অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी उपाययोजना

पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी उपाययोजना

राज्यामधील प्रमुख खरीप पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, भात, तूर व मका या पिकांच्या उत्पादन खर्चात (उत्पादनावर परिणाम न करता) कपात करण्याच्या दृष्टीने शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बियाणे , रासायनिक खते व किडनाशके या निविष्ठांवरील खर्च व पिकांच्या पुर्वमशागतीपासुन काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्च ही प्रामुख्याने शेती उत्पादन खर्च वाढण्याची कारणे असल्याचे दिसुन येते. तसेच लहरी हवामानामुळे पाऊस कमी झाल्याने किंवा वेळेवर न पडल्याने निर्माण होणा-या टंचाईस्थितीचा जिराईत पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतीतील जोखेिम वाढत आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. सबब पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सध्या शेतकरी अवलंबत असलेल्या पध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यास्तव शेतक-यांनी खालीलप्रमाणे उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना आणि पिकनिहाय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. याशिवाय स्थानिक परिस्थितीप्रमाणे कृषि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि प्रगतशिल शेतक-यांच्या अनुभवानुसार उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांचा अवलंब करता येईल.

उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना

१) बियाणे, रासायनिक खते व किडनाशकावरील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना

अ) बियाणे

  1. संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षांपर्यंत वापरावे.
  2. ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बिजोत्पादन कार्यक्रम राबवावा.
  3. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पध्दतीचा अवलंब करावा. उदा. भातासाठी 'श्री' व 'सगुणा' भात तंत्र (एस. आर. टी.) पध्दत, तेलबिया व कडधान्यासाठी बीबीएफ यंत्राव्दारे लागवड इ.

ब) रासायनिक खते

  1. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा.
  2. निमकोटेड युरियाचा वापर केल्याने पिकांस योग्य प्रमाणात नत्राचा पुरवठा होऊ शकतो व नत्र वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पर्यायाने नत्राच्या मात्रेत बचत होते. तसेच त्यामधील निंबोळीयुक्त घटकामुळे किड नियंत्रणास मदत होते.
  3. जमिनीतील स्फुरदमुक्त होण्यासाठी स्फुरदविरघळविणा-या जीवाणू खतांचा (पी. एस. बी.) वापर करावा.
  4. रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरासाठी खत देण्याच्या सुधारित पध्दतींचा अवलंब करावा. उदा. युरिया + डीएपी ब्रिकेटस, बियाणे व खत पेरणी यंत्राचा वापर इ.
  5. शेतातील वाया जाणा-या काडी कच-यापासुन शास्त्रोक्त पध्दतीने सेंद्रिय खत तयार करुन वापरावे. उदा. कंपोस्ट, नाडेप, गांडुळ खत, बायोडायनॅमिक इ.
  6. कडधान्य व तेलबिया पिकांमध्ये जैविक खतांचा (पावडर व द्रवरुप) वापर केल्यास रासायनिक खतावरील खर्चात बचत होते. तुर व हरभरा पिकांवर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाचे द्रावण फवारावे.
  7. पिकांच्या पोषणासाठी कमी खर्चात शेतावर तयार करता येतील अशी हिरवळीचे खत, नाडेप कंपोस्ट व बायोडायनॅमिक इ.
  8. भात व भाजीपाला पिकांमध्ये युरिया व डिएपी ब्रिकेटसचा वापर करावा, जेणेकरुन पिकांना आवश्यकतेप्रमाणे नत्र व स्फुरदाची उपलब्धता होते.
  9. ठिबक सिंचनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाण्यात विरघळणा-या तसेच द्रवरुप खतांचा वापर करावा. फवारणीव्दारे रासायनिक खतांची मात्रा देणे हे जमिनीतुन द्यावयाच्या खतांपेक्षा किफायतशीर असल्याने शिफारशीप्रमाणे फवारणीव्दारे खते द्यावीत.
  10. शुन्य मशागत , पिकांचा फेरपालट, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, शेतातील काडीकचरा व पालापाचोळा शेतातच गाडणे आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनी सुपिक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता भासत नाही.

