অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खतांचे शाश्वत शेतीमधील योगदान

कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित बियाण्याचा वापर, रासायनेिक खतें, पीक संरक्षणाचे उपाय तसेच वेगवेगळ्या सिंचन सुविधांचा उपयोग करून घेण्यात येतो. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी लागणारी मूलद्रव्ये जसे नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून पिकांच्या वाढीसाठी वापरली जातात. जमिनीत असणारे विविध प्रकारचे जिवाणू ही मूलद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात.

जमिनीचे आरोग्य चिरकाळ टिकण्यासाठी या जिवाणूचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यात वर्षातील एकूण खतवापराच्या सर्वसाधारणपणे ५३ टक्के खतांचा वापर खरीप हंगामात, तर ४४ टक्के खतांचा वापर ख्र्बी हंगामात केला जातो. रासायनिक खतांच्या व पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे पिकांच्या उत्पादनवाढीवर परिणाम होत असतो. रासायनिक खतांमध्ये शेतकरी युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश किंवा संयुक्त मिश्रखतांचा वापर करतात.

परंतु या खतांमध्ये सूक्ष्म मूलद्रव्ये नसल्यामुळे पिकांचा पोषणाचा समतोल बिघडतो व याचा पीक उत्पादनावर परिणाम होतो. शाश्वत शैतींसाठी एकात्मिक खताचा संतुलित वापर केला पाहिजे. पिंकाना खतें देताना मातों परीक्षण करूनच खते देणे आवश्यक आहे. जमिनींचे आरोग्य व शाश्वत शैती उत्पादन यामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात सुधारणा करून जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवल्याने जमीन आरोग्यासोबतच आजची शेती शाश्वत करण्यास निश्चितच मदत होईल.

राज्यात एकूण १६५ मृद तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मातींचे परीक्षण करण्याची सुविधा जिल्ह्याच्या ठिकाणी मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेमध्यें आहेत. राज्यात २५ शासकीय तर १३१ ठिकाणी निमशासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये माती परीक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचे फायदे

  1. येणा-या २५ वर्षांत होणारे अन्नद्रव्यांचे उत्पादन लक्षात घेता पिकांच्या अवशेषातून अंदाजे १४ लाख ट्न नत्र, स्फुर्द व पालाश दरवर्षी मिळू शकxतांत.
  2. याशिवाय पिकांना लागणारी दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात.
  3. जिवाणूच्या संख्येतसुद्धा लक्षणीय वाढ होते.
  4. कुजलेल्या अवशेषांतून सेंद्रिय खतातून अज्ञद्रव्ये हळुवार उपलब्ध होऊन पिंकांना आवश्यकतेनुसार मिळत जातात.
  5. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणात व पीक उत्पादनात वाढ होते.

खत वितरण

देशात १५२ खत कारखाने असून त्यामध्ये ३o युरिया बनवणारे, १९ डीएपी व संयुक्त खते बनविणारे, ११ सुपर फॉस्फेट बनविणारे, १o अमोनिअम सल्फेट तर १ कॅल्शिअम अमोनियम नायट्रेट व १ अमोनियम क्लोराईड बनविंणारे उत्पादक आहेत.


जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे वर्गीकरण

जमिनीतील एकूण मुलद्रव्यांपैकी उत्तम पिकवाढीसाठी एकूण १६ मूलद्रव्ये / अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक आहे. जमिनीतील उपलब्ध नत्र , स्फुरद , पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि पिकाची आवश्यकता पाहून खताच्या शिफारशी केल्या जातात.

अन्नद्रव्यांची वर्गवारी उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/हेक्टर) शिफारस
नत्र स्फुरद पालाश
अत्यंत कमी १४० १०० शिफारस मात्रेपेक्षा ५० टक्के जास्त
कमी १४०-२८० ८-१४ १०१-१५० शिफारस मात्रेपेक्षा २५ टक्के जास्त
मध्यम २८१-४२० १५-२१ १५१-२०० शिफारस मात्रा
थोडे जास्त ४२१-५६० २२-२८ २०१-२५० शिफारस मात्रेपेक्षा १० टक्के कमी
जास्त ५६१-७०० २९-३५ २५१-३०० शिफारस मात्रेपेक्षा २५ टक्के कमी
अत्यंत जास्त ७०० ३५ ३०० शिफारस मात्रेपेक्षा ५० टक्के कमी

देशपातळीवर देशांतर्गत होणारे उत्पादन व लागणारी गरज यांमधील तफावत खतांची आयात करून भागविली जाते. प्रामुख्याने ही तफावत युरिया खतात मोठ्या प्रमाणावर असल्याने युरिया खताची आयात केली जाते. पोटॅश हे देशात तयार होत नसल्याने १oo टक्के आयात केले जाते.

