Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:09:20.324037 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / SR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती
शेअर करा

T3 2019/06/26 11:09:20.329562 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:09:20.361195 GMT+0530

SR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती

नवीन शोध टिकवायचा असेल तर त्याला आधाराची गरज असते . तोच छोटा शोध मग क्रांती मध्ये रुपांतरीत होतो.

नवीन शोध टिकवायचा असेल तर त्याला आधाराची गरज असते . तोच छोटा शोध मग क्रांती मध्ये रुपांतरीत होतो. जर शासन/ प्रशासना मार्फत अशा नविन शोधाना ती पोचपावती मिळाली व भक्कम पाठींबा मिळाला तर अशाच एका छोट्या शोधाचा क्रांतीमध्ये रुपांतर झाल्याचे राज्यातील अन्न  - धान्याचे विक्रमी अत्पादन कसे होते हे बिहार सरकारने दाखवून दिले.

सन 2007 मध्ये सर्वप्रथम विहार राज्यातील गया जिल्ह्यात, महिला शेतकरी वर्गाला त्यांच्या शेतात SRI पद्धती वापरण्यास प्रोत्साहित  करण्याच्या एकमेव उद्देशाने मी आलो होतो. SRI पद्धतीबाबतची चर्चा मी बोधगया ब्लॉककमध्ये शेखवारा गावात आयोजीत केली होती.

सुरुवातीला मला ह्या कामात काही अडचणी येतील हे अपेक्षित होतेच. त्यावेळी हया पद्धतीला समजून घेण्याची व त्याचा वापर करण्याची शेतक-यांची अनिच्छा व अतिशय थंड अशी प्रतिक्रिया बघून मला आश्चर्यच वाटले. तेथे उपस्थित असलेल्या शेतकरयानमध्ये माझ्याबद्द  कुज़बूज़ सूरु होती. हा मानुस आपल्याला  मुर्ख समजून आपले हया पद्धतीकडे मन वळवायला आला आहे. आपण कितीतरी पिढ्यांपासून धन पिकवतो आहे . आपल्याला धनाचे तंत्र बरेच चांगले माहिती आहे. असे त्यांचे आपसात बोलणे सुरु होते  शेतकर्यांचा असा शून्य प्रतिसाद बघून, मी चर्चा संपतून बाहेर निघालो. तेवढ्यात एक महिला शेतकरी श्रीमती कुन्तीदेवी समोर आली व जणू माझ्यावर दय़ा करत तिने हया पद्धतीचा स्वतःच्या शेतावर अवलंब करण्याची इच्छा दाखविली. त्यासाठी तिला काही काळासाठी शेजारी शेतक-यांचा व कुटुंबियांचा रोष पत्करावा लागला. पण 12 ते 15 दिवसांतच SRI पद्धतीतील पिकांची स्थिती बघून इतर शेतक-यांचे मत बदलायला लागले.

नंतर पुढे जावून श्रीमती कुन्तीदेवीने एक हेक्टर जमिनीतून ९  टन धनाचे पिक काढले. तेव्हा तर बाकी शेतक-य़ांचा विश्वास पक्का झाला. ह्यानंतर शेखवारा गावातून व इतर शेजारच्या गावातून जास्तीत जास्त महिला शेतकरी वर्ग ह्या पद्धतीकडे आकर्षित झाल्या व श्रीमती कुन्तीदेवी सोबत चर्चा करायला लागह्या. अशाप्रकारे गया जिल्ह्यांतील जवळजवळ 100 पेक्षा जास्त शेतकरी व नालंदा जिल्ह्य़ांतील 25 पेक्षा जास्त महिला शेतकरी गटाने हद्या पद्धतीचा आपल्या शेतात अवलंब केला. हद्या प्रक्षेत्र शेतावर कृषिविज्ञान केंद्राचे संशोधक, बिहार कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेले शेती विज्ञान केंद्राचे संशोधक, तसेच सरकारी केंद्राचे संशोधक व आत्मा (कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था) चे संशोधक हद्यांनी भेट दिली. नंतर पिके कापणीच्या वेळी सर्व अधिकारी वर्गाला व शास्त्रज्ञांना प्रक्षेत्र शेतावर बोलावून, समोर पिकाचे उत्पन्न मोजण्यात आले होते, जे की 12.5 टन/हेक्टर असे होते.

हद्या भेटीत, मगध विभागाचे कृषिनिर्देशक उपस्थित होते. SR| पद्धतीने घेतलेल्या पिकाच्या उत्पादनातील परिणाम बघून ते चांगलेच प्रभावित झाले. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या सहकारी अधिकाच्यांना व वरिष्ठांना हद्या प्रक्षेत्र शेतावर निमंत्रीत केले. तसेच हद्या भेटीत त्यांनी जास्तीत जास्त शेतक-यांना हद्या पद्धतीकडे वळविले.

शेतक-यांचा वाढलेला प्रतिसाद बघून आम्ही येणा-या वर्षांसाठी मोठी संख्या सुनिश्चित केली. आम्हाला हद्यावेळी आशा होती की, आम्ही जवळजवळ 2000 शेतक-यांसोबत हद्या पद्धतीवर काम करू. परंतू वास्तविकता काही वेगळीच होती. जवळजवळ 5000 शेतक-यांनी ही SRI पद्धती आपल्या शेतवार राखविली. नालंदा जिल्ह्याचे जिल्हा कृषि अधिकारी व पटना येथील जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, बिहार राज्य सरकार चालवित असलेल्या 'बिहार ग्रामीण आजिविका उतेजन सोसायटी’चे मुख्य अधिकारी हद्यांनी हद्या कार्यात विशेष रूची घेतली व शेतक-यांच्या शेतावर वारंवार भेटी दिल्या. त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी व आयुक्त हद्यांनी देखील शेतक-यांच्या शेतांना भेट देवून शेतक-यांचे अभिनंदन केले व पुन्हा प्रोत्साहीत केले.

त्यांच्या क्षेत्रातील लोकांच्या खाद्यान्न सुरक्षेला कायम ठेवण्यात त्यांच्या सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.

प्रदान नावाच्या संस्थेने SR| पद्धतीवर आधारित ह्या  दोन्ही जिल्ह्यांत कार्यशाळेची साखळीच सुरू केली. त्यात शेतक-यांची SR| पद्धतीवर आधारित यशाची गीते, नाटके हद्यांचा समावेश होता. हद्यानंतर SR| शेतक-यांचे अधिवेशन व संमेलन सुरू झाले. त्यामुळे आम्ही एक संस्था म्हणून व आमच्या यशस्वी शेतक-यांना SRI शेतकरी म्हणून एक वेगळी ओळख/किर्ती मिळायला लागली. वेळोवेळी SR| शेतक-यांना त्यांच्या उत्पादनात उच्चांक गाठण्यासाठी स्वतःचे अनुभव व यशोगाथा व्यक्त करण्यासाठी शासनातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात आमंत्रित करण्यात येवू लागले. परिणामी जास्तीत जास्त शेतकरी SR| पद्धतीवर चर्चा करू लागले व हद्या पद्धतीकडे वळायला लागले. अशाप्रकारे उत्पन्न वाढायला लागले. सन 2012-13 मध्ये प्रदान आपल्या नऊ भागीदारांसह बिहारमध्ये नऊ जिल्ह्यांत सुमारे 25000 पेक्षा जास्त शेतक-यांपर्यंत पोहोखले.

श्री पद्धतीचा गहू पिकांवर प्रयोग 

सन 2006-2009 मध्ये आम्ता कडून प्रदान संस्थेला BRLPS च्या मदतीने एक छोटीशी आर्थिक मदत मिळाली होती. गया व नालंदा जिल्हयांत आम्हीSR| पद्धतीच्या तत्वांना गहू पिकावर अंमलात आणले. त्यामध्ये जवळजवळ 278 शेतक-यांचा सहभाग होता.

SR| पद्धतीने भाताच्या  पिकामध्ये मिळालेले भरपूर उत्पन्न बघून शेतक-यंनी गव्हामध्ये SR| पद्धतीला ख-यापैकी प्रतिसाद दिला. विशेषतः पेरणीच्या वेळी जास्त मजूर लागतात आणि त्याची भीती मनात असताना देखिल कमी प्रमाणात लागणारे बीज व जास्त येणारे उत्पादन या मुळे अनेक शेतकरी याकडे आकर्षित झाले. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर इतर शेतक-यांनी, स्थानिक सरकारी अधिकारी तसेच |CAR चे श्री. टी.विजयकुमार व संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली ह्यांनी SR| पद्धतीच्या शेतावर भेटी दिल्या. हया भेटी दरम्यान त्यांनी तेथील बचत  गटाच्या महिला शेतक-यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी SR| व SR| पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतक-यांच्या यशोगाथा ऐकून त्यांच्या आनंदात सहभागी झाले. इथे भेट देणारा प्रत्येक अधिकारी हद्या पद्धतीने शेती करणा-या प्रत्येक महिला शेतक-यांचे प्रयत्न व त्याचे परिणाम बघून आश्चर्यचकित झाला. सन 2009-2010 वर्षाअखेर आम्ही 15000 पेक्षा जास्त SR| पध्दतीने गव्हाचे उत्पादन घेणा-या शेतांची मोजणी केली.

इतर यशस्वी प्रकल्प

सन 2008-2009 मध्ये टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहयोगाने प्रदान संस्था Diversion Based Irrigation प्रकल्प राबवीत होती. ह्या  प्रकल्पाचाच एक छोटा भाग म्हणून आम्ही गया जिल्ह्यात SR| पद्धतीने वांगी, टमाटर, कारले. मिरचीचे प्रयोग घेतले. हद्या प्रयोगांनी सुद्धा भारतातील सर्व संशोधकांचे लक्ष वेधून घेतले. SR| भाजीपाला शेतावर हैद्राबाद येथील National Institute of Rural Development  चे शास्त्रज्ञ व फीलीपाईन्सहून |RR| चे शास्त्रज्ञांनी भेट दिली. गया जिल्ह्ययांतील DRDAचे निर्देशक व इतर शासकीय अधिका-यांनी हद्या SR| भाजीपाला पद्धतीचा व DB| प्रकल्पाचा बारकाईने विचार केला व अभ्यास केला. परिणामी अशा प्रकारच्या ब-याच प्रकल्पांना विभागामार्फत किंवा गांवातील गटांच्या माध्यमातून राबविण्यास मान्यता दिली.

सन 2009-2010 मध्ये प्रदान ला आत्मा कडून मोहरीचे उत्पन्न वाढविण्यासाठी एक प्रयोगशील प्रकल्प राखविण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. हद्या प्रयोगाचे वैशिष्ट्य़ हे होते की, हद्या दरम्यान वेगवेगळया विभागाच्या शास्त्रज्ञांमध्ये ज्ञानाची व माहीतीची चांगलीच देवाणघेवाण झाली. स्थानिय शासनासाठी SR|मोहरीचे वाढलेले उत्पन्न खरोखरच आश्चर्याचा विषय होता. हद्यानंतर प्रदानळा गया जिल्ह्यांतील11 ब्लॉकस् मधील महिला शेतक-यांसाठी SR| पद्धतीवर आधारित मोहरी पिकावर महिला शेती शाळा राखविण्यास आर्थिक सहाय्य मिळाले.

सन 2012 मध्ये आम्हीSR| पद्धतीचा वापर करून सुरणावर प्रयोग घेवून पाहिला. हद्या पिकांवर सुद्धा SR| पद्धतीचा फार चांगला परिणाम दिसून आला. बरेच शेतकरी हद्या पद्धतीकडे वळले.

इतर पिकांवर प्रयोग घेतांना असे लक्षात आले की, SR| पद्धतीचे एकच तत्व आहे की, हद्या पद्धतीत मुळांना योग्य रितीने वाढण्यास जास्तीत जास्त जागा मिळते. हळूहळूSR| पद्धती शेतक-यांमध्ये खुपच लोकप्रिय झाली. स्थानिक गावांमध्ये SR| हा शब्द आदर व सौभाग्यचिन्ह म्हणून वापरण्यात येते. म्हणून बिहारमध्ये हद्या पद्धतीला सर्वत्र SR| विधी म्हणून ओळखल्या जावू लागले. ग्रामस्थांमध्ये व अगदी शासन दरबारी ही पद्धती सर्वत्र बोलण्यात येऊ लागली.

विशेष आकर्षण सन 2008-2009 मध्ये पटना येथे राज्यस्तरीय SR| धानासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हद्या कार्यशाळचे उद्घाटन बिहारच्या कृषिमंत्री डॉ. श्रीमती रेणूकुमारी कुशवाहा हद्यांच्या हस्ते करण्यांत आले. SR|  शेतक-यांनी विशेषतः महिलांनी केलेली प्रगती बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.

सन 2009 च्या पहिल्या महिन्यात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कार्यशाळेला 2500 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. सोबतच मुख्यमंत्री श्री. नितीशकुमार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हद्या कार्यशाळेला गया येथील महिला शेतकरी श्रीमती भारतीदेवी यांना आपले SR| पद्धतीबद्दलचे अनुभव बोलायला निमंत्रित करण्यांत आले होते. त्यांनी एक हेक्टरमध्ये 18.1 टनाचे उत्पन्न घेतले होते. तिचे अनुभव व उत्पन्नाचा आकडा बघून मुख्यमंत्र्यांनी तिला 10 मिनीटांऐवजी अर्धा तास बोलायला लावले व तिची प्रशंसा केली. हद्यातून उपस्थित असलेल्या शेतक-यांना देखील धडे मिळाले.

ऑक्टोंबर 2009 मध्ये BRLPS नी महिला बचतगटाची हद्यापेक्षाही मोठी सभा आयोजीत केली. हद्या सभेत इतर स्टॉल्स सोबत SR| स्टॉलपण लावण्यात आले. हद्यावेळी मुख्यमंत्री सभेच्या उद्घाटनापूर्वीच प्रत्येक स्टॉलवर भेट देण्यास गेले. त्यांनी SR| स्टॉलवर थांबून, SR| विधीवर आधारित माहीतोपत्रके पाहीली, वाचली व SR| शेतक-यांशी चर्चा केली. त्यानंतर सभेच्या उद्घाटन प्रसंगीच्या भाषणात त्यांनी बचतगट शेतक-यांना उद्देशून वक्तव्य केले की SR| पद्धतीचा बिहारमध्ये अवलंब केल्यास खाद्यान्नाच्या समस्येवर उपाय नक्कीच मिळेल.

मोठ्या प्रमाणात प्रसार सन 2010-11 मध्ये कृषिमंत्री श्रीमती रेणूकुमारी कुशवाहा सोबत मुख्यमंत्र्यांनी गया जिल्ह्यांत खुशवारा येथे SRI गहू शेतावर भेट दिली. हद्या त्यांच्या भेटीमुळे व त्यांनी शेतक-यांशी केलेल्या चर्चेमुळे ब-याच वरिष्ठ अधिकाच्यांचा कल हद्या SR| पद्धतीकडे वाढला. त्यांनी राज्यांत SR| पद्धतीचा जास्तीत जास्त प्रचार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत 5 शेतक-यांना SR| पद्धतीसाठी आर्थिक अनुदान देण्याचे जाहीर केले. प्रत्येक विभागात SR| पद्धतीवर प्रशिक्षण आयोजीत करण्यास सरकारने PRADAN ला निमंत्रित केले. त्यानंतर आम्ही काही महिला शेतक-यांच्या मार्फत सरकारी अधिकाच्यांना व शेतक-यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 2009 व 2010 मधल्या दूष्काळानंतरही  शेतक-यांची आमच्या कार्याती3आवड कायम होती. जावून राज्यसरकारने 2011 वर्ष हे केवळ SR| वर्ष म्हणूनच नाही तर त्यास SRI क्रांती असे घोषीत केले.

SR| क्रांती वर्ष साजरे करण्यासाठी  आम्ही काही प्रचार-प्रसार सामुग्री, माहितीपत्रके तयार केली. सरकारी प्रतिनिधींनी देखील काही छापील माहीतीपत्रके तयार केले. 1 जानेवारी  2011 ला पाटना येथील एस के.

मेमोरियल सभागृहात विशेष सभेचे आयोजन करून मुख्यमंत्र्यांनी SR| क्रांती वर्षांची सुरुवात केली. हद्यावेळीच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सुमारे 2600 अधिकारी व शेतक-यांसमोर येत्या वर्षात 350000 हेक्टर जमीन SR| धान पद्धतीखाली आणण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. आर.के. सोहाने, बिहारचे कृषिप्रचार प्रबंधक व प्रशिक्षण केंद्राचे भुतपूर्व निर्देशक हद्यांनी प्रत्येक विभागात व बिहारच्या प्रत्येक जिल्ह्य़ात हद्या पद्धतीवर प्रशिक्षण कार्यशाळेची साखळीच निर्माण केली. प्रसार माध्यमांनी देखील हद्या भारतीदेवी व सुनिता देवी सारख्या शेतक-यांनी आपल्या अनुभवंची चर्चा पाटणा येथील वरिष्ठ अधिकाच्यांसोबत केली. एका गावातून दोन महिला शेतकरी व दुस-या गांवातील एक पुरूष शेतकरी हद्यांनी बिहार मध्ये 38 जिल्ह्यांतील शेतक-यांना प्रशिक्षण दिले.

हद्या सर्व प्रयत्नांचे परिणाम खूपच आश्चर्यकारक व छान होते. सन 2011-12 वर्षातील राज्य सरकारच्या अहवालात राज्यातील SR| भाताखाली असलेल्या 335000 हेक्टर जमीनीची नोंद झाली होती. त्यामध्ये सुमारे 26000 शेतकरी कुटुंबाचा समावेश होता. हद्यावर्षी बिहारमध्ये धानाचे उत्पन्न 7.2 दशलक्ष टनाच्या वर पोहोचले होते, जे की मागील वर्षात फक्त 4.2 दशलक्ष टन होते. हद्या वाढलेल्या उत्पन्नात SR| धानाचा जास्तीत जास्त वाटा होता. (प्रति हेक्टरी 7 टन) नालंदा जिल्ह्यांतील दुर्वेस्बुरा गावातील एका शेतक-याने 22.4 टन/हेक्टरी असे धानाचे उत्पादन घेतले. हद्या शेतक-याला 15 जानेवारी 2013 मध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते कृषिकरमान पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. त्यासोबतच बिहारची उत्पादन पातळी वाढण्यासाठी कृषिमंत्र्यांचा देखील गौरव करण्यात आला.

अशा ब-याच गौरवास्पद घटना बिहारमध्ये घडत आहेत, ज्याचा आम्हाला अभिमान आहे.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

 

2.90909090909
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:09:20.987187 GMT+0530

T24 2019/06/26 11:09:20.993626 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:09:20.150410 GMT+0530

T612019/06/26 11:09:20.171506 GMT+0530

T622019/06/26 11:09:20.313317 GMT+0530

T632019/06/26 11:09:20.314278 GMT+0530