অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रातील पिक परिस्थितीचा मागोवा , सद्यस्थिती व नियोजन

महाराष्ट्रातील पिक परिस्थितीचा मागोवा , सद्यस्थिती व नियोजन

महाराष्ट्र राज्य उष्ण कटिबंधात मोडते. त्यामुळे राज्यातील हवामान बहुतांशी समशीतोष्ण कोरडे आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वार्षिक पावसाचे प्रमाण ५०० ते ६०00 मि.मी. पर्यंत आहे. तर वार्षिक सरासरी ७५0 मि.मी. आहे. मुख्यतः पाऊस नैऋत्य मान्सून वा-यापासून ६0 ते ७0 दिवसात पडतो.

महाराष्ट्रातील पूर्व भागात ईशान्य मान्सून वा-यापासून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. उन्हाळ्यात तापमान जास्तीतजास्त ४५ अंश से. पर्यंत वाढते. हिंवाळ्यात ते ५ अंश सें.पर्यंत कमी येते. महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर हवामान उष्ण व दमट असतें तर मध्य महाराष्ट्राप्त ते कोरडे व पूर्व भागात उष्ण व दमट असते. हवेतील सकाळचे आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत असून, दुपारचे २० ते ६० टक्क्यांपर्यंत राहते.

महाराष्ट्रासाठी पडणारा पाऊस, जमिनी, पीक पद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या सर्वांचा विचार करून ९ कृषी हवामान विभाग पाडले आहेत. महाराष्ट्रातील शेती ही ७५ ते ८४ टक्के पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण हे अनियमित व कमी कालावधीत जास्त पाऊस किंवा दोन पावसांत मोठा खंड पडत असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे राहिलेले नाही.

त्यामुळे पिकांची उत्पादकता अतिशय कमी असून त्यात नेहमीच अस्थिरता आढळून येते.

सन 20१४ मध्ये सरासरीच्या तुलनेत जून २४.७ टक्के, जुलै ७९.२ टक्कें, ऑगस्ट ७५.५ टक्के, सप्टेंबर ७८.४ ट्क्के तर ऑक्टोंबरमध्ये ४१.४ ट्क्के एवढा पाऊस झाल्याने दुष्काळ्जन्य परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली. या वर्षीदेखील सरासरीपेक्षा ४g ते ५g टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान कमी झाले. अर्थातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच त्या मागील वर्षीही दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने शेतक-यांनी खचून न जाता त्यावर मात करणे गरजेचे आहे. तदअनुषंगाने योग्य परिस्थितीनुरूप उपाययोजना विषयक मार्गदर्शनपर माहिती येथे देण्यात आली आहे.

पिक उत्पादकता (लाख मेट्रीक टन)
२०१३-१४ २०१४-१५
कडधान्य पिके ११४.०४ ८२.५९
डाळवर्गीय पिके ३१.७ १७.५७
तेलवर्गीय पिके ४८.१२ २२.६३
कापूस ८८.३४ ६६.०८
उस ७६९.०१ ७६५.०३

मागील दोन वर्षाचे आकडेवारी पाहता, जवळजवळ सर्वच पिंकाची पाण्याअभावी पीक उत्पादकता घटलेली दिसून येते. महाराष्ट्राची व देशाच्या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे व दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करणे ही देशाची प्रथम समस्या बनु पहात आहे.

आपत्कालिन परिस्थिती

मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता, बदलती हवामान परिस्थिती, काही वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीं तर काही वर्षात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसायात आपत्कालेिन परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे बदलत्या नैसर्गिक घटकांचा शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असतो. तापमान वाढ, कमी अधिक पाऊस, हिमवर्षाव, शीतलहूरी, दोन पावसातील खंड यांचा शेती उत्पादनावर संख्यात्मक व गुणात्मक विपरीत परिणाम होत असतो.

मान्सून उशिरा सुरू झाल्यास पेरणी लांबते तर पेरणीच्या वेळी अतिवृष्ट झाल्यास वेळेवर पेरणी करणे शक्य होत नाही. पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबला तर त्याचा उगवलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊन किंत्येकदा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवते. पेरणी वेळेवर झाली व पीक ही चांगले वाढले तर काही वेळा पीक वाढीच्या अवस्थेत असताना किंवा दाणे भरण्याच्या वेळी पिकास शीतलहरींचा फटका बसल्यास पिकांचे नुकसान होते. अशा प्रकारे निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना लहान व सिमांतीक शेतक-यांना त्यांच्या उपजीविंकेचे साधन केवळ शेती असल्याने मोठ्या संकंटाचा सामना करावा लागतो.

खरीप हगाम आपत्कालिन परिस्थिती नियोजन

खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने ब-याचशा भागात पेरण्या झाल्या नाहीत. उपलब्ध पाण्याचा साठा देखील अनिश्चित असल्याने अशा परिस्थितीत शेतक-यांना कोणते पीक घ्यावे ह्या प्रश्न पडतो. अशावेळेस अवर्षणप्रवण विभागात उत्पादनात स्थिरता येण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या शेती परवडण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांचे नियोजन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पावसाच्या आगमनानुसार खरीप पिकांचे केलेले नियोजन

अ) १५ जुलै पर्यंत पाऊस

  1. पिंके- सोयाबीन, कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, सूर्यफूल, तीळ, मका, खरीप कांदा
  2. आंतरपीक - बाजरी + तूर (२:१) , सूर्यफूल + तूर (२:१). सोयाबीन + तूर (३१), गवार + तूर (२१)
  3. चारा पिके- गोड़ ज्वारी (फुलें गोधन, रुचिरा, अमृता), मका
  4. गवताची पिके - फुले गोवर्धन, फुलें जयवंत

ब) १६ जुलें ते ३१ जुलें पर्यत पाऊस

  1. पिके- सूर्यफूल. तूर, हुलगा, एरंडी, बाजरी, तीळ, सोयाबीन', मका, रागड़ा कांदा
  2. आंतरपीक- सूर्यफूल + तूर (२:१). तूर + गवार (१:२), बाजरी + तूर (२:१)
  3. चारा पिके- गोड़ ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका
  4. गवताची पिके - फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन )

क) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत पाऊस

  1. पिके- सूर्यफूल, तूर, एरंडी, रांगडा कांदा, मका, हुलगा, तीळ
  2. चारा पिके -गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका )
  3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत )
  4. कमी पाणी व्यवस्थापनांर्तगत तांबडा भोपळा व गवार ही भाजीपाला पिके घ्यावीत.
  5. रब्बी ज्वारी करिता पाणी संवर्धनाची तयारी सुरु करावी (Compartment Bunding)

ड) १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत पाऊस

  1. पिके -सूर्यफूल, तूर’, एरंडी, रांगडा कांदा, मका
  2. चारा पिके - गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका
  3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन)

पाणी टंचाई कालावधीतील तूर + सोयाबीन आंतरपीक पद्धतीचे सुधारित तंत्रज्ञान

  1. पाणी टंचाईच्या काळात ६ फुटावर तुरीची पेरणी करून दोन रोपातील अंतर १ फूट ठेवावे
  2. तुरीच्या मधल्या पट्ट्यामध्ये संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सोयाबीनच्या दीड फुटाच्या अंतराने ३ ओळी पेराव्यात.
  3. यात किंवा मधल्या पट्ट्यात रीजरने खोल सरी काढून त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण करावे. किंवा
  4. तूर- सोयाबीन आंतरपीक घेताना ३ फुटावर सलग सरी पाडाव्यात. एकाआड एक वरंब्यामध्ये तूर व सोयाबीनची टोकन करून लागवड

करावी. तुरीची लागवड वरंब्याच्या मध्यभागी (१८o x ३० सें.मी.)

तर सोयाबीन वरंब्याच्या दोन्ही बगलांमध्ये (४५ x १० सें.मी.) लागवड करावी .

आपत्कालिन परिस्थितीत पाऊस पाण्याचे व्यवस्थापन

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम पावसाच्या वितरणