Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 15:51:21.626644 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / भंडारमाची गाव टँकरमुक्तीकडे
शेअर करा

T3 2019/06/26 15:51:21.634030 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 15:51:21.666253 GMT+0530

भंडारमाची गाव टँकरमुक्तीकडे

कोरेगाव (जि.सातारा) तालुक्यातील भंडारमाची हे दुष्काळग्रस्त गाव. या गावात कायम दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरनेच पाणीपुरवठा करावा लागायचा.

प्रस्तावना

कोरेगाव (जि.सातारा) तालुक्यातील भंडारमाची हे दुष्काळग्रस्त गाव. या गावात कायम दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरनेच पाणीपुरवठा करावा लागायचा. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग मार्फत या गावाचा २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेती अभियान योजनेत समावेश करण्यात आला. ही योजना गावात यशस्वी झाल्याने गावची टॅकर्मुतीकडे वाटचाल सुरु झाली. गावची निवड व आराखडा : या योजनेंतर्गत गावाचे पायाभूत सर्वेक्षण करुन गावाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला.

योजनेच्या प्राप्त निधीमधून तीन सिमेंट नाला बांधाची व २४ शेततळे खोदाईची कामे मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आली. त्याचबरोबर २०१२-१३ पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत १६५.00 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडींग, ८ माती नाला बांध व ४४ अर्दन स्ट्रक्चरची कामे पूर्ण केलेली आहेत. तसेच १oo एकर क्षेत्रावर तंत्रज्ञान आधारीत रब्बी ज्वारी पिकाची पीक प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली आहेत. यामध्ये फुले रेवती या वाणाचा वापर करण्यात आला. रब्बी ज्वारी पिकाच्या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतक-यांना ज्वारी पिकाचे तंत्रज्ञान अवगत करून देण्यात आले. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे रब्बी ज्वारी पिकाची उत्पादकता.

जलयुक्त शिवार अभियानाची सुरवात

जलयुक्त शिवारामध्ये झालेल्या कामाची व प्रकल्प आराखडा करुन १ जानेवारी २०१५ पासून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पाणीपातळीत लक्षणीय वाढ: लोकसहभागातून गावातील गावतलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात गावतलाव भरला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाच्या आडातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. कोरडवाहू शेती अभियानाच्या उपलब्ध निधीतून तीन सिमेंट काँक्रीट नालाबांधाची कामे पूर्ण करण्यात आली असून यामधील एक सिमेंट नालाबांध पाणीपुरवठा विहिरीच्या वरील बाजूस १८ मीटर लांबीचा सिमेंट नाला बांधाचे काम पूर्ण करण्यात आले त्या मध्ये १०.७५ टिसीएम अपेक्षीत पाणीसाठा होत आहे. त्यामुळे लगतच्या ९ विहिरींना तसेच १०.३० हे क्षेत्रास फायदा होणार आहे. कोरडवाहू शेती अभियानातून खोदलेल्या R8 शेततळ्यांना अस्तरीकरण करुन त्याचा याच हंगामात ५० हे फळबाग लागवड व इतर बागायती पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी उपयोग होत आहे. त्यामुळे गावाच्या पीक उत्पादनात वाढ होवून कृषी पूक व्यवसायांनाही चालना मिळण्यास मदत होत आहे. भर उन्हाळ्यामध्येही गावास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे गावाची वाटचाल टॅकर्मुतीकडे सुरू आहे.

ग्रामसहभाग महत्वाचा

ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी गावाचे सरपंच श्री. विठ्ठल भंडारे, संपत चव्हाण, अशोक चव्हाण, दिनकर चव्हाण, संदेश पिसाळ व क्रांती गणेश मंडळाचे सर्व सदस्य, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कोरेगाव, प्रकाश राठोड, मंडळ कृषी अधिकारी कोरेगाव, श्री शशिकांत घाडगे कृषी पर्यवेक्षक व एच.एन.मुलाणी यांनी विशेष प्रयत्न केले.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

2.83870967742
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 15:51:22.347570 GMT+0530

T24 2019/06/26 15:51:22.354186 GMT+0530
Back to top

T12019/06/26 15:51:21.445150 GMT+0530

T612019/06/26 15:51:21.469985 GMT+0530

T622019/06/26 15:51:21.615532 GMT+0530

T632019/06/26 15:51:21.616538 GMT+0530