Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:23:54.958809 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन
शेअर करा

T3 2019/10/18 14:23:54.965299 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:23:54.998080 GMT+0530

शाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन

तामिळनाडूमध्ये त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणेद्वारे अल्पभुधारक शेतकरयांना चांगल्या सेवा पुरविल्या गेल्या प्रत्येक स्तरातील संस्थेच्या कार्य स्पष्ट्तेमुळे आणि त्यांच्या मधील सहजसंबंधामुळे शेती संबंधी असणारया सामाजिक व आर्थिक मुद्दयांची उकल करण्यात मदत झाली.

तामिळनाडूमध्ये त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणेद्वारे अल्पभुधारक शेतकरयांना चांगल्या सेवा पुरविल्या गेल्या प्रत्येक स्तरातील संस्थेच्या कार्य स्पष्ट्तेमुळे आणि त्यांच्या मधील सहजसंबंधामुळे शेती संबंधी असणारया सामाजिक व आर्थिक मुद्दयांची उकल करण्यात मदत झाली. शेतक-यांना संसाधन व सेवांची उपलब्धता वाढल्यामुळे उत्कर्षाकडे मार्गस्थ होणे शक्य झाले.

तामिळनाडू नागपट्टीनम, तीरूवणामलाई आणि कांचीपुरम या तीन जिल्यांमधील जनता गरीब असून शेतीवर अवलंबून आहे. पिकांचे कमी आणि कमी बाजार भाव व चढउतारांमुळे या विविध कारणामुळे शेतक-यांना शेती किफायतशीर राहीली नाही. एका पायाभूत अभ्यासात असे आढळून आले की, मुख्य पिके जसे भुईमुग आणि हरभरा पीकाची उत्पादकता कमी असून उत्पादन खर्च जास्त आहे. तसेच शेतीसाठी निधी व सेवांची मदत सुद्धा कमी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत (भारतीय ज्ञान व्यवस्था केंद्र) या संस्थेने (वृत्ती उदरनिर्वाह संसाधन केंद्र) बंगरूळ प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प DFID च्या जागतिक गरिबी निर्मुलनाच्या निधीच्या माध्यमातून तसेच नेदरलंड येथील हिंवास यांच्या मदतीने राबविण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य भर असा होता की, स्वयंशाश्वत आणि तिचा दिर्घ परिणाम करणारी सामाजिक यंत्रणा/ पद्धती निर्माण करणे. सध्या हा प्रकल्प तीन जिंल्हयातील 7) ग्रामपंचायतीतील 9218 शेतकरी कुटुंबाशी जोडला गेला आहे.

आदर्शनमूना (यंत्रणा)

गाव पातळीवर शेतक-यांचे गट व विविध प्रकारची मदत पोहचविणारी जिल्हा स्तरावरील यंत्रणा म्हणजे अॅग्रो प्रोड्युसर कंपनी अशी याची अंमलबजावणी यंत्रणा होती . प्रगतशील शेतकऱ्याकडून शेती विषयक सेवा  पुरविणारया गटास ग्रामीण कृषी व्यवसाय विकास सेवा पुरवठादार असे पुरवठादार होते. हे पूरवठादार शेतक-यांपर्यंत विविध सेवा, योजना व अधिकार मिळवून देतात . तसेच उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थीचे काम करतात. गाव स्तरावर शेतक-यांचे जसे महिला बचत गट, पुरूष बचत गट, पुरूष-महिला बचत गट, एकत्रित देवाणघेवाण गट, शेतकरी मंडळ यासारखे प्राथमिक स्तरावरील विविध गट आहेत. हया गटांमध्ये 20 - 25 महिला व पुरुषांचा समावेश असून या गटांना शाश्वत शेती प्रतिनिधी मिळून पंचायत कृषी विकास समिती असते. या मध्ये साधारण 12 ते 20 प्रतिनिधी सदस्य असतात. या समितीची प्रमुख भूमिका म्हणजे सर्व गटांमध्ये समन्वय साधने व गटांच्या कामावर लक्ष ठेवणे प्रान्तस्तरावर प्रांत कृषी विकास समिती असते. या समितीचे 20 ते 30 विकास समिती मध्ये जवळपास 15 ते 20 पंचायत कृषी विकास समित्या समाविष्ठ असतात . प्रांतकृषी  विकास समिती आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व पंचायत कृषिविकास समित्यांच्या कामाचे समन्वय व देखरेख करतात. जिल्हास्तरावर कृषी उत्पादक कंपनी उभारण्यात आली आहे.

आता शेतकऱ्यांनकडे १०० पेक्षा जास्त देशी तांदुळाची वाणाची उपलब्धता आहे.

ह्या कंपन्यांचे मुख्य कार्य शेतकरयाना विविध सेवा जसे विमा, सेंद्रिय प्रमाणीकरण  शेतक-यांसाठी प्रशिक्षणासोबतच चांगले उपजाऊ पायाभूत बियाणे पुरविणे, नितिष्ठा जसे कडुनिंब बियाण्याची पावडर, गांडुळखत, जिवाणूखते, जैविक किडनाशके, पोते, जनावरांचे खाद्य सभासदांना पुरविणे होय. सध्या 552 बचत गट, पंकृवि समिती (पंचायत कृषि विकास समिती), 5 प्रांत कृषीविकास समिती आणि 2 कृषीउत्पादक कंपन्या अस्तित्वात आहेत. या कृषीउत्पादक कंपन्याचे जवळपास 4000 सभासद आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की, हा प्रकल्प पूर्ण होतांना जवळपास 9000 प्रकाणाचे महत्वाचे परिणाम उपभोक्ता या कंपन्यांचे भागधारक होतील.

पर्यावरण सुलभ कृषीपध्दतींचे अवलंबन

सगळयात विकासाठी बाब म्हणजे शेतकरी रासायनिक शेतीकडून वळून शाश्वत सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत. संपुर्ण शेतकरी कुटुंबापैकी 15 टक्के रासायनिक शेतीकडून किडनाशक रहीत शेतीपद्धतीकडे वळले. आणि इतर 10 टक्के कुटुंब संपुर्ण सेंद्रीय शेतीकडे रूपांतरीत झाले. जवळपास 55 टक्के शेतकरी कुटुंबांनी प्रकल्पातील एकतरी शाश्वत शेती तंत्राचा/पद्धतीचा अवलंब केला. सर्वच मुख्य पिकांचे व त्यांच्या वाणांचे आधारभूत पातळीच्या तुलनेत उत्पादन वाढले.

खर्चातकपात आणि उत्पन्नात वाढ

शेतीत कोणतेही बदल न करणाच्या गटाच्या तुलनेत पर्यावरण सुलभ कृषी पद्धतीने 7 टक्के उत्पादन खर्च घटला. जवळपास 4500 कुटुंबाचे निळवळ नफा 15 टक्क्यापर्यंत वाढला. अंदाजे 107 शेतक-यांनी 143 हेक्टरवर, (श्री) लागवड पद्धती अंमलात आणली. या पद्धतीमुळे उत्पादन खर्च रू. 1250/- प्रति एकर पर्यंत घटल्यामुळे जिल्हास्तरावर रू 1,78,750/-  बचत झाली. नागपट्टीनम जिल्ह्यातील 45 शेतक-यांनी श्री पद्धत वापरल्यामुळे लागवड खर्चात एकरी रु. 1200/-  प्रमाणे घट झाली. जिल्हास्तरावर (श्री) लागवड पध्दत अमलत आणल्यामुळे एकूण रू.54000/- रू.ची बचत झाली. महिलांनी 2000 पेक्षा जास्त परसबागा तयार केल्या असून त्यांनी सरासरी रु.300/- प्रति महिना मिळकत होत आहे. विविध उत्पादनाच्या मुल्यवर्धन प्रक्रियेत एकूण 305 लाभार्थी समाविष्ट आहेत.

सामुहिकगट

सामुहिक गट पुढाकाराने प्रकल्पातील क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. तीन जिल्ह्यात तेरा गांडूळ खताचे प्रकल्प गट , सात जैविक कीटकनाशक उत्पादन गट , सात मूल्यवर्धीकरण  उत्पादन गट कार्यरत आहे. ह्या पैकीकित्येक गात विशेषतः गांडूळखत व मुल्यवर्धन गट महिलांच्या मालकीचे आहेत.

सिरकाझी लाय्म्माधुन्दाम गावात लोकांसोबत चालू असलेल्या चर्चा

हे उद्योग खेडयातील छोतक-यांना चांगल्या प्रतीची निवीष्ठा वेळेवर किंफायतशीर भावात वर्षभर उपलब्ध करून देतात. या गटामध्ये काम करणाच्या महिलांना आणि इतर मजूरांना त्यांच्या नियमित शेतकामाच्या मिळविती शिवाय दर महिन्याला अतिरित उत्पन्न मिळत आहे.

यांत्रिक कृषी अवजारे उपलब्धता सुलभ झाली

14 पंचायतीमध्ये यांत्रिक कृषि:अवजारांची उपलब्धता सुधारण्यासाठी कृषि:अवजारे सुविधा केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये पॉवर टीलर, छोटा ट्रॅक्टर, ऑईल इंजिन्स, रोवणी यंत्र, ट्रॅक्टरवर चालणारे तण काढणी यंत्र आणि धान्य पाखडणी यंत्र. शेतक-यासाठी उपलब्ध असतात बहुतेक कृषी नफा कमावित असून शेतकरी सेवाकरिता मोबदला देत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्यासक्षम आहेत. उदा. पेरनामलुर पंचायतीत धानाच्या 1800 गोणी (144टन) पाखडणी यंत्रणाने साफ करून दिल्या. कृषिपर्यावरण पध्दतीचे अवलंबनासाठी सरकारचे दिर्घ काळाचे धोरण आवश्यक आहे आणि 'वातावरण बद्दल’ या संबधातील धोरणामध्ये पर्यावरणीय शेती पद्धतीला महत्वाचे स्थान द्यायला हवे. धान्य साफ केल्यामुळे त्याची प्रत सुधारली त्यामुळे प्रत्येक पोत्यामुळे 50-100 रूपयापर्यंत जास्त किंमत मिळाली. ह्या कृषीकेद्रांचा प्रकल्पांतर्गत न येणाच्या लाभार्थांना सुद्धा फायदा झाला.

निष्कर्ष

लहान व सिमांतिक शेतक-यांच्या आवश्यक त्या सेवा पुरवणारी गाव पातळीवरील सेवादायी यंत्रणा (नमुना) ही शेतक-यांना उत्तम व पाहिजे त्या सेवा पाहिजे तेव्हा पुरवू शकते. त्रिस्तरीय संस्थात्मक (पंचायतः समुहू-जिल्हा) यंत्रणेद्वारे अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने पुरविलेली कृषिनिविष्ठ आणि उत्पादन वेगवेगळय़ा स्तरावर खेळेवर उपलब्ध केल्या जाऊ शकत. या यंत्रणेमधील प्रत्येक घटकांच्या (पंचायत कृषि विकास समिती, प्रांत देयता गठ, किसान गठ आणि कृषिउत्पादक कंपनी) भूमिका व कामे (समन्वय, देखरेख, ज्ञान वृद्धी, सेवा पुरवणे, वादातीत गोष्टींचे निराकरण यांची अत्यंत स्पष्ट्रता आणि त्या सर्व घटकामध्ये असलेल्या आंगीक संबधामुळे हा संस्थात्मक ढाचा उत्तम काम करू शकला. शेतीशी संबधित सर्व आर्थिक व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक या यंत्रणेमुळे सहज शक्य झाली. स्थानिक प्रगतशील शेतक-यांनी सेवा पुरविण्याचे काम केल्यामुळे विविध सेवा लक्षांकीत समाजापर्यंत कार्यक्षमतेने पोहचविण्यास मदत झाली. त्यांना सहकारी शेतक-यांच्या स्थानिक संदर्भ, आवश्यकता आणि प्राथमिकतेची माहिती असल्यामुळे हे शक्य झाले. ग्रामीण कृषिव्यवसाय विकास सेवा पुरवठादार गटाच्या सेवांची उपयुक्ततात कळल्यामुळे ते सेवांसाठी मोबदला मोजत आहे. शेतकरी सरकारी हक्क तसेच उधार व प्रोत्साहन, महिलांचे कृषिव्यवसाय विकास सेवा पुरवठादार म्हणून नेमणूक झाल्यामुळे सामाजिक आर्थिक विकास, निर्णय घेणा-या व्यासपीठामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले. महिला कृषिउद्योग व विकास सेवा दातांमुळे तर महिलांमध्ये समानतेचे आणि सामाजिक मान्यतेची संवेदना जनतेत वाढली. गटनिर्मिती प्रक्रियेतील समावेशकता (शेतकरी व भूमिहिन दोघांनाही सदस्यत्व देणे) व संरचनेच्या वरच्या पातळीवरील भूमिहिनाची सहभागीत मुळे त्यांच्या आर्थिक लाभाच्या उपक्रमांची शक्यता निर्माण झाली व नफ्याचे समान वाटप शक्य झाले.

एकंदर या प्रकल्पाच्या उपलब्धी विशेष होत्या. आम्ही असे पाहिले की, सर्वच  स्तरावरच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढले, उत्पादकता वाढली, उत्पादन खर्च कमी झाला आणि प्रोडयुसर कंपनीचा निव्वळ नफा वाढला. अॅग्रो प्रोडयुसर कंपनीच्या नेत्यांमध्ये व्यवसायातील उपयुक्त संधी शोधण्याची व ओळखण्याची क्षमता विशेष वाढली. चर्चेमधील पारदर्शकता आणि सर्व समावेशक निर्णय घेण्याची क्षमता चांगलीच वाढली. नियमीत कामात, दस्तावेज हाताळणे, नेतृत्व गुण आणि बाह्यजगासोबत देवाणघेवाणाची पात्रता यामध्ये बरीच सुधारणा झाल्याचे आम्हाला आढळले. महिला बचत गटांचे लक्ष्य नुसत्या बचत व उधारीपासून वळवून ते शाश्वत शेतीच्या पद्धतीकडे वळविण्यात यश आले. एकूणच, हा प्रकल्पाद्वारे शेतक-यांच्या कुटुंबाना गरिबीतून बाहेर काढून उन्नतीकडे मार्गस्थ करण्यास मदत झाली.

 

स्रोत - लिजा इंडिया

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:23:55.804163 GMT+0530

T24 2019/10/18 14:23:55.811361 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:23:54.750607 GMT+0530

T612019/10/18 14:23:54.796291 GMT+0530

T622019/10/18 14:23:54.946544 GMT+0530

T632019/10/18 14:23:54.947584 GMT+0530