क) किडनाशके

  1. केिडरोग सव्हॅक्षणाच्या आधारे दिलेल्या सल्ल्यानुसारच किडनाशकांचा वापर करावा.
  2. ज्या पिकांसाठी व किड-रोगांसाठी किडनाशके तयार केली आहेत, त्याच पिकांसाठी व किड रोगांसाठी त्या किडनाशकांचा वापर करावा. (लेबल क्लेमप्रमाणे वापर करावा.)
  3. किडनाशकांच्या प्रभावी परिणामकारकतेसाठी शिफारस केलेल्या किडनाशकांची योग्य मात्रा वापरुन तयार केलेले द्रावण सुधारित फवारणी यंत्रांचा वापर करुन फवारावे व फवारणीनंतर पंप धुवून ठेवावा.
  4. जमिनीतुन पसरणा-या रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
  5. किंड नियंत्रणासाठी सुरुवातीस जैविक किडनाशकांचा वापर करावा व जर किडीची तिव्रता नुकसान पातळीच्या वर गेली तरच प्रभावी रासायनिक किडनाशकाची फवारणी करावी.
  6. बिजप्रक्रियेसाठी शेतावर तयार करता येईल अशा सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा.उदा. बीजामृत (शेण + गोमुत्र + दूध + चुना + माती + ट्रायकोडर्मा) इ.
  7. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळी, हरभ-यावरील घाटे अळी व कापसावरील रस शोषणा-या किडी व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी घरच्याघरी तयार केलेल्या ५ टक्के निंबोळी अकांची फवारणी फुलकळी अवस्थेमध्ये करावी.
  8. भाजीपाल्यावरील रस शोषणा-या किडींसाठी दशपर्णी अकांची (सिताफळ + पपई + रुई + करंज + कण्हेर + कडुनिंब + निर्गुडी + घाणेरी + गुळवेल + एरंड) २.५ ली. द्रावण २oo लीटर पाण्यात मिसळुन प्रति हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.
  9. फळबागांमध्ये बुरशीजन्य तसेच जिवाणुजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शिफारस केलेल्या अवस्थेमध्ये (उदा.डाळिंबावर नविन पालवी फुटल्यानंतर) १ टक्के बोडॉमिश्रणाची फवारणी करावी आणि खोडांना १o टक्के घरच्याघरी तयार केलेली बोडॉपेस्ट लावावी.
  10. फळबागांची छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांद्या, काडया व पाने बागेत न ठेवता कुजविणा-या जिवाणुकल्चरचा वापर करुन कंपोस्ट तयार करावे.
  11. सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी फळबागांमध्ये स्थानीक झेंडुचे मिश्रष्पीक घ्यावे.
  12. सोयाबीन, तुर, हरभरा, कापुस, भाजीपाला या पिकांवरील अळयांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळयांचा वापर करावा.

पाण्याची बचत करण्यासाठी उपाययोजना

  1. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण पध्दतींचा अवलंब करावा.
  2. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनासारख्या सुक्ष्म सिंचन पध्दतींचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा.
  3. जमिनीची जलधारणक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.
  4. फळपिकांच्या बुध्याभोवती दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सावली पडणा-या क्षेत्रातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेतातील काडीकचरा किंवा पालापाचोळयाचे किंवा प्लॅस्टिकचे अच्छादन करावे.
  5. जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे.
  6. जमिनीच्या मगदूराप्रमाणे व पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज बदलत असल्याने त्या त्या वेळच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
  7. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास फक्त संवेदनशील अवस्थांमध्येच पाणी दिल्यास पाण्याच्या बचतीबरोबरच पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही.
  8. कमी पाण्यावर पिकांच्या लागवड पध्दती उदा. चारा पिकांसाठी हायड्रोपॉनिक तंत्रज्ञान अवलंबावे.
  9. पाण्याचा ताण पडल्यास सोयाबीन, मुग, उडीद या कमी अंतरावरील पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे झाल्यानंतर प्रत्येक चार ओळीनंतर उथळ स-या कराव्यात
  10. फळबागांना पाण्याचा ताण पडू नये म्हणुन ८ टक्के केवोलिन किंवा १ ते २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.
  11. फळबागांचे उष्ण वा-यापासुन संरक्षण व्हावे म्हणुन बागेच्या पश्चिम व दक्षिण बाजुर शेवरी, सुरू सारख्या उंच वाढणा-या वारारोधकांची लागवड पाऊस सुरू होताच करावी.

मजुरीवरील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना

  1. यांत्रिकीकरणाच्या अवलंबामुळे मजुरीवरील २५ ते ५० टक्के खर्च कमी होतो व पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
  2. पिकांच्या पुर्वमशागतीपासुन ते काढणी व मळणीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी उपलब्ध असलेल्या सुधारित कृषि अवजारांचा व यंत्रांचा वापर करावा.
  3. यांत्रिकीकरणाचा खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्वावर अवजारे देण्याच्या सुविधा केंद्राची मदत घ्यावी. म्हणजे पेरणीपासुन काढणीपर्यंतची सर्व कामे वेळेत पुर्ण करता येतील.
  4. तणनियंत्रणासाठी उगवणीपुर्व व उगवणीनंतरच्या रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.
  5. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादीत कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रुंद वाफा सरी यंत्राचा (बीबीएफ) वापर करावा.
  6. संत्रा, मोसंबी, डाळींब फळपिकांच्या छाटणीसाठी ट्रॅक्टरचलित छाटणी यंत्रांचा वापर फळ काढणीनंतर शिफारशीनुसार करावा.
  7. फळबागांतील आंतरमशागतीच्या सर्व कामांसाठी व फवारणीसाठी पॉवरटिलरचा वापर करावा. ८) भात, ऊस, कांदा, बटाटा या पिकांच्या लागवडीसाठी विविध प्रकारची लागवड यंत्रे (भात रोवणी यंत्र, कांदा/बटाटा लावणी यंत्र, शुगरकेन प्लॅन्टर) उपलब्ध असुन त्यांचा वापर केल्यास मजुरीमध्ये ६0 ते ८0 टक्के बचत होते.

शेतीमधील जोखिम कमी करण्यासाठी उपाययोजना

  1. आंतरपिक पध्दतीचा अवलंब केल्यास टंचाई किंवा आपत्कालिन परिस्थितीत मुख्य पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी आंतरपिकाच्या उत्पादनामुळे जोखिम कमी होण्यास मदत होते.
  2. कापुस + सोयाबीन, कापुस + मुग, कापुस + उडीद, सोयाबीन + तुर, ज्वारी + तुर, भाताच्या बांधावर तुर इत्यादी लागवड पध्दती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठया प्रमाणावर अवलंब करावा. ३) पावसास उशिरा सुरुवात झाल्यास कमी कालवधीची पिके घ्यावीत तसेच पिकांचे कमी कालावधीचे वाण वापरावेत
  3. जमिनीची वाफसा स्थिती असल्यानंतरच पिकांची पेरणी करावी.
  4. ५) कृषि विभागाच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने आपत्कालीन पिक आराखड्यानुसार पर्यायी पिकांची लागवड करावी .
  5. एकपीक पध्दतीऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा. एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करण्याऐवजी विविध पिकांचे नियोजन करून लागवड केल्यास जोखेिम कमी होण्यास मदत होते. उदा. पुर्ण क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य, ज्वारी, चारापिके तसेच फळांपेकांचाही समावेश करावा.
  6. एकात्मिक शेती पध्दती म्हणजेच शेती व शेतीस पुरक इतर जोडधंदे (कृषि + फलोत्पादन / कुक्कुटपालन / दुग्धव्यवसाय / रेशीम उद्योग / मत्स्योद्योग इ.) केल्यास शेतीतील जोखेिम कमी होण्यास मदत होते.
  7. समुहाच्या, गटाच्या किंवा उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन शेतीस लागणा-या नेिविष्ठांची एकत्रेित खरेदी केल्यास खर्चात बचत होते. तदवतच उत्पादनांची एकत्रित विक्री केल्याने देखील फायदा होतो.
  8. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात होणा-या संभाव्य नुकसानेिची तिव्रता कमी करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा.


उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान

१) कापूस

  • मध्यम भारी जमिनीत कापसाची लागवड करावी तसेच सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापुस लागवड टाळावी.
  • जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी, जमिनीच्या उताराला आडवी पेरणी, सरी वरंबा पध्दतीने मशागत इ. मुलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा.
  • कोरडवाहू क्षेत्रामध्ये बिगर बी.टी. कपाशीच्या सरळ वाणांची अतिघन पध्दतीने लागवड केल्यास बी.टी. वाणा इतकेच उत्पादन मिळू शकते.
  • सरळ वाणांचे बेियाणे घरच्या घरी तयार करुन त्याचा वापर करावा.
  • बीबीएफ यंत्राचा वापर करुन पेरणी करावी, जेणेकरुन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो व अतिपावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. यामुळे बियाणे, खत व मजुर खर्चात बचत होते. e कापूस पिकात भूईमूग (११), मूग किंवा उड़ीद (१:१), सोयाबीन (१:१ किंवा २:१) या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. आपल्या विभागामध्ये कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड  व रोग यांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

  • तण नियंत्रणासाठी पेरणीपुर्व तणनाशकांचा वापर करावा
  • लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होण्यासाठी फुलोरयाच्या वेळेस  २ टक्के युरिया आणि बाँडे धरताना १ टक्का युरिया अधिक १ टक्का  मॅग्नेशियम सल्फेट  आणि १.५ टक्का ऑफ पोटॅशचीफवारणी करावी.
  • कीड–रोग सर्वेक्षण प्राप्त सल्ल्यानुसार केिड़-रोग नियंत्रणासाठीं उपाययोजनाकराव्यात
  • कीड  नियंत्रणाच्या दृष्टीने इंग्रजी टी (T) आकाराच्या एकरी
  • १५ ते २0 पक्षी थांब्यांचा वापर करावा.
  • शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जनुक विरहीत ,आश्रीत कापुस (रेफ्युजी) किंवा दोन महिन्यांनी भेंडीची  आश्रित पीक म्हणुन कापुस पिकाभोवती लागवड करावी.
  • पीक उगवणीनंतर १०५ दिवसांनी घरच्या घरी तयार केलेल्या  ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी व १२५ दिवसांनी पांढऱ्या  माशीच्या नियंत्रणासाठी एकरी ४-५ पेिवळया चिकट सापळ्यांचा वापर करावा.
  • कापुस पिकास नाडेप कंपोस्ट खत, गांडूळ खत, बायोडायनामिक खत इ. सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  • शेतावरच स्वतः तयार केलेलों स्वस्त व प्रभावी जैविक कोड / रोग नियंत्रण औषधे जसे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जिवामृत, अमृतपाणी, बिजामृत इ. चा वापर करुन खर्चात बचत करावी.
  • शक्य तेथे शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवण करावी व पावसात खंड पडल्यास संरक्षित सिंचनासाठी साठवण केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.
  • उगवण, पाते लागणे, फुले लागणे, बोंड धरणे व बोंड भरणे या वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पेिकास पाणी द्यावे.
  • ३० ते ३५ ट्क्के बोंडे फुटल्यानंतर वेचणी करण्यापेक्षा ५० ते ६o टक्के बोंडे फुटल्यानंतर वेचणी करावी.
  • स्वच्छ कापूस वेचणी व कापसाची प्रतवारी राखण्यासाठी कापूस वेचणी, साठवण व हाताळणी या प्रक्रियांवर भर दिल्यास कापसाची प्रत चांगली मिळून चांगला दर मिळु शकतो.
  • शैदरी बोंडअळी डिसेंबर महिन्यात पन्हाट्यांमध्ये कोषावस्थेत जात असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कापसाची वेचणी झाल्याबरोबर पन्हाट्या आणि इतर पालापाचोळा शेताबाहेर काढून त्यापासुन कंपोस्ट खत तयार करावे. यामुळे शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत होण्यास मदत होते.
  • कापसाचा खोडवा घेण्याचे टाळावे.
  • शेतक-यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांव्दारे बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन साधने इ. नेिविष्ठा खरेदी केल्यास पुरवठादाराकडून वाजवी दरात कृषि निविष्ठांचा पुरवठा होऊ शकतो.

२) सोयाबीन


  • सोयाबीनमध्ये दरवर्षी नवीन बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही. प्रमाणित बियाणाचा वापर

  • केला असल्यास पेरणी केलेल्या क्षेत्रातील काही भाग पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून राखून ठेवावा. अशा भागात पिकाची विशेष काळजी घेवून अनावश्यक तणे, वनस्पती, रोग/किंडय़ार्सीत सोयाबीनची या झाडे काढून टाकावीत. शेतात राखीव रेखा ठेवलेल्या भागातील बियाणे स्वतः पुढील हंगामात पेरणीसाठी वापरावे. साधरणतः दर तीन वर्षांनी बियाणे बदलावे.
  • घरचे बियाणे वापरण्यापुर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासुन घ्यावी
  • कोणत्याही परिस्थितीत १५ जलँपुर्वी सोयाबीनची पेरणी संपवावी.
  • रुंद वाफा सरी यंत्राने (बी.बी.एफ.) सोयाबीनची पेरणी केल्यास बियाण्याची गरज २o ते ३0 टक्के कमी होते तसेच खताच्या खर्चातही १५ ते २० टक्के बचत होत असल्यामुळे सोयाबीन पेरणीसाठी बी.बी.एफ. यंत्राचा वापर करावा.
  • बेियाणे ४ सें.मी. पेंक्षा जास्त खोल पेरु नयें.

  • सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केल्यास कोड/रोगांपासून पेिक संरक्षणास मदत होते. कार्बन्डॅझीम २.५ ग्रॅम /केिलो किंवा थायरम + कार्बन्डेंड्झीम (२१) ३ ग्रंम /किलो केिंवा ट्रायकोडर्मा व्हेिरीडी ५ ग्रंम/किलो प्रमाणें बीजप्रक्रिया करावी.
  • बुरशींनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम व पीएसबी या जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर बियाणे उगवणीपूर्वी पेंडामिश्रीलीन किंवा इमाझिर्धेपर या तणनाशकांची फवारणी करावी.
  • कीड-रोग सर्वेक्षणानुसार दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच किंड व रोग नेियंत्रणाचे उपाय करावेत.
  • शेतात अगदी सुरुवातीला रोगट झाडे दिसताच नष्ट करावीत तसेच किंडग्रस्त पाने व फांद्यांचा अळीसहू नायनाट करावा. • पिंक फूलोरा अवस्थेत असताना डवरणी मुळीच करु नये.
  • सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक ४:२ प्रमाणात घेतल्यास येलो मोझंकचा प्रसार रोखता येतो. तसेच याव्दारे सोयाबीन बरोबरच तुरीचेअधिक उत्पादन मिळू शकते.
  • सोयाबीन पेिकाची उपलब्ध कम्बाइन्ड हार्वेस्टरव्दारे काढणी केल्यास खर्चात बचत करता येते. त्यासाठी भाडे तत्वावर सेवा-सुविधेचा वापर करावा.

3) भात

  • भाताचे प्रमाणित बियाणे वापरल्यास सदर पिकाचा शेतातील काही भाग पुढील हंगामासाठी स्वतःकरीता बियाणे म्हणुन वापरण्यासाठी राखून ठेवावा. मात्र बियाण्यासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रावरील पिकाची वेिशेष काळजी घ्यावी.
  • एका हंगामात वापरलेल्या प्रमाणित बियाण्यापासुन तयार झालेले
  • बियाणे पुढील दोन हंगामापर्यंत वापरावे.
  • भात रोपवाटिकेत बियाणे पेरणीपुर्वी बियाण्यास ३ छक्के मिठाच्या पाण्याची, श्रायरम ( ३ ग्रॅम प्रति किंग्लो बियाण्यास) तद्नंतर पीएसबी जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया  करावी.

  • श्री पध्दतीने भात लागवडीसाठी एका ठिकाणी एकच रोप लावावयाचे असल्याने रोपवाटिकेत ५ केिली प्रतेि हेक्टर या प्रमाणात बेियाणे पेरावे. चारसुत्री पध्दतीने भात लागवडीसाठी रोपवाटिकेत वाणाच्या प्रकारानुसार २o-३० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणात बियाणे पेरावे.
  • भात रोपवाटिकेत रोपांचे किडी-रोगांपासुन संरक्षण केल्यास पुनर्लागवडीनंतरच्या पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते.
  • कोकण आणि पुर्व विदर्भात भाताची पुनर्लागवड केली जाते. अशा ठिकाणी शेतकरी / महिला गटांनी सामुहिक रोपवाटिका तयार कराव्यात. जेणेकरुन पाणी, मजुरी व देखभाल खर्चामध्ये बचत होते.
  • रोपांचे वय १२ ते १५ दिवसांचे असतानाच पुनर्लागवड पुर्ण करावी. अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाठेिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते.
  • पुर्वमशागतीसाठी करावी लागणारी नांगरट व चिखलणीची कामे मिनी ट्रॅक्टर / पॉवर टिलस्व्दारे केल्यास मजुरीमध्ये बचत होते.
  • भाताच्या शेतीभोवती गिरीपुष्याची लागवड करुन चिखलणीच्या वेळी हिरवळीचे खत म्हणुन गिरीपुष्पाचा पाला चिखलात गाडावा.
  • भाताची पुनर्लागवड यांत्रिकी पध्दतीने केल्यास खर्चामध्ये २५ ते ४o टक्के बचत होत असल्याने पुनर्लागवड यंत्राचा वापर करावा.
  • पश्चिम घाट प्रदेशात भाताच्या पेरणीकरिता बियाणे व खत पेरणी यंत्राचा वापर करावा.
  • भात लागवडीसाठी मशागतीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी सगुणा भात तंत्राचा म्हणजेच गादीवाफ्यावर टोकन पध्दतीने भात लागवड तंत्राचा अवलंब करावा. या पध्दतीत एका हंगामात तयार केलेले गादी वाफे न मोडता त्यावर पुढील पिकाची टोकण केल्याने खर्च वाचतो.
  • जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीबरोबरच रासायनिक खतावरील खर्चात बचत होते.
  • लावणी किंवा रोवणीनंतर चार चुडांच्या चौकोनात एक युरिया डिएपी ब्रिकेट खोचावी. क्यामुले नत्र खत कार्यक्षमस्त्यिा पिकास उपलब्ध होते.
  • तणांचा बंदोबस्त करण्यासाठी उगवणीपुर्व तसेच उगवणीनंतर वापरावयाच्या तणनाशकांचा योग्य वेळेस वापर केल्याने खर्चात बचत होतें.
  • पुनर्लागवड केल्यास भात पिकातील तणांचा बंदोबस्तकरिता कोनोवेिंडरचा वापर करावा.
  • कीड-रोग सर्वेक्षणानुसार दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कोड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत. कोड नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसताच कामगंध सापळे
  • व जैविक केिड़नाशकाचा वापर करावा.
  • पुनर्लागवड केलेल्या पैिकामध्ये फुट्वे फुटतांना, “ पीक नेिसवतांना व दाणे भरतांना पुरेसे / पाणी ठेवावे व इतर वेळी पाण्याचा  नेिचरा करावा.
  • भात पिकाच्या बांधावर तुर पिकाची ` लागवड़ करावीं.
  • भात कापणी करीता कापणी यंत्राचा आणि भात मळणीकरीता मळणीं यत्राचा वापर | केल्यास खर्चामध्ये २०-२५ टक्के बचत होवू ` शकते. वेिंशेषतः वेळेत कामे पार पाडली जातात.
  • भात पेिकानंतर उपलब्ध अोलाव्यावर नांगरष्ट न करता / कमी मशागतीव्दारे हरभरा, लाखोळी, मसुर, वाल, जवस इ. दुबार फेिंकाचीं लागवड़ करावों.
  • यांत्रेिकीकरणावरील खर्च कमी करण्यासाठी भाडे तत्वावर नजिकच्या यांत्रिकों सेवांचा वापर करावा.


४) तूर

● तूर पीक पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वापरले असल्यास पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी काही भाग पुढील हंगामासाठी बियाणे म्हणुन राखावा आणि त्या क्षेत्राची वेिशेष काळजी घ्यावी.

● दरवर्षी नव्याने प्रमाणित बियाणे न करता वेिशेष काळजी घेतलेल्या शेतातील उत्पादित बियाणे दोन हंगामापर्यंत वापरावे.

● मध्यम जमेिनीत व मध्यम पावसाच्या ठिंकाणी लवकर योणा-या वेिशाखा सारख्या वाणांची, मध्यम ते भारी जमिनीत व खात्रीच्या पावसाच्या ठिकाणी पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३, बीडीएन-२, विपुला, राजेश्वरी सारख्या मध्यम कालावधीच्या वाणांची तर भारी जमिनीत खात्रीच्या पावसाच्या ठिकाणी मध्यम उशीरा तयार होणा-या आशा, बीएसएमआर-७३६ इ. वाणांची पेरणी करावी.

● पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळविणा-या जिवाणु संवर्धकाची प्रक्रिया केल्याने पिकाचे पोषण सुधारते व रासायनिक खतांची गरज कमी होते. • जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीबरोबरच रासायनिक खतावरील खर्चात बचत होते. तसेच जैविक खतांचा वापर केल्यास रासायनेिक खतांवरील खर्चात बचत होतें.

● तूर पिकावर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युराियाचे द्रावण फवारावे.

● मर रोगापासुन संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशींनाशकाची प्रक्रिया केल्यास रासायनिक किंडनाशकावरील खर्च कमी होतो.

● सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतल्यास मुख्य पिकासाठी केल्या जाणा-या खत व पाणी व्यवस्थापनामुळे तुरीसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.

● तूर पिकाची सलग किंवा आंतरपीक म्हणुन लागवड करण्यासाठी रुंद वाफा सरी (बीबीएफ) पध्दत अवलंबावी. जेणेकरुन जर्मिनीतील

ओलाव्याचा पुरेपूर वापर होण्याबरोबरच बियाण्यामध्ये  १५ टक्के तसेच खते आणि मजुरीमध्ये  २० टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते तसेच आपत्कालीन परिस्थितीही पिक तग धरून राहू शकते.

  • कीड - रोग सेर्वेक्षनानुसार दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कीड व रोग नियंत्रणाचे उपाय   करावेत. कीड नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसताच कामगंध सापळे व जैविक किंडनाशकाचा वापर करावा.

  • शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असताना त्यांच्या नियंत्रणासाठी रासायनेिक किंडनाशके वापरण्याऐवजी जैविक किडनाशके फवारावीत व किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ऑलांडल्यास प्रभावों रासायनिक केिड़नाशक फवारावेंत. पावसाने ताण दिल्यास पिकाच्या फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे व सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

पावसास उशिरा सुरूवात झाल्याने किंवा आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास तुरीची पेरणी ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंत केली तरी चांगले उत्पादन मिळते.

५) मका

  • खरीप हंगामात केवळ मका हे एकच पीक घेणार असल्यास दरवर्षी नांगस्ट न करता दोन वर्षातुन एकदा खोल नांगस्ट करावी.

  • तणनियंत्रणासाठी अॅट्राझीन ५o टक्के प्रवाही या तणनाशकाची एकरी १ किलो प्रमाणे २00 लीटर पाण्यात मिसळुन पीक लागवडीपुर्वी फवारणीं करावी.

  • मक्याची टोकण पध्दतीने लागवड करावी व एका ठिकाणी एक बी टोकावा. तसेच उपलब्ध बीबीएफ यंत्राचा वापर करतांना योग्य चकतीं नेिवड़ावी .

  • बियाण्यास जिवाणु संवर्धकाची (अॅझोस्पेिरीलम व पीएसबी) बीजप्रक्रिया कराची. कोड नियंत्रणांसाठी काबरीिल ८५ टक्के डब्ल्युपी ७o५ ग्रॅम प्रति एकर २00 लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा फोरेट १० जी ४ ते ५ किंग्लो प्रति एकर प्रमाणे जर्मनीत मिसळावे.

  • मका पिकांच्या दोन ओळीत भुईमूग किंवा सोयाबीन हे आंतरपीक घेतल्यास नत्राच्या उपलब्धतेत वाढ होते व आंतरपिकाद्वारे अतिरिक्त फायदा मेिळतो.

  • जमिन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. वाढीची अवस्था ( पेरणीनंतर २५-३० दिवस). फुलोरा अवस्था (पेरणीनंतर ४0-६0 दिवस) व दाणे भरण्याची वेळ ( पेरणीनंतर ७0-८o दिवस) या तीन संवेदनशिल अवस्थेत सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणीं द्यावे .

  • मका सोलणीसाठी मजुरीवरील खर्च मोठा असल्याने भाडे तत्वावरील मळणी यंत्र सुविधा वापरावी.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate