অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाचणीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

नाचणीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

नाचणी ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून तिच्यामध्ये पोषणद्रव्ये, अॅमिनो आम्लें आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळतात. आहारात दररोज नाचणीचा समावेश केल्यास शरीरास चांगले फायदे होतात

  1. नाचणीमध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
  2. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असून पचनास ती हलकी आहे.
  3. कर्बोदकांचे प्रमाण जास्त असून स्निग्धांशाचे प्रमाण कमी आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येते तसेच उच रक्तदाब टाळला जाऊ शकतो. नाचणीच्या सेवनामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते.
  4. लेसिथीन आणि मिथिओनाईन या अॅमिनो आम्लांमुळे पित कमी करण्यासाठी व यकृतामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

नाचणीची भाकरी खायची झाल्यास अगदी लहान मुलापासून प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार केल्यास त्यांचा आपणाला रोजच्या आहारात समावेश करता येईल. नाचणीपासून पापड, बिस्किटे, केक, चकली, लाडू, ढोकळा, उपमा यासारखे पदार्थ बनविता येऊ शकतात .

केक

साहित्य : १ वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी पिठीसाखर, ३ अंडी, ६० ते ७0 ग्रंम बटर (लोणी), 1 चमचा बेकिंग पावड़र, २ चमचे कोको पावड़र, २ चमचे हेंनिला इसेन्स

कृती:

  1. प्रथम नाचणीचे पीठ, बेकिंग पावड़र आणि कोको पावड़र एकत्र करून २-३ वेळा चाळून घ्यावे.
  2. स्टीलच्या पातेल्यात बटर आणि पिठीसाखर एकत्र करून घ्यावे.
  3. अंडी फोडून अंड्यातील पिवळा बलक बटर आणि पिठीसाखरेच्या मिश्रणात टाकावा आणि पांढरे अलब्युमीन वेगळ्या पातेल्यात काढून घ्यावे.
  4. पिवळा बलक टाकलेले मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.
  5. पांढरे अलब्युमीनदेखील चांगले फेटून घ्याचे व नंतर वरील मिश्रणात ओतावे.
  6. आता हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे आणि त्यात दोन-तीन चमचे नाचणीचे पीठ चांगले एकजीव करावे.
  7. सर्व पीठ टाकून झाल्यावर पुन्ह्या ते चांगले फेटाचे आणि त्यात दोन चमचे व्हॅनिला इसेन्स टाकून केकच्या भांड्यात मिश्रण ओतून ते गॅसवर ठेवावे.
  8. साधारण अध्यां तासात कैक तयार होतो. टीप : केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून थोडे नाचणीचे पीठ टाकून भुरभुरून घ्यावे; त्यामुळे केक केकपात्राला चिकटणार नाही.

लाडू

साहित्य : २ वाट्या नाचणीचे पीठ, १ वाटी पिठीसाखर, १५० ग्रॅम

साजूक तूप, आचड़त असल्यास वेलची पावड़र

कृती :

  1. प्रथम नाचणीचे पीठ थोड़े-थोड़े तूप घालून चांगले खरपूस परतून घ्यावे.
  2. पीठ गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून एकजीव करावे.
  3. चांगले एकजीव झाल्यावर लाडू वळावेत.


चकली

साहित्य : १ वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी गव्ह्याचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, तीळ, ओवा, १ चमचा बटर चवीप्रमाणे व आवडीनुसार.

कृती:

  1. प्रथम नाचणीचे पीठ आणि गन्ह्याचे पीठ एकत्र कॉटनच्या कपड्यात बांधून कुकरची एक शिटी करावी.
  2. प्रेशर गेल्यावर हे पीठ कुकरमधून बाहेर काढून गरम असतानाच फोडून घ्यावे.
  3. नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग, ओवा, पांढरे तीळ आणि बटर टाकून पीठ थंड पाण्याने भिजवावे आणि चकल्या कराव्यात.

ढोकळा

साहित्य : २ वाटया नाचणीचे पीठ, २ वाट्या पाणी, 1 इनों पॅकेट, ४ चहाचे चमचे साखर, २ चहाचे चमचे कचे गोडेतेल, मीठ चवीनुसार.

कृती:

  1. प्रथम नाचणीचे पीठ पातेल्यात घेऊन त्यात २ वाट्या पाणी घालून
  2. त्यात साखर, कचे तेल आणि चवीपुरते मीठ घालून पुन्हा चांगले एकजीव करावे.
  3. वरील सर्व साहित्य एकजीव झाल्यावर त्यात इनोचे पूर्ण पाकोट टाकाचे आणि पुन्हा एकजीव करावे.
  4. पीठ हलके झाल्यावर लगेच ताटाला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे.
  5. कढईत पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर कढईत हे ताट ठेवून वरून दुसरे ताट झाकून २५ ते ३० मिनिटे ठेवावे. साधारण अध्यां तासात ढोकळा तयार होतो. ह्या ढोकळा टोमॅटो सॉस किंवा खोब-याच्या चटणीसोबत सर्व्ह करावा.

नानकटाई

साहित्य : १ वाटी नाचणीचे पीठ, पाच वाटी बेसन, अधीं वाटी पिठीसाखर, अर्थी वाटी तूप, अर्धा चमचा बेकिंग पावडर, १ चमचा हॅनिला इसेंन्स, शोभेसाठी तीळ.


कृती :

  1. प्रथम तुपामध्ये पिठीसाखर घालून ते चांगले हलके होईपर्यंत मिसळावे.
  2. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर आणि इसेन्स घालून पुन्हा चांगले एकत्र करुन घ्याव

  3. उपमा

    साहित्य : अधीं वाटी नाचणीचे पीठ, अधीं वाटी रवा, २ वाट्या पाणी, १ टेबलस्पून तेल, २ हिरव्या मिरच्या, १ छोटा कांदा, कोथिंबीर, फोड़णीकरिता जिरे-मोहरी, चवीनुसार मीठ व साखर.

    कृती :

    1. प्रथम रवा थोडे तेल टाकून खरपूस भाजून घ्यावा. नंतर नाचणीचे पीठ थोड्या तेलावर खरपूस भजावे.
    2. कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर जिरे-मोहरीची फोडणी करून
    3. कांदा थोडा सोनेरी झाल्यावर त्यात भाजलेले नाचणीचे पीठ आणि रचा घालून परतावे. त्यात चवीप्रमाणे डिशमध्ये मीठ, साखर घालून २ वाट्या गरम पाणी घालाचे व चांगली वाफ आणाची.
    4. ड़िशमध्ये चरून कोथिंबिर, खोबरे, लिंबू घालून सर्व्हे करावें.

 

    स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

     


अंतिम सुधारित : 8/4/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate