অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोरडवाहू शेती - उपाययोजना

कोरडवाहू शेती - उपाययोजना

  • या वर्षीच्या अपरिहार्य परिस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर + एरंडी आणि धने यांची लागवड करावी.
  • उशिरा पेरणीसाठी शक्‍यतो सरळ वाणांचा वापर करावा. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीसाठी 25 टक्के अधिक हेक्‍टरी बियाण्याचा वापर करावा व रासायनिक खताची मात्रा 25 टक्‍क्‍यांनी कमी करावी.
  • पीकवाढीच्या काळात 15 ते 20 दिवसांची उघडीप असल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेत तणविरहित ठेवावे. निंदणी, खुरपण किंवा तणनाशकांचा वापर करून तण नियंत्रण करावे.
  • सोयाबीन या पिकात उगवणीनंतर 15-20 दिवसांनंतर इमॅझीथापर हे तणनाशक 300 मिली प्रतिएकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • कपाशी या पिकामध्ये रूंद पानाच्या तणाच्या नियंत्रणासाठी पायरीथायोबॅक सोडियम हे तणनाशक 250 मिली, तर एकदल वर्गीय तणासाठी क्विझॉलफॉप इथाईल 180 मिली प्रतिएकरी 200 लिटर पाण्यात मिसळून तणांवर फवारावे. तणांची अवस्था 2 ते 4 पानांवर असावी.
  • पावसाने उघडीप दिल्यास हलकी कोळपणी करून जमिनीत पडलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. आच्छादनासाठी गिरीपुष्प किंवा सुबाभूळ पाला 3 टन प्रतिहेक्‍टरी किंवा सोयाबीन/ गहू पिकाचे उपलब्ध असलेले काड 2 ते 2.5 टन प्रतिहेक्‍टर पसरावे.
  • कोळप्याच्या साह्याने अथवा लाकडी नांगरास 5-6 इंचांवर दोरी बांधून 4 ओळींनंतर 4 ते 5 आठवड्यांनी सऱ्या काढाव्यात. यामुळे पडणाऱ्या पावसाचे मूलस्थानी जलसंवर्धन होण्यास मदत होते.
  • आंतरमशागतीची कामे उताराला आडवी करावीत.
  • पोटॅशियम नायट्रेट 10 ते 15 ग्रॅम प्रतिलिटर किंवा म्युरेट ऑफ पोटॅश 10 ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.
  • पिकातून होणारे बाष्पोत्सर्जन कमी होण्यासाठी केओलीन 70 ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
  • पावसाचा ताण दीर्घकाळ झाल्यास पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळी कपाशीवर तुडतुडे या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या ठिकाणी ऍसिफेट 20 ग्रॅम किंवा थायामेथोक्‍झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • कपाशीमध्ये फूलकिडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 20 मिली किंवा ऍसिफेट 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • सोयाबीन पिकामध्ये उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी, सोयाबीन व गरजेनुसार तूर या पिकांमध्ये पहिली फवारणी प्राधान्याने कडूनिंबावर आधारीत किटकनाशकाची पाच मिली प्रतिलिटर किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची घ्यावी.
  • पाण्याची/सिंचनाची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक वाचविण्यासाठी पाणी द्यावे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • सध्या कपाशीमध्ये पीक पिवळसर लाल पडून निस्तेज होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशा ठिकाणी युरिया 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून व पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. तसेच 10-12 दिवसांनंतर डीएपी (खत) 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
  • जनावरांसाठी चारा कार्यक्षमरीत्या वापरावा. कडबाकुट्टी करून वापरावा.

डॉ. सुरेंद्र चौलवार, 7588571544
(लेखक अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे मुख्य शास्त्रज्ञ आहेत.)

--------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate