অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधमाशाद्वारे शेतीपिकांचे पर-परागीभवन

मधमाशाद्वारे शेतीपिकांचे पर-परागीभवन

मधमाश्या  किंटकवर्गीय असुन मानवाला उपयुक्त असा क्टिक आहे. निसर्गात ज्यावेळेस सपुष्य वनस्पतीची निर्मीती झाली त्यावेळेस मधमाशा उदयास आल्या आहेत. कारण मधमाशांचे अश्न म्हणजे मकरंद व पराग फुलात असतो. मानवासाठी मधमाशा फार पुरातन काळापासुन उपयुक्त आहेत. हजारो वर्षापुर्वी ऋषीमुनींनी आयुर्वेदिक औषधावर भरपुर अभ्यास केला आहे. त्यावेळेस त्यांनी मधावरसुध्दा भरपुर अभ्यास व संशोधन केले. मधाची गुणवत्ता विचारात घेऊन मधाला अमृताची उपमा दिली, त्या काळापासुन आजही ग्रामीण भागातील वयोवृध्द माता आपल्या मुलीस व सुनेस बाळ जन्माला आल्याबरोंबर मधाचे बॉट चाटवा, असे सांगतात. माणुस जन्माला आल्यावर सुरुवातीस पाणी, आईचे दुध व इतर कोणताच पदार्थ पचवू शकत नाही परंतु मध पचवू शकतो. कारण मधाला पचन करावे लागत नाही.

मध सरळ खतात शोषला जातो. भारतात एकूण मधमाशांच्या चार जाती आहेत. पाचवी जात युरोप खंडातील देशातून आयात केली आहे. आग्या, सातेरी (सातपुडी), फुलोरी (काटेरी) व पोयाच्या या चार भारतीय जाती आहेत. एपीस मेलीफेरा ही जात आयात केलेली आहे. यापैकी फक्त सातेरी व मेलीफेरा मधमाशा पाळता येतात. इतर मधमाशा पाळल्या जात नाहीत परंतु त्यांचा परपरागीभवनासाठी फार उपयोग होतो. मधमाशांचा उपयोग परागीभवनासाठी करु ईच्छीणा-या शेतक-यांनी मधमाशापालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांचा उद्देश सफल होणार नाही. शेतकरी शेतीपिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संकरित बेियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते वापरतात आणि रोग नियंत्रणासाठी औषध फवारणी करतात.

या सर्व बाबीमुळे जसे शेतीचे उत्पादन वाढते तशा प्रकारे मधमाशा फुलावर फिरल्यास पर-परागीभवन होऊन शेतीच्या उत्पादनात २o ते ४o टक्के वाढ होते. मधमाशांच्या शरीरावर असंख्य केस असतात. मधमाशांचे अन्न म्हणजे मकरंद व पराग हे फुलात असते. ज्यावेळेस मधमाशा मकरंद व पराग संकलनासाठी फुलावर जातात त्यावेळेस फुलातील पराग त्यांच्या केसाळ शरीराला चिकटतात. मधमाशांचे वैशिष्ट्ये असे आहे की, त्या ज्या वनस्पतीच्या फुलावर काम करतात त्याच वनस्पतीच्या फुलावर सतत काम करीत रहातात. त्यामुळे पर-परागीभवनाची प्रक्रिया उत्कृष्ठस्त्यिा होते.

फुलोरी मधमाशा वसाहतींपासुन अर्धा ते एक कि.मी. सातेरी मधमाशा वसाहतींपासुन एक ते दीड किं.मी., मेलीफेरा मधमाशा दोन ते अडीच कि.मी. व आग्या मधमाशा ३ कि.मी. पर्यंत त्यांच्या राह्मण्याच्या ठिकाणापासुन दुर जाऊन फुलातील अन्न व पाणी गोळा करतात. शेतीपिके, फळबागा व फळभाज्यावर सध्या मोठ्याप्रमाणात विषारी किटकनाशकाची फवारणी केली जाते. त्यामुळे निसर्गात सर्वत्र दिसणा-या आग्या व फुलोरी मधमाशा नाश पावल्यामुळे त्यांच्या वसाहती दिसत नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या फळझाडाला भरपुर फळे लागत नाहीत. आणि तेलबियाच्या उत्पादनात घट झाली आहे. डाळींब बागायतदार फुलोन्याच्या काळात त्यांच्या बागेत मधमाशांच्या मधपेट्या ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्या बागेत भरपूर डाळींब लागलेली दिसतात.

मधमाशाद्वारेरे परागीभवन या वेिषयावर अनेक शाख्वज्ञानी संशोधन व्र प्रयोग करुन कोणत्या पिकात किंती टक्के वाढ होते त्याची माहिती काढली आहे. सदरची माहिती मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी व ग्रामोद्योग आयोग, ११५३, गणेशख्रिड रोड, पुणे-१६ येथे उपलब्ध आहे. तसेच अनेक कृषि विद्यापीठांतही तेलबिया व फळझाडांच्या उत्पादनात मधमाशामुळे किंती वाढ होते या विषयावर संशोधन झाले आहे. शेतकरीही या बाब्बत स्वतः प्रयोग करु शकतात.

सुर्यफूल पिकाच्या परागीभवनासाठी पुढीलप्रमाणे प्रयोग सर्वसामान्य शेतक-यांनाही करता येईल.

प्रयोगाची पध्दत

यासाठी दोन एकर जमिनीची निवड करावी. जर्मिनीतील मातीचे परिक्षण करुन घ्यावे. सदर ठिकाणापासुन किमान १० कि.मी. अंतरावर दुसरा दोन एकरचा प्लॉट निवडावा. तेथील माती व पहिल्या प्लॉटमधील मातीचे परेिक्षण केल्यास त्यातील घटक सारखेच असावेत. मशागत सारखीच करावी. दोन्ही प्लॉटमध्ये सारखेच सेंद्रिय खत व रासायनीक खत वापरावे. शेतीमध्ये लागवड करावयाचे बेियाणे एकाच कंपनीचे व एकाच लाँटमधील असावें.

एकाच दिवशीं दोन्हीं प्लॉटमध्यें बियाणे लागवड़ करावी. पाणी देते वेळी एकाच दिवशी पाणी द्यावे. दोन्ही प्नॉटला सारखेच विहीरीचे किंवा तळयाचे किंवा बोअरचे एकाच प्रकारचे पाणी देण्यात यावे. सुर्यफूल फुलो-यात आल्यानंतर कोणत्याही एका प्लॉटमध्ये मेलीफेरा मधमाशांच्या पाच वसाहती ठेवाव्यात आणि दुस-या प्लॉटमध्यें मधमाशाची एकही वसाहूत ठेऊ नये. दोन्ही प्लॉटच्या शेजारी आग्या मधमाशांच्या वसाहती नाहीत, याची खात्री करुन घ्यावी. मधपेट्या ठेवलेल्या व न ठेवलेल्या प्लॉटमधील काही फुलावर मच्छरदाणी झाकावी. जेणेकरुन कोणत्याही मधमाशा त्या फुलावर येणार नाहीत. हे सर्व केल्यानंतर सुर्यफुलाची रासकेल्यावर उत्पादन वाढीतील फरक दिसुन येईल. तसेच मच्छरदाणीच्या आतील फुलातील सुर्यफूल व बाहेरील फुलातील सुर्यफुलाचे वजन व उत्पादन पहाता येईल.

मधपेटया वसाहतीसह सुर्यफुल, करडई व मोहरीच्या पिकात ठेवल्यास त्याचे तीन प्रकारचे उत्पादन वाढते. पोत्याच्या संख्येत वाढ होते. पोत्यातील सुर्यफुलाचे वजन वाढते आणि तेलाच्या उत्पादनात वाढ होते. त्याचप्रमाणे मधपेटया फळबागेत ठेवल्यास भरपुर फळधारणा होते आणि फळाचा आकार व वजन वाढते. ज्यावेळेस आपण शेतामध्ये मधपेटया मधमाशासह ठेवतो, त्यावेळेस सदर वसाहतीपासून आपणास रु. १ooo/- चा मध मिळाला तर शेतीपिकाच्या उत्पादनात परागीभवन होऊन रु. १५,ooo/- ची वाढ होते. यावरुन मधोत्पादनाच्या १५ पट शेतीपिकाच्या उत्पादनात मधमाशाव्दारे परागीभवन होऊन वाढ होते हे दिसून येते .त्यामुळे जगविख्यात नामवंत शास्त्रज्ञ श्री.अल्बर्ट  आईनस्टाईन म्हणतात की, ज्यावेळेस पृथ्वीतलावरील मधमाशा संपतील किंवा नाश पावतील तेव्हापासुन चार वर्षाच्या आत पृथ्वीतलावरील संपूर्ण मानव जात नष्ट होईल. असे मत त्यांनी मांडले आहे. वरील सर्व माहितीवरुन मधमाशा मानवासाठी किती उपयुक्त आहेत हे दिसुन येते. त्याकरीता कोणीही आपल्या शेतातील कोणत्याही जातीच्या मधमाशा जाळून उठवू नये. त्यांचा नाश करु नये आणि इतरानाही त्यांचा नाश करु देऊ नये. आपण प्रशिक्षण घेतल्यास मधमाशापालनाचे फायदे समजतील आणि त्यांचा अभ्यास केल्यास मधमाशा मानवासाठी एक आदर्श किटक आहेत, ही बाब आपल्या निदर्शनास येईल. मधमाशापासुन मध, मेण, पराग, विष, प्रोप्रॉलीस, रॉयलजेली हे पदार्थ मिळतात. हे पदार्थ व मधमाशांच्या वसाहती विक्री करुन आणि वसाहती भाडयाने देऊन पैसे मिळतात. मधमाशाव्दारे परागीभवनाबाबत शेतक-यांनी स्वत: अनुभव घ्यावा.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate