অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धिंगरी अळिंबी उत्पादन व विक्री व्यवस्थापन

धिंगरी अळिंबी उत्पादन व विक्री व्यवस्थापन

अळिंबी म्हणजे  अगॅंरीकस प्रवर्गातील ल खाण्यायोग्य बुश्शीचे फळ होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळं येतात, त्या फळांस अळीम्बी  किंवा भूछत्र असे म्हणतात. अळंबीचे  निसर्गात अनेक  प्रकार आढळून येतात. धिंगरी अलीम्बीस शिंपला अळीम्बी किंवा आपल्या पौष्टिक आहारात महत्वाचे स्थान आहे ओल्या आळंबीमध्ये २.७८ टक्के प्रथिने , ०.६५ टक्के स्निग्ध पदार्थ ४.४ टक्के खनिजे  पिष्टमय पदार्थ , ०.९७ टक्के खनिजे ,१.०८ टक्के तंतुमय पदार्थ असून ९० टक्के पाणी असते.खानिजांपैकी पालाश ,स्फुरद,कल्शीयम ,लोह,सोडियम,इत्यादी घटक आहेत. अळिंबतील प्रथिनांमध्ये शरीरास पोषक व अवश्यकत्या सर्व अमिनो आम्लाचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनापेक्षा उच्च प्रतीची व पचनास हलकी असतात .तसेच अमिनो अम्लापैकी ट्रीपटोफॅन लायसीन आणि मिथोनाईन मोठ्या प्रमाणात असतात. जीवनसत्वे ब-१,ब-२ व क यांचे प्रमाणही इतर अन्नघटकांपेक्षा जास्त आहे. अळीबित असणाऱ्या विविध औषधी गुणधर्मामुळे प्रामुख्याने लठ्ठपणा ,उच्च रक्तदाब  , ह्दयरोग , मधुमेह ,कर्क रोग , फुफुसाचे रोग , विषाणुजन्य आणि जीवनुजन्य  रोग प्रतीबंधास अगर उपचारास विशेष उपयोग होतो. त्यामुळे आहारातील वापर व वैद्यकीयदृष्ट्या धिंगरी अळिंबिस अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळेच अळिंबीस हेल्थ फूड म्हणून आहारात महत्वाचे स्थान आहे.

धिंगरी अळिंबी लागवडीची सुधारित पद्धत

अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून धिंगरी अळिंबाची लागवड सहज करता येतं. महाराष्ट्रातील हवामान  धिंगरी  अळिंबीस अनुकूल असल्याने  वर्षभर लागवड करणे शक्य आहे.

लागवडीसाठी जागेची निवड

अळिंबीच्या लागवडीसाठी उन , वर  पाऊस यापासून संरक्षण  hहोईल अशा निवाऱ्याची गरज असते . पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड , अछादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र  सूर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी लागते.

लागवडीसाठी माध्यम

धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांची आवशकता असते. यासाठी शेतातील पिकांचे अवशेष , भातपेंढा, गव्हाचे काड,ज्वारी,बाजरी,मका,यांची ताटे व पाने , भुईमुगाच्या शेंगाची टरफल ,वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो .

लागवडीसाठी वातावरण

अळिंबच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० अंश से.ग्रे. व हवेतील आद्रता ६५ ते ९० टक्के असणे आवश्यक आहे. यासाठी लागवडीच्या ठिकाणचे तापमान व आद्रता यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर , हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रेपंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. सर्वसाधारण २५ अंश से.ग्रे.या तपमानास अळिंबची उत्तम वाढ होते.

लागवडीची पद्धत

काडाचे २ ते ३ से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ८ ते १० तास बुडवून भिजत घालावे .काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जड पाण्याचा निचरा करावा .

काड निर्जंतुकीकरण

काड निर्जंतुकीकरणासाठी प्रामुख्याने तीन पद्धतीचा वापर केला जातो.

  1. उकळत्या पाण्यात भिजविलेल्या काडाचे पोते ८० अंश से.ग्रे. तापमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे.
  2. गरम वाफेवर भिजवलेल्या काडाचे पोते ८० अंश से.ग्रे. तपमानास १ तास निर्जंतुक करावे किंवा
  3. निर्जान्तुकीसाठी ७.५ ग्रम बाविस्टीन ( बुरशीनाशक) व १२५ मी.ली. फोर्मेलीन (जंतुनाशक )१०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये वाळलेले काड पोत्यात भरून १६ ते १८ तास भिजत ठेवावे. नंतर काडाचे पोते बाहेर काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी तिवईवर पोत्यासह सावलीत ठेवावे.

काड ३५ × ५५ सें.मी. आकाराच्या ५ टक्के फॉर्मलीनमध्ये निर्जतुक केलेल्या प्लॅस्टिक पिशव्यामध्ये थर पद्धतीने भरावे. ५ टक्के फॉर्मलीनचे द्रावण फवारून निर्जतुक केलेल्या बंदिस्त जागेत हे काम करावे. काडाचा 'बेड' भरताना प्रथम ८ ते १o सें.मी. जाडीचा काडाचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २ टक्के असावे. काड व स्पॉन याचे ४ ते ५ थर भरावे. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दो-याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या सहाय्याने छिद्रे पाडावीत. अळिंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी भरलेल्या पिशव्या निवा-याच्या जागेत मांडणीवर ठेवाव्यात. त्यासाठी २५ ते २८ अंश सें.ग्रे. तापमान अनुकूल असते. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास १० ते १५ दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यांनी कड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो. यासच बेड असे म्हणतात.

पिक निगा

धिंगरीचे प्लॅस्टिक पिशवी काढलेल्या मांडणीवर किंवा बेड धिंगरीचे प्लॅस्टिक पिशवी काढलेल्या बेड मांडणीवर दोरीच्या शिंकाळ्यावर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमिनीवर व भिंतीवर पाणी फवारून तापमान (२५ ते ३० अंश सें.ग्रे.) व हवेतील आर्द्रता (६५ ते ७५ टक्के) नियंत्रित करावी. ३ ते ४ दिवसात बेडच्या सभोवताली अंकुर (पीनहेड) दिसू लागतात व पुढील ३ ते ४ दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन काढणीस तयार होतात.

पाणी व्यवस्थापन

अळिंबी पिष्ठमय व तंतुमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते. प्लॅस्टिक पिशवीतून बेड काढल्यानंतर धिंगरी वाढीच्या काळात बेडवर दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची लहान नोझल असलेल्या स्प्रेष्पपाने हलकी फवारणी करावी. अळिंबीच्या बुरशीच्या वाढीच्या काळात पाणी फवारण्याची गरज नसते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान २0 ते ३० अंश सें.ग्रे. व आर्द्रता ७0 ते ९० टक्के ठेवणे आवश्यक आहे.

पीक संरक्षण

अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशवंत व अल्पमुदतीचे पीक आहे. उगवणीसाठी वापरण्यात येणा-या काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जतुकीकरण न झाल्यास तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास तात्काळ रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.

काढणी

पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसात करावी. काढणीपूर्वी १ दिवस अगोदर अळिंबीवर पाणी फवारू नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार राहते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी देठाला धरून पिरगळून काढणी करावी. दुसरे पीक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर अलगद काढावा. दिवसातून २ ते ३ वेळा नियमितपणे पाणी फवारावे. ८ ते १० दिवसांनी दुसरे पीक तयार होते. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारणपणे ३ किलो ओल्या काडाच्या (१ किलो वाळलेले काड) एका बेडपासून ४० ते ४५ दिवसात १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते.

उत्पादन

काडाच्या निर्जतुकीकरणापासून ते काढणीपर्यंत योग्यरित्या व्यवस्थापन केल्यास या धिंगरी अळिंबीचे चांगले उत्पादन मिळते. सर्वसाधारणपणे १ किलो वाळलेल्या काडापासून १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील धिंगरी अळिंबीचे सरासरी उत्पादन हे देशपातळीवरील बंदिस्त जागेत व नियंत्रित वातावरणात घेण्यात येत असल्याने उत्पादकता कमी अधिक फरकाने जवळपास सारखीच आहे. म्हणजेच १ किलो वाळलेल्या काडापासून १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते. अळिंबी शेतात येत नसल्याने क्षेत्राचा उल्लेख करता येणार नाही. तथापि, देशात धिंगरी अळिंबीचे वार्षिक उत्पादन ६३९९ मे.टन आहे व महाराष्ट्राचे वार्षिक उत्पादन २00 मे. टन आहे. धिंगरी अळिंबीच्या एकूण उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य भारतात पाचव्या स्थानावर आहे. देशात तमिळनाडू, पंजाब, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पं.बंगाल, ईशान्य भारतातील राज्ये इ. राज्ये धिंगरी अळिंबीच्या उत्पादनात आघाडीवर आहेत, कारण या राज्यात अळिंबीची भाजी खाणा-या लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अळिंबीची मागणी असल्याने उत्पादनही अधिक घेतले जाते. जगामध्ये २५ देशात अळिंबीचे उत्पादन घेतले जाते व धिंगरी ८८ टक्के उत्पादन हे एकट्या चीन देशात घेतले जाते व सर्वसाधारण भारताचा हिस्सा 0.१ टका इतका आहे.

