या किलो देखील बीज मिळाले नाही, केवळ  प्रदर्शनान लावलेले ९००  विविध वाणांचे फलक, त्याबद्दलचे तक्ते पोस्टर्स आणि शेतक-यांना दिली जाणारी माहिती एवढ्यावरच  त्यांना भागवावे लागले.

सेंद्रिय हेच जीवन

'सहजा समृद्धा' हा सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांचा संघ, धानाच्या पारंपारिक बियाणाचा  प्रचार प्रसार व शेतक-यांमध्ये त्याची जाणिव निर्माण करण्यासाठी अनेक मेळाने घेत आलेला आहे. ह्या चळवळीतून शाश्वत शेतीचा पुरस्कार करणारा व पारंपारिक धानाच्या बियाणांची देवाण घेवाण न वाढ करणारा एक मंच निर्माण करण्य़ाचा प्रयत्न या संघामार्फत चालू आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या संघामध्ये लहान, सीमांतिक शेतकरी व महिला शेतकरी तसेच बीज जपवणूक करणारे एकत्र आले आहेत. ह्या संघामध्ये 15 शेतकरी गट व 750 सेंद्रिय शेती प्रमाणपत्र असलेले शेतकरी असून ते मूलतः शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत असतात. शार्श्वत शेती प्रोत्साहना सोबत आमचे री तां व तांदूळ संस्कृतीच्या संवर्धनासाठी आशियार्त लोक चळवळीचेच भाग बनले आणि पारंपारिक तांदूळ वाचवणे, वाढवणे त्याचे ज्ञान सर्वत्र पसरवणे ह्या भरीव कामात ते गुंतले. प्रत्यक्ष शेतावर धानाच्या विविध जाती जोपासणे सहभागी पद्धतीने पीक सुधारणा घडवून आणणे आणि सेंद्रिय़ घानाचे उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी' सहजा समृद्धा' कर्नाटक राज्यात ह्या चळवळीला पुढाकार देत आहे.

आपला तांदूळ / धान वाचवा

कर्नाटकामध्ये सेंद्रीय तांदूळाची शेती वेग धरत आहे. बहुतेक  शेतकर्यांना वाटते कि सेंद्रिय शेती हा एक प्रचलित शेतीला खात्रीलायक पर्याय़ आहे. त्यातील बहुतांश वाणांची लागवड, त्याची उत्कृष्ट चव, ख़ास वैशिष्ट्ये , तग धरण्याची ताकद (जसे : अवर्षण शोषकता, रोग प्रतिकारकता, क्षार प्रतिरोधकता) आरोग्य विषयक फायदे आणि अमार्ची गुणवत्ता यामुळे दुर्गम खेड्यांमध्ये लागवड केली जाते. औषधीय नेल्लू, करीगजीतीली आणि सनाक्की ह्या काही प्रमुख प्रजाती आहेत.परंतु अशा औषधीपूर्ण असलेल्या पारंपारिक प्रजातीच्या तांदुळाला बाजारपेठ मिळवणे हे एक आव्हानच आहे. विशेषतः शहरी भागातील लोक अशा

तांदूळाचा आकार, रंग ह्याकडे खास आकर्षित होत नाहीत. बाजारात अशा तांदुळाची मागणी नसल्यामुळे शेतकरी देखील अशा पारंपारिक वाणाचे पीक घेत नाहीत.

सहाजा ऑरगॅनिक्स शेतक-यांच्या मालकीची कंपनी

सहज़ा समृध्दने ‘सहजा ऑरॉनिक्स' या व्यापारी नावाख़ाली उत्पादक - उपभोक्ता यांची संकलन व विपणन करणारी साखळी/शृंखला निर्माण केली आहे. सहजा समृध्द ऑर्गिनक प्रोडयुसर कंपनी (मर्यादीत) ची स्थापना सेंद्रिय माल विकण्या करीता झाली. ही कंपनी थेट शेतक-यांकडून धान्य जमा करून  साखळीतल्या विक्रीकेंद्राकडे पाठविते . उपभोक्यांकडे पोहचविण्यासाठी आणि शेतक-यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी तयार केली आहे.

धानाची देशी जाती
सहाजा ऑरगॅनिक्स  विविध प्रकारच्या उत्पादनाचे विपणन करते , ज्यात30 तांदूळाचे वाण, 15 विविध दुय्यम तृणधान्य, गहू, कडधान्य, फळे आणि भाजीपाला, बालकांचे अन्न, प्रक्रीयांकरीत उत्पादन जसे : पापड़, अरोग्यदायी पेय, मिश्र धान्याचे पीठ, मूल्य वर्थक उत्पादने आणि खाण्याचे अज्ञ पदार्थीचा समावेश होतो. विशेषतः दुय्यम तृष्ण धान्य व लाल तांदूळाच्या अशा पिकांना पोषक तत्व  आणि आरोग्यदायी उपयुक्तता  यामुळे शहरी भागात प्रचंड मागणी आहे. सध्या कंपनीकडे 786 राज्यातील विविध प्रदेशातील सेंद्रिय उत्पादन असून 2000 पेक्षा अधिक 'सेंद्रिय रुपांतर स्थितीत आहे. हे शेतकरी दक्षिण भारतातील मोठय़ा शहरांतील 28 विक्री केंद्राना नियमीत माल पुरवित आहे. ह्या जैव- उपक्रमाध्या सफलतेचे कारण महणजे शहरी समजाघा सहभाग होय. दक्षिण भारतातील मृत शेती संस्कृतीला संजीवनी/ नवर्येतन्य देण्याकरीता शेतक-यांचा गट, महिलांचा गट आणि उपभोक्तांचा गट समान विचार -धाराने एकत्रीतपणे, एकजुटीने काम करीत आहे .

म्हणून आम्ही विविध प्रकारच्या तांदूळाची विक्री करण्याचे काम हाती घेतले. ह्या सर्व वाणाचे गुणधर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रयोग शाळामधून शास्त्रिय पद्धतीने देखिल त्यांचे गूणधर्म तपासून पाहिले. ह्या अहवालातून हे सिद्ध झाले की बाजारातील प्रसिद्ध, चमकदार तांदुळाच्या वाणापेक्षा पारंपारिक वाणामध्ये अधिक पोषणतत्व आणि आरोग्यास लाभदायक गूणतत्व आहेत. आम्ही पोस्टर्स, माहिती पत्रिका व विविध लेखांद्वारे य़ा निष्कर्षांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार, प्रचार केला. प्रसारा माध्यमांनी देखिल या विषयाला चांगलेच उचलून धरले. मेळाव्याच्या माध्यमातून हा विषय सर्वदूर गेला आणि अनेक लोक पारंपारिक तांदुळाकडे वळले .

तांदूळ/धान मेळावा बदलाचा अग्रदूत!

असा पारंपारिक तांदूळ आपल्य़ा आहारात आल्याने त्याचे आरोग्य व सकस आहार विषय काय फायदे आहेत. त्याचा सुवास  व इतर गुणधर्म काय आहेत ह्याची लोकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध विभागांमध्ये आम्ही तांदूळ महोत्सव आयोजित केले. आम्ही बंगरुळ आणि इतर शहरांमध्ये सेंद्रिय  मेळावा, देशी तांदूळ मेळावा, लाल तांदूळ मेळावा, जैवविविधता मेळावा आणि सुरक्षित अन् मेळावा यासारख्या विविध वाणांपासून चविष्ट पकवान तयार करुन आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केले गेलेत. तसेच मेळाव्या दरम्यान चवीसाठी पदार्थ वितरीत  केलेत. यामार्फत बाज़ारातून लूत झालेल्या आरोग्यदायक, पोषक आणि विस्मरित अन्नधान्याचे पुन्हा एकदा बाजारात स्थान निर्माण केले.

सर्वसाधारण प्रत्येक मेळाव्यामध्ये 4000 ते 5000 उपभोक्ते आकर्षित झालेत. त्यात जवळपास तीन ते चार लाख रुपयांच्या पांरपारीक तांदूळ वाणांची विक्री झाली. 2012 साली  पारंपारीक तांदूळ वाणांच्या वार्षिक विक्रीने  100 टनाहून अधिक उच्चांक देखिल नोंदविला.

मेळावा आणि त्यातील उत्पादनांची जाहिरात जनमानसात पोहचविण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी प्रमुख भूमिका निभावली. विविध  वृतपत्रे आणि मासिकांनी लाल आणि सेंद्रिय तांदुळामुळे होणाऱ्या आरोग्याविषयी बातम्या प्रसारित  केल्यात. आम्ही भेट देणाऱ्या अभ्यागतांची माहीती जमा करून पुढील संबंध दृढकाव्य करीता वापरतो.

साधारणतः 30 संस्था संघटनाना एकत्र घेतून सहजा समृद्धाने सुरु केलेला हव्या चळवळी मध्ये आज 2000 तांदूळ उत्पादक, तांदूळ सरंक्षण, शेतकरी पेंदासकार इ. सामील झाले आहेत. हे सर्वजण मिळून सुनासिक, ऑषधी, खोल पाण्यात तग धरणारी, क्षार प्रतिरोधक आणि कोरडवाहू शेतीमध्ये येणा-या अशा सुमारे 600 विविध काणांचे संरक्षण व वाढ करीत आहेत. ही तर एक सुरुवात आहे. आमचे मुख्य ध्येय अधिकाधिक जनतेमध्ये सेंद्रिय अन्न  आणि स्थानिक धान्याचा आहारात वापर जास्त पटीने वाढविणे होय .जगभरात पारंपारिक अन्न्धान्याकडे  कल वाढ़त आहे. आणि आम्हीसुद्धा तसा बदल आमच्या राज्यात घडवून आणण्यासाठी काम करीत राहू.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

2.95454545455
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:21:0.693826 GMT+0530

T24 2019/10/14 06:21:0.700683 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:20:59.805898 GMT+0530

T612019/10/14 06:20:59.825439 GMT+0530

T622019/10/14 06:20:59.954304 GMT+0530

T632019/10/14 06:20:59.955125 GMT+0530