रासायनिक खतांना केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. केंद्र शासनाच्या एकूण अनुदानापैकी अत्रसुरक्षेसाठी ५१ टक्के, खतांसाठी ३० टक्के, तर पेट्रोलियम पदार्थासाठी १२ टक्के अनुदान देत असते. ही बाब विचारात घेता, खतांचा वापर काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे. रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात व कार्यक्षमरित्या वापर करणे ही काळाची गरज आहे निश्चित करीत असते. ही गरज निश्चित करताना जिल्ह्यातील पिकांचे क्षेत्र, त्या पिकांना लागणा-या नत्र, स्फुरद, पालाश या मूलद्रव्यांची गरज, निर्देशांक, मागील तीन वर्षांचा खतांचा वापर इत्यादी बाबींचा विचार करून निश्चिती केली जाते. तसेच निश्चित केलेली मूलद्रव्यांची गरज जैविक खते व सेंद्रिय खतांद्वारे किती प्रमाणात उपलब्ध होऊन भागविली जाईल, याचा विचार करून शिल्लक गरज रासायनिक खतांच्या मात्रेद्वारे निश्चित केली जाते. लागणा-या रासायनिक खतांची केंद्र शासनाकडे मागणी केल्यानंतर केंद्र शासनामार्फत हंगामासाठी युरिया, डीएपी, संयुक्त खते व स्फुरद खतांचे आवंटन मंजूर केले जाते. या मंजूर आवंटनाचे पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे महिनानिहाय नियोजन करून त्याप्रमाणे केंद्र शासनास कळविले जाते. केंद्र शासन महिनानिहाय व कंपनीनिहाय कार्यक्रम मंजूर करून राज्य शासनास कळविते. राज्य शासनामार्फत जिल्ह्यांच्या गरजेप्रमाणे कंपनीनिहाय नियोजन करून केंद्र शासनास व कंपनीस कळविले जाते. त्याप्रमाणे पुरवठादार/उत्पादक कंपन्या राज्यात खतांचा पुरवठा करतात. राज्यात खतांचा ८० टक्के पुरवठा रेल्वेद्वारे होत असतो. त्यामुळे रेल्वे वॅगनची वेळेवर उपलब्धता, रेल्वे बंदरावरील सोयीसुविधा, वाहतूक कंत्राटदार हेदेखील वितरणव्यवस्थेतील प्रमुख भाग आहेत. खतांचा पुरवठा कंपनीमार्फत ठोक विक्रेत्याकडे व तेथून किरकोळ विक्रेत्याद्वारे शेतक-यांना होत असतो.

  1. नत्र व संयुक्त खते वितरण करणारे उत्पादक.
  2. स्फुरदयुक्त खते वितरण करणारे उत्पादक. २९
  3. जैविक खते उत्पादन करणारे उत्पादक................................ ७२
  4. खतविक्रेते.’..............................................४७८१३
  5. राज्याचे प्रमुख पुरवठादार................................. १ (आरसीएफ)
  6. सूक्ष्म मूलद्रव्ये उत्पादन करणारे उत्पादक........................... २०९,
  7. हात मिश्रखते तयार करणारे उत्पादक.................................... 9
  8. दाणेदार मिश्रखते तयार करणारे उत्पादक............................. 8
  9. खतांची वाहतूक करण्यासाठी कार्यरत रेल्वेचे मालधक्के........ ६९

सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट ,लेंडीखत  , सर्व प्रकारच्या पेंडी , मासळी खत ,हाडांचा चुरा, हिरवळीचे खत, जिवाणू खत इत्यादींचा समावेश होतो.

देशातील भविष्यातील खतांची मागणी

वर्ष युरिया डायअमोनियम फॉस्फेट नत्र व स्फुरद /नत्र ,स्फुरद व पालाश सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश
२०१४-१५ ३२०२९ १२००२ १०८६१ ५०९१ ४४९२
२०१५-१६ ३२८५८ १२२१२ १११४२ ५५१३ ४६४३
२०१६-१७ ३३६७७ १२४१३ ११४२० ५९४८ ४७९३
२०१७-१८ ३३७५४ १२७६४ ११८४१ ६४७६ ४९३४
२०१८-१९ ३४५३६ १२९५० १२३१८ ६६२६ ५०४८
सन २०१४-१५ च्या तुलनेत वाढ ८ टक्के ८ टक्के १३ टक्के ३० टक्के १२ टक्के

हि सर्व खते नैसर्गिक असतात तर रासायनिक खते ही रासायनिक प्रक्रियेतून केलेली असतात. नत्रयुक्त खतांमध्ये युरिया, अमोनियम सल्फेट ही खते येतात. स्फुरदयुक्त खतांमध्ये सुपर फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट तर पालाशयुक्त खतांमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश ही खते येतात. गेल्या काही दशकांमध्ये खत उत्पादन वाढलेले असले तरी उत्पादन आणि गरज यांमध्ये मोठी तफावत आहे. खतांचा वापर वाढत असला तरी त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढलेले नाही, ही चिंतेची बाब असून त्याचे मुख्य कारण म्हणजे खताचे व्यवस्थापन बरोबर नसणे, हेच आहे. बागायती क्षेत्रामध्ये खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीच्या पोतावर अनिष्ट परिणाम झालेला आहे.

जिवाणू खतांचा वापर

तृणधान्य पिकांसाठी अझेंटोबॅक्टर, द्विदल पिकांसाठी रायझोबिअम तर खताचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  1. बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.
  2. नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
  3. नत्र व स्फुरद खतांची २५ टक्के बचत होते.
  4. पीक उत्पादनात १o ते १५ टक्के वाढ होते.

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. हिरवळीच्या खतांचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या, पाने कापून शेतात गाडतात. (उदा. गिरिपुष्प, शेवरी, सुबाभूळ इत्यादी) तसेच हिरवळीच्या खतांचे पीक उदा. धैचा, ताग, चवळी, सोयाबीन इत्यादी शेतात फुलोच्यापूर्वी जमिनीत गाडतात. त्यामुळे जमिनीत सूक्ष्मजिवांची वाढ होते. सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया वाढते. जमिनीतील कर्ब : नत्र प्रमाण सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शेणखत, लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडींची खते (भुईमूग, सरकी, लिंबोळ्या इ.), हाडांचा चुरा, मासळी खत, नॅडेप खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांमध्ये शेतातील पालापाचोळा, काडीकचरा व गवत मिसळून जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो.

या देशात रासायनिक खतांच्या वापरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने व देशांतर्गत रासायनिक खतांचे उत्पादन अपुरे पडत असल्याने उर्वरित रासायनिक खतांची गरज भागविण्यासाठी आयात खतांवर अवलंबून राहावे लागते. रासायनिक खते आयात करण्यासाठी आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. खतांच्या वाढत्या वापरामुळे पाण्यातील नायट्राइटची पातळी वाढल्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे ही खते अनेक प्रक्रियांमुळे स्थिर होऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत. यामुळे एवढी महागडी खते वापरूनही खते अशा प्रकारे वाया खर्च कमी करून उत्पादनवाढीसाठी उपाययोजना करणे काळाची गरज ठरली आहे. केंद्र शासनाने युरिया खताचा सुयोग्य वापर व अपव्यय टाळण्यासाठी १00 टक्के युरिया खत निम विलेपित (Neem Coated) करण्याचे धोरण निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी रासायनिक खतांचा वापर करताना पुढील तसेच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापरसुद्धा होईल.

  1. शेतक-यांनी शेतातील मातीचे पृथ:करण करूनच शिफारशीप्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात.
  2. शेतक-यांनी नत्र, स्फुरद व पालाश यांचा वापर ४ : २ : १ या प्रमाणात करावा.
  3. खते देताना नेहमी दोन चाड्यांच्या पाभरीने किंवा मुळाजवळ द्यावीत.
  4. नत्रयुक्त खते, सूक्ष्म मूलद्रव्ये पुरविणारी खते, द्रवरूप खते फवारणी करुन दिल्यास वाया जात नाहीत. तसेच उत्पादनात वाढ होण्यासाठी निश्चित उपयोग होती.
  5. ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यास खतांची कार्यक्षमता वाढते.
  6. पिकांच्या अवस्थेनुसार खतांच्या मात्रा देणे.
  7. संयुक्त खतास पर्याय म्हणून सरळ खते वापरून घरच्या घरी मिश्रखत तयार करणे आवश्यक आहे.
  8. रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय, जैविक तसेच हिरवळीच्या व कंपोस्ट अशा प्रकारे काळजी घेतल्यास खतांमध्ये बचत होऊ शकते.

याशिवाय, एकात्मिक खत व्यवस्थापनांतर्गत खतांच्या वापराबरोबर जैविक खतांचा, हिरवळीच्या खतांचा व कंपोस्ट खत यांचाही वापर केल्यास रासायनिक खतांची उपयुक्तता वाढण्यास मदत होते.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate