Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:22:18.807382 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / मागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी
शेअर करा

T3 2019/10/17 06:22:18.812881 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:22:18.842296 GMT+0530

मागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांना संजीवनी.

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहिर केली आहे. या योजनेतंर्गत राज्यात 1 लाख 11 हजार 111 शेततळी निर्माण करण्यात येणार आहे. तर जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक देण्यात आला असून आतापर्यंत 1853 शेततळी पूर्ण झाली आहे. तर 28 शेततळ्यांची कामे सुरु आहेत. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 111 शेततळी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी परिसरात तर अमळनेर तालुक्यातील नगाव येथे 55 शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरत आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पुर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहिर केली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात 2 हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत एकुण 1825 शेततळे पूर्ण झाली आहे. तर 28 शेततळ्यांची कामे सुरु आहेत. सन 2017-18 या वर्षात जिल्ह्यात एकुण 1251 शेततळे पूर्ण करण्यात आली असून त्याच्या अनुदानाकरिता राज्य शासनाने एकुण 576.70 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. यापैकी 570.26 लक्ष रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहे. तसेच सन 2016-17 या वर्षात एकुण 574 शेततळे पूर्ण झाली आहेत. त्याकरिता प्राप्त झालेल्या 276.75 लक्ष रुपयांचा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तसेच वारंवार आढावा घेऊन जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दीष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनीही जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने ही योजना राबविण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असून शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडीत कालावधीत फायदा झाला असून उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

माहिती स्रोत: महान्युज

3.2
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:22:19.462486 GMT+0530

T24 2019/10/17 06:22:19.469074 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:22:18.641436 GMT+0530

T612019/10/17 06:22:18.659968 GMT+0530

T622019/10/17 06:22:18.796611 GMT+0530

T632019/10/17 06:22:18.797571 GMT+0530