Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:03:42.966765 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / वाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती
शेअर करा

T3 2019/06/26 11:03:42.972424 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:03:43.003495 GMT+0530

वाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती

वाघिवरे हे गाव तालुका कृषी अधिकारी, देवगड व मंडळ कृषी अधिकारी, शिरगांव अंतर्गत असून ते तालुक्‍याच्‍या ठिकाणापासून साधारणपणे 42 किलोमीटरच्‍या अंतरावर सह्याद्रीच्‍या डोंगर दऱ्यामध्‍ये वसलेले छोटेसे गांव.

वाघिवरे हे गाव तालुका कृषी अधिकारी, देवगड व मंडळ कृषी अधिकारी, शिरगांव अंतर्गत असून ते तालुक्‍याच्‍या ठिकाणापासून साधारणपणे 42 किलोमीटरच्‍या अंतरावर सह्याद्रीच्‍या डोंगर दऱ्यामध्‍ये वसलेले छोटेसे गांव. ह्या गावामध्‍ये भात व नागली पीक प्रामुख्‍याने खरीप हंगामात घेतले जाते. तसेच निर्यातक्षम आंबा पीक देखील थोड्याफार प्रमाणावर घेतले जाते. व काजू पीक हे मुख्‍यत्‍वे करून व्‍यापारी दृष्‍टीकोनातून घेतले जाते.

या गावाचे भौगोलिक क्षेत्र -594.10 हेक्‍टर असून एकूण महसूल खातेदार संख्‍या 13 इतकी आहे व लोकसंख्‍या एकूण -698 आहे. तसेच भात पिकाखालील क्षेत्र 27.40हेक्टर, नागली पिकाखालील क्षेत्र 2.12 हेक्‍टर, भुईमूग पिका खालील क्षेत्र 0.80 हेक्‍टर. आंबा पिकाखालील क्षेत्र- 83.52 व काजू पिकाखालील क्षेत्र- 28.71 नारळ-0.13 व सुपारी -0.32 हेक्‍टर क्षेत्रावर इत्‍यादी विविध पिके घेतली जातात. तसेच रब्‍बी व उन्‍हाळी हंगामात थोड्या फार प्रमाणात भुईमूग, चवळी, भाजीपाला इत्‍यादी पिके घेतली जातात. परंतु इत्‍यादी विविध पिके असतांना खरीप हंगामात विशेषतः भात पिकाच्‍या बाबतीत बोलावयाचे झाल्‍यास 8 ते 10 दिवसात एखाद वेळ पावसाचा खंड पडल्‍यास पिकास शाश्‍वत पाण्‍याची सोय नसल्‍यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्‍पन्‍न कमी प्रमाणात मिळत होते.

तसेच रब्‍बी व उन्‍हाळी हंगामात विविध पिके घेण्‍यासाठी नाल्‍यांना व विहीरींना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्‍ध नव्‍हते. त्‍यामुळे शेतकऱ्यांना इच्‍छा असून देखिल विविध पिके घेणे शक्‍य नव्‍हते. त्‍याच बरोबर लोकांना व गुरांना देखिल एप्रिल, मे महिन्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असे. पर्यायाने गावात पाणी अडवून जिरवून गावातील भुगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे गावकऱ्यांना आवश्‍यक वाटले. त्‍याच वेळी महाराष्‍ट्र शासनाची जलयुक्‍त शिवार अभियान ही नवीनच योजना गावात नदी नाल्‍यावर पाणी पातळीत वाढ करणे ह्या योजनेचा लाभ घेण्‍याचे सर्वानुमते ठरले. त्‍याचप्रमाणे गावात ग्रामसभेचे आयोजन करुन चर्चा करुन व गावात शिवार फेरीचे आयो‍जन करुन सदर गावाचा जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जल आराखडा तयार करण्‍यात आला.

या गावाची जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत निवड झाल्‍यानंतर गावातील नदी नाल्‍यावर तसेच माथा ते पाय‍था डोंगर-उतारावर महाराष्‍ट्र शासन कृषि विभाग तसेच इतर विभागामार्फत सिमेंटनाला बांध-3, मातीनाला बांध-5, सिमेंटनाला बांध दुरुस्‍ती कामे- 2 इत्‍यादी जल व मृद संधारणाची विविध कामे आज रोजी पूर्ण झालेली आहेत.

विविध प्रकारच्‍या जलसंधारण उपचार पध्‍दतीच्‍या कामामुळे गावातील पडणारे पावसाचे पाणी व माती माथा ते पायथा अडवून व भुर्गभात जिरवून पाण्‍याची साठवण केल्‍यामुळे नदी- नाले व विहिरीची पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्‍याच प्रमाणे सिमेंटनाला बांध गट क्रमांक - 1/7/1 ह्या गटास शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे जवळपास- 180 मी. लाबींचा पाण्‍याचा पाट काढण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे नाल्‍याचे पाणी वळवून पाटाद्वारे शेतजमिनीस देणे शक्य झाल्‍याने खरीप हंगामात विशेषतः भात पिकाच्‍या बाबतीत पावसाचा खंड पडल्‍यानंतर जी काही प्रमाणात उत्‍पन्नात घट यायची ती उत्‍पन्नातील घट शाश्‍वत पाण्‍याची व्‍यवस्‍था असल्‍यामुळे येत नाही.

याचप्रमाणे रब्‍बी व उन्‍हाळी हंगामात पाण्‍याची पिकास हमखास सोय झाल्‍यामुळे शेतकरी वर्ग हळूहळू भुईमुग, सूर्यफूल, चवळी, कुळीथ, मका व भाजीपाल्‍या सारखी पिके घेऊन व आपला भाजीपाला काही प्रमाणात पंचक्रोशीच्या आठवडा बाजारात विक्री करुन आपला चरित्रार्थ चालविण्‍याचे सामर्थ्य त्‍यात आलेले आहे. एवढेच नव्‍हे तर शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिके घेण्‍याकडे वळलेला आहे.

त्‍याचप्रमाणे पूर्वी एप्रिल व मे महिन्‍यामध्‍ये जी काही पिण्‍याच्या पाण्‍याची लोकांची व गुरांची गैरसोय व्‍हायची ती आता पूर्णपणे थांबलेली असून आता गाव पाण्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण झालेले आहे. ही सर्व किमया महाराष्‍ट्र शासन कृषी विभागाच्‍या जलयुक्‍त शिवार अभियान योजनेची फलश्रृती आहे, असे सर्वसामान्‍य लोकांना वाटत आहे.

लेखक - मिलिंद बांदिवडेकर
जिल्‍हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

स्त्रोत - महान्युज

2.92307692308
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:03:43.630768 GMT+0530

T24 2019/06/26 11:03:43.637028 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:03:42.786127 GMT+0530

T612019/06/26 11:03:42.806119 GMT+0530

T622019/06/26 11:03:42.955425 GMT+0530

T632019/06/26 11:03:42.956412 GMT+0530