Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 01:18:53.190357 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेती मध्ये युवा चा टिकाव
शेअर करा

T3 2019/06/27 01:18:53.195912 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 01:18:53.227339 GMT+0530

शेती मध्ये युवा चा टिकाव

शेतीमधून किमान उत्पन्न मिळणे कठिण असल्याचे लक्षात आल्यामुळे बहुतेक युवा उपविकेसाठी शेती व्यतिरिक्त इतर ठिकाणी संधी शोधत आहेत.

शेतीमधून किमान उत्पन्न मिळणे कठिण असल्याचे लक्षात आल्यामुळे बहुतेक युवा उपविकेसाठी शेती व्यतिरिक्त इतर ठिकाणी संधी शोधत आहेत. ह्या समस्येवर मार्ग म्हणून School of Biodynamic Farming यानी दोन वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या मध्ये ग्रामीण युवकाना शेती शाश्वत बनविणे व फायद्याची बनवणेचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय कृषी क्षेत्रास सातत्याने वेगवेगळया गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यामधील बहुतक समस्या हया मानवनिर्मित आहेत. अयोग्य तंत्रज्ञान व चुकीच्या पध्दती आत्मसात केल्यामूळे कृषी क्षेत्र पारिभ्रमीक उदरनिर्वाह पुरतेच मर्यादित झालेले आहे सातत्याने खालवत गेलेले जिवनमान, दर्जा यामूळे बहुतेक ग्रामीण सुरुवात केलेली आहे. नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार तामीलनाडू राज्यामधील अत्यंत विदारक स्थिती समोर आलेली आहे.

ज्यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शहरी भागांमध्ये वास्तव्यास आहे. तेव्हा आपण कुठे जात आहोत? कोतिलपट्टी आणि उसीलमपट्टी येथे कार्यरत असलेल्या निर्मिती व माहीती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपन्यांकडे आपण जात आहोत कां? तर संपूर्ण राज्याला अन्नधान्य कोण पुरवणार? तेव्हा ही धोक्याची घंटा असून वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

 

शाळेचा परिसर

आपण अत्यंत तात्काळपणे ग्रामीण भागामधील तरुणांची टिम तयार करून त्यांना प्रोत्साहीत व प्रशिक्षीत करणे गरजेचे आहेकी, जे तरुण पुढे जाऊन कृषी क्षेत्रामधील नवीन आव्हानांना सामोरे जातील व शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारतील. परंतू त्यांना फक्त सेंद्रीय शेती संदर्भातच प्रशिक्षीत न करता, आधुनिक तंत्रज्ञान सुध्दा अवगत करणे गरजेचे आहे. ज्या माध्यमातून शेती आर्थिकदृष्टया परवडणारा व्यवसाय ठरेल ह्याच, दृष्टीकोणातून तामीलनाडू राज्यामधील करुर जिल्हयामध्ये ग्रामीण भागामधील गरीब विद्यार्थ्यांना येणारया वर्षांमध्ये एक प्रशिक्षित कृषी तज्ञ म्हणून तयार करण्याकरीता एक अनोखी बायोडायनॅमीक शेती शाळा सुरू केली.

जिवनाधार म्हणून यामधील विध्यार्थ्याना येणाऱ्या वर्षामध्ये एक प्रशिक्षित कृषी तज्ञ म्हणून तयार करण्याकरिता एक अनोखी बायोडायनँमिक शेती शाळा सुरु केली . जीवनाधार म्हणून यामधील विध्यार्थ्यानी फक्त सेंद्रिय सेंद्रीय शेतीचाच स्विकार न करता, पृथ्वी

च्या आरोग्यकारक अभियानाचा सुधा एक भाग व्हावे हि अपेक्षा आहे. (सेंद्रिय शेती शाळा ) The school of biodynamic farming 11 जुलै 2012 रोजी तामीलनाडू राज्यामधील करुर जिल्हयांमध्ये विनोबाजीपुरम येथे सुरू करण्यात आली. हा अभ्यासक्रम दोन वर्षीय निवासी पदविका म्हणून निःशुल्कपणे इंवा सेवा संगम या संस्थेच्या सहाय्याने सुरू करण्यांत आलेला आहे. सध्या पहिल्या बॅचमधील 7 विद्यार्थी (त्यांना बी. डी. 7 म्हणून पण संबोधिले जाते) हे दुस-या वर्षाला शिकत आहेत. हे सर्व सातही विद्यार्थी आलेले आहेत. जून 2014 मध्ये या शाळेमधून पहिली बॅच तयार होऊन निघालेली आहे.

विध्यार्थी पाणी साठवण बांधकाम शिकताना

 

 


 

 

 

 

 

सेंद्रिय शेतीमधील संपूर्णवेगवेगळ्या घटकांमध्ये कृती मधून शिकणे' या पध्दतीने विद्यार्थी प्रशिक्षीत होत आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्याक्षिकांवर जास्त भर देण्यात येतो. संपूर्ण अभ्यासक्रम हा तीन भागांमध्ये विभागला गेला ज्यामध्ये तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण, अर्धकुशल कौशल्य प्रशिक्षण व प्रात्यक्षीक शाळा , तांत्रिक कौशल्य प्रशिक्षनामध्ये विध्यार्थ्यांना वनशेती , पाणलोट, व्यवस्थापन शेतीपयोगी औजरांची देखभाल , सेंद्रिय शेती , जमीन सुपीकता , कृषी विद्या फळ बाग बियाणे , तंत्रज्ञान , प्रमाणीकरण आणि बाजारव्यवस्था इत्यादी विषयांसंधर्भात प्रशिक्षित केल्या जाते. तर अर्धकुशल कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत संवाद कौशल्य , जिवनावश्यक कौशल्य, संगणकाचा उपयोग व संस्कृती इ. विषय शिकविल्या जातात.

प्रत्येक टर्मच्या शेवटी (प्रत्येकी 3 महिन्याप्रमाणे एकूण 6 टर्म) नावाजलेल्या, सुपरिचीत सेंद्रीय शाळेवर 3 ते 4 आठवडयाचे प्रात्यक्षिक विद्यार्थी पूर्ण करतील. या प्रात्यक्षिक शाळेमधील मुख्यत्वे वेगवेगळी सेंद्रीय द्रावणं/घटक तयार करणे व त्यांचा शेतीमध्ये उपयोग जसे बायोडायनॅमीक कंपोस्ट खत, तरल खाद् सोबतच विद्यार्थ्यांना शेतीपयोगी औजारांचा वापर व देखभाल यामध्ये सुध्दा प्रशिक्षित केल्या जाते. जसे की बहुपयोगी यंत्र, निंदण मुक्ती यंत्र, फवारणी यंत्र इत्यादी. सध्याच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सेंद्रीय आणि बायोडायनॅमीक शेतांना सुध्दा भेटी दिल्यात. ज्यामध्ये विंदारा फार्म अॅरोविले, कुरींजी बायोडायनॅमीक फार्म, आणि वालडोर्फ शेती शाळा कोडायकबल विद्यार्थ्यांना एम.सी.आर.सी. चेन्नई आयोजित मातीच्या विश्लेषनाकरीता सुक्ष्म पोषक तत्वांची विश्लेषणात्मक चाचणी संदर्भात सुध्दा प्रशिक्षित करण्यांत आले. बायोडायनॅमीक असोसिएशन ऑफ इंडीया ने शेनबागबुर येथे आयोजित केलेल्या बायोडायनॅमीक प्रशिक्षणामध्ये सुध्दा विद्यार्थी सहभागी झालेत.

युवा पिढीला केवळ कृषि तत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून शिस्तबद्ध आणि झोकून देणारे ग्रामीण नागरिक बनवण्याचा हा कार्यक्रम आहे.

द्वितीय वर्षांमध्ये शिकत असतांना विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या शेतीचे व्यवस्थापण चांगल्या पध्द्तीने करता यावे याकरीता प्रमाणीकरण व बाजारव्यवस्था या संदर्भातील काही अभ्यास दौऱ्याचे आयोजन सुध्दा करण्यात येते. पुढील 10 वर्षांमध्ये अशा पध्दतीचे 1000 पेक्षा जास्त तरुण-तरुणी तयार करण्याचे आमचे नियोजन आहे की, जे 'पृथ्वीचे आरोग्यकारक अभियानामध्ये’ एक दैवीदुत म्हणून काम बघतील. या कार्यक्रमाचे महत्वाचे ध्येय असे आहे, ज्यामध्ये तरूणांना फक्त शेती क्षेत्रामधील तंत्रज्ञानामध्येच प्रशिक्षीत करणे नसून त्यांची शिस्तबद्ध समर्पित जीवनपद्धती स्विकारणी याकरिता त्यांना घडविणे आहे. या शाळेप्रमाणे घेतलेले सामुहीक पुढाकार समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

3.13333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 01:18:53.858948 GMT+0530

T24 2019/06/27 01:18:53.865327 GMT+0530
Back to top

T12019/06/27 01:18:52.991738 GMT+0530

T612019/06/27 01:18:53.017651 GMT+0530

T622019/06/27 01:18:53.179683 GMT+0530

T632019/06/27 01:18:53.180661 GMT+0530