भारतातील धिंगरी अळिंबी उत्पादन घेणारे आघाडीवरचे राज्ये पुढीलप्रमाणे आहेत.

राज्य वार्षिक उत्पादन (मे.ट.)
तामिळनाडू २०००
पंजाब २०००
ओरिसा ८१०
केरळ ५००
महाराष्ट्र २००
हिमाचल प्रदेश ११०
आसाम १००
त्रिपुरा १००
अंदमान आणि निकोबारची बेटे १००
हर ८०

अळिंबीची साठवणूक

ताजी अळेिबी पालेभाजीप्रमाणे अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. काढणीनंतर काडीकचरा बाजूला काढून स्वच्छ अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यामध्ये दोन दिवस टिकू शकते. फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास अळिंबी उन्हामध्ये वाळवावी. अळिंबी उन्हामध्ये दोन ते तीन दिवसात पूर्णपणे वाळते. वाळलेली अळिंबी प्लॅस्टिक पिशवीत सिल करून (हवाबंद) ठेवल्यास ती सहा महिन्यापेक्षा अळिंबीच्या वजनाच्या १/१० इतके कमी होते.

काढणीपश्चात तंत्रज्ञान

काड अथवा काडी- कचरा वेगळा करावा. हे काम हातानेच करावे लागते. कारण अळिंबी काढून ती स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरता येत नाही. पाणी वापरले तर अळिंबी कुजते व जास्त काळ टिकत नाहीत. धिंगरी अळेिबी १oo गेजच्या पॉलिथिन पिशवीत भरुन तात्काळ बाजारात विकणे सोईस्कर ठरते. ओली अळिंबी प्लॅस्टिक पिशवीत २ दिवस चांगली राहू शकते. ओली अळिंबी १oo गेजच्या प्लॅस्टिक पिशवीत भरुन १o अंश सें.ग्रे. तापमानास फ्रीजमध्ये ठेवल्यास ४ दिवसांपर्यंत चांगली राहते. धिंगरी अळिंबी ५ ते ७ अंश सें.ग्रे. तापमानास ठेवल्यास अळिंबीतील कोणतेही अळिंबी शिल्लक राहिल्यास २ ते ३ दिवस उन्हात वाळवावी किंवा वाळवणी यंत्रात ६ ते ७ तास ठेवावी. अशाप्रकारे वाळलेली अळेिबी प्लॅस्टिक पिशवीत अथवा हवाबंद डब्यात ठेवल्यास ६ महिन्यांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते. वाळलेली अळिंबी अथवा त्याची पावडर फ्रिजमध्ये ठेवू नये.

वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या १/१० इतके कमी होते. म्हणजेच १ किलो ओल्या अळिंबीपासून १०० ग्रॅम सुकी अळिंबी मिळते. अळिंबी कोमट पाण्यात १o ते १५ मिनिटे ठेवल्यानंतर ताज्या अळेिबीसारखी तयार होते व ती खाण्यासाठी वापरु शकतो. तसेच वाळलेल्या धिंगरी अळिंबीची पावडर करून ठेवता येते व पाहिजे तेव्हा खाण्याचे पदार्थ तयार करताना त्यामध्ये वापरता येते किंवा सूप तयार करण्यासाठी वापरता येते. जर अळिंबीचे उत्पादन जास्त असेल तर प्रतवारी करून ताजी अळिंबी शीतपेटीत ठेवून प्रिकुलींग वाहनातून वेगवेगळ्या शहरात पाठविता येते. काढल्यानंतर त्यावर भाजीपाला व फळे याप्रमाणे कॅनिंगची प्रक्रिया करून १ वर्षांपेक्षाही अधिक काळ साठवून ठेवता येते. ताज्या अळिंबीवर ब्लॅचिंगची प्रक्रिया करून फ्रीज ड्रायरमध्ये वाळवून नंतर हवाबंद डब्यामध्ये भरुन विक्रीस पाठविता येते. अशाप्रकारे प्रक्रिया केलेली अळिंबी ३ ते ४ महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकते.

अळिंबी पिकातील नवे संशोधन व तंत्रज्ञान

अळिंबी पिकावर प्रामुख्याने सन १९८३ नंतर महाराष्ट्रात संशोधनास खात होते. परंतु जंगलात विषारी, औषधी व खाण्यायोग्य अशा अनेक अळिंबीच्या प्रजाती नैसर्गिकरीत्या पावसाळ्यात किंवा अनुकूल वातावरणात इतर सर्वसाधारण शहरी लोकांना याचे ज्ञान नव्हते. त्यामुळे अळिंबीचा वापर होत नव्हता. अलिकडच्या दोन दशकात अळिंबीवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले असून प्रयोगशाळेत तपासणी व चाचण्या करून कृत्रिमरीत्या अळिंबीचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. या संशोधनाच्या काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

  1. अळिंबीतील अन्नघटक, विषारी घटक व औषधी गुणधर्म ओळखण्याची पद्धती व तंत्रज्ञान, प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले.
  2. जंगलात नैसर्गिकरीत्या वाढणा-या अळिंबीचे सर्वेक्षण व संवर्धन करून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले.
  3. खाण्यायोग्य व औषधी गुणधर्म असलेल्या अळिंबीचे प्रयोगशाळेत सविस्तर पृथ:करण करण्यात आले व त्यामधील घटक पदार्थ शोधून काढण्यास यश आले.
  4. अळिंबीपासून प्रयोगशाळेत त्यांचे बीज (स्पॉन) तयार करण्यास यश आले.
  5. अळिंबीच्या विविध जातींचे बीज (स्पॉन) तयार करून कृत्रिम खाद्यावर वाढविण्याचे संशोधन करण्यात आले.
  6. शेतीतील निरुपयोगी अवशेष व विविध काडीकचरा यावर अळिंबी उत्पादन घेणे शक्य झाले.
  7. अळिंबी उगवणीसाठी वापरण्यात येणारे काड निर्जतुकीकरणाच्या विविध पद्धती शोधण्यात आल्या.
  8. धिंगरी अळिंबीच्या खाण्यायोग्य विविध जाती निवड पद्धतीने व संकरिकरणातून विकसित करण्यात आल्या.
  9. विकसित केलेल्या धिंगरी अळिंबीच्या नवीन जाती या अधिक उत्पादन देणा-या, खाण्यास पौष्टिक व जास्त काळ टिकून राहणा-या आहेत.
  10. धिंगरी अळिंबीपासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करण्याच्या पद्धती विकसित करण्यात आल्या व अनेक पाककृती तयार करण्यात आल्या.
  11. विविध प्रकारच्या अळिंबीसाठी वेगवेगळ्या लागवड पद्धती विकसित करण्यात आल्या.

देशातील संशोधन, तंत्रज्ञान व मार्केट

जगात एकूण उत्पादनात आघाडीवर असणा-या देशात या अळिंबीवर सतत संशोधन चालू आहे. तेथील तापमान, आर्द्रता व हंगाम याप्रमाणे तंत्रज्ञान उत्पादकाला उपलब्ध आहे. तापमान २0 ते ३० अंश सें.ग्रे. व आद्रता ७० टक्कयांच्या पुढे नियंत्रित करण्याचे तंत्रज्ञान वापरल्यास असणा-या देशामध्ये अळेिबीची भाजी व उपपदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने अळिंबीच्या फळांना बाजारात मागणी अधिक असून दरवर्षी ५ ते ७ टक्क्यांनी मागणी वाढत आहे. या देशात प्रतिमाणसी अळेिबी खाण्याचे प्रमाण वार्षिक २ ते ३ किलोग्रॅम आहे व हेच प्रमाण भारतात २० ते २५ ग्रॅम आहे. त्यामुळे भारतात व पर्यायाने महाराष्ट्रात धिंगरी अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे. महाराष्ट्रात अळिंबी खाण्याबाबत विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात दररोज ताज्या पालेभाज्या खाण्याचा प्रघात असून त्यांची  उपलब्धताही आहे. तसेच अळिंबीपेक्षा या पालेभाज्या स्वस्तही आहेत. त्यामुळे अळिंबी खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल कमी आहे. तथापि जनजागृती करून अळिंबीचे महत्व पटवून दिल्यास या पिकाची बाजारपेठ निश्चित वाढेल , असे अनुमान काढता येईल .

बियाणे

बियाणे (स्पॉन) पुरवठा पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या केंद्रातून ५०० ग्रॅमच्या पॉलीप्रोपीलीन पिशव्यामधून रु ७० प्रती किलो प्रमाणे केला जातो. बियाणे पार्सलने पाठविले जात नाहीत . तसेच बियाणे जास्त प्रमाणात हवे असल्यास १० ते १५ दिवस  अगोदर  ५० टक्के आगाऊ रक्कम भरून मागणी नोंदवावी

प्रशिक्षण

धिंगरी अळिंबी लागवडीचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दिले जाते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस रु ५०० एवढे शुल्क आकारले जाते.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate