অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बटाट्यावरील "लेट ब्लाईट'चे प्रभावी नियंत्रण

बटाट्यावरील "लेट ब्लाईट'चे प्रभावी नियंत्रण

लुधियानाच्या पंजाब कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाने विद्यापीठाच्याच कृषी हवामानशास्त्र विभागाच्या सहकार्याने बटाट्यावरील उशिराचा करपा (लेट ब्लाईट) या रोगाचे पूर्वानुमान करण्यासाठी एक अभिनव पद्धती विकसित केली आहे. डिसिजन सपोर्ट सिस्टिम (डीएसएस) असे त्याचे इंग्रजी नाव आहे. विविध तापमान घटक व सापेक्ष आर्द्रतेशी त्याचा संबंध या आधारावर या पद्धतीचा वापर होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनजित सिंग कांग यांनी याविषयी बोलताना सांगितले, की लेट ब्लाईट हा पिकाचे आर्थिक नुकसान करणारा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या डीएसएस या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना या रोगाचे व्यवस्थापन वेळेवर व प्रभावीपणे करणे शक्‍य होणार आहे. इंटरनेटच्या माध्यमाचा आधार त्याला असल्याने बटाटा उत्पादकांपर्यंत माहिती पोचणे सोपे होणार आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस. एस. गोसल यांनी ही नवनिर्मिती असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की यशस्वी पीक उत्पादन कार्यक्रमात लेट ब्लाईट हा रोग प्रमुख अडथळा आहे. विद्यापीठाने बटाटा बियाणे कार्यक्रमाची आखणी केली आहे. ज्या योगे रोग व्यवस्थापन करणे गरजेचे ठरणार आहे

होशीरपूर, शहीद भगत सिंग नगर, रोपर, जालंधर, कपूरथला, भटिंडा या जिल्ह्यांमध्ये सहा स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. त्या आधारे हवामानाच्या नोंदी नियमित घेण्यात येतील. रोगाचे पूर्वानुमान करण्यासाठी याच घटकांचा आधार घेतला जात आहे. पूर्वानुमान मिळाल्याने बुरशीनाशक वापरायचे की नाही याचा निर्णय घेणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate