Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:14:31.608632 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेततळ्यातील मत्स्यव्यवसायाने समृद्धी
शेअर करा

T3 2019/10/17 06:14:31.615289 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:14:31.651407 GMT+0530

शेततळ्यातील मत्स्यव्यवसायाने समृद्धी

नगर जिल्ह्यातील वाटेफळ गावाचा भाग तसा दुष्काळीच. पावसाचा भरवसा नाही, आसपास तलाव, कालचे नाही; त्यामुळे साहजिकच शेतीव्यवसायही बेभरवशाचा.

नगर जिल्ह्यातील वाटेफळ गावाचा भाग तसा दुष्काळीच. पावसाचा भरवसा नाही, आसपास तलाव, कालवे  नाही; त्यामुळे साहजिकच शेतीव्यवसायही बेभरवशाचा. त्यामुळे शेतीत कष्ट करायची तयारी असूनही उत्पन्नाची हमी नाही. परंतु, याच गावातील श्री. रवींद्र अमृते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दुष्काळी भागात शेततळ्यातील मत्स्यव्यवसाय यशस्वी केला आहे.

श्री. अमृते यांची गावात ४५ एकर शेतजमीन आहे. कायम दुष्काळी भाग असल्याने पाण्यासाठी श्री. अमृते यांच्या वडिलांनी शैतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ४ ते ५ विहिरी घेतल्या; पण काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर वेगळे प्रयत्न म्हणून एकूण ४० ठिकाणी कूपनलिका (बोअरवेल्स) घेतल्या; पण हातात काहीच पडले नाही. एका विहिरीवर एकूण शेतीपैकी ४ ते ५ एकर क्षेत्र आठमाही भिजायचे. त्यामुळे बारमाही पिकाचा भरवसा नव्हता.

बागायती क्षेत्रात वाढ

श्री. रवींद्र अमृते यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या शेतीत कामाला सुरवात केली. मित्रांसोबत आधुनिक शेतीविषयी माहिती मिळवू लागले. त्यामध्ये त्यांना शेततळ्याची कल्पना आवडली. मग त्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ३0×३ox३ मीटरचे शेततळ्याच्या कामाला सुरवात केली. शैततळ्यातील पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने शैतीला करण्याचे ठरले. त्यामुळे १५ ते १८ एकर क्षेत्र बारमाही झाले. याच यशामुळे आणखी दुसरे ४ox७0×५ मीटरचे शेततळे पूर्ण केले. त्यामुळे एकूण २२ ते २५ एकर क्षेत्र बागायती झाले. त्यामध्ये कांदा, गहू, ज्वारी इ. पिके घेतली जाऊ लागली.

मत्स्यशेतीला सुरवात

दोन वर्षांपूर्वी नगर येथे 'आत्मा'अंतर्गत दीपंकार संस्थेच्या प्रशिक्षण वर्गात शैततळ्यातील मत्स्यशैतीबाबत माहिती मिळाली. शैततळयात ८ ते १० महिने पाण्याचा वापर करून अधिकचे उत्पन्न घेण्याचे ठरले. ऑगस्ट २०१३ मध्ये नगर येथून दोन तलावांसाठी १५ पिशव्या मत्स्थबीज आणले. प्रत्येक पिशवीत अंदाजित ५oo, अध्या बोटाएवढी माशांची पिले होती. त्यांत कष्टला, रोहू, मृगळ, सिपीनस (पोपट) यांचा एकत्रित समावेश होता. पिशव्या नगरहून आणल्यानंतर एक-एक करून पाण्थात सोडल्या. त्याच दिवशी ३ox५ox५ मीटर आकाराच्या तळ्यात अंदाजे २० केिली शेण, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन किलो झाले. नंतर खाद्य म्हणून भरडधान्य पीठ करून दर दोन दिवसांनी अंदाजे 1 किलो दिले.

उत्पन्नात भर

एक वर्षांनंतर मासे काढायचे ठरले; पण पावसाळ्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे शेजारच्या गावातील मच्छीमारांशी संपर्क केला. ७० ते ८० रु. प्रतिकेिली मासे असा दर ठरुन आठवड्याला मासे काढायचे ठरले. या पद्धतीने ४ महिन्यांत ५00 किलों मासे काढ़ले. पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित उत्पन्न मिळाले. पुढच्या वर्षात मासे नगर, सोलापूर येथिल हॉटेलमध्ये विकून उत्पन्न वाढवायचे ठरले आहे. अंदाजे एक एकर जागा शैततळयासाठी वापरली आहे. त्यामुळे शेती बागायती झालीच; शिवाय त्याच पाण्यातील माश्यांच्या उत्पादनामुळे उत्पन्नात भर पडली आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

2.81818181818
Sanket Mar 03, 2017 12:06 PM

Mla ravindrh yancha contact number hva ahe mja contact number ahe 77*****46 plz mla khup aavshktha ahe

Sanket Mar 03, 2017 11:58 AM

Mla ravindrh yancha contact number hva ahe mja contact number ahe 77*****46 plz mla khup aavshktha ahe

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:14:32.384066 GMT+0530

T24 2019/10/17 06:14:32.390877 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:14:31.358843 GMT+0530

T612019/10/17 06:14:31.413271 GMT+0530

T622019/10/17 06:14:31.595820 GMT+0530

T632019/10/17 06:14:31.596920 GMT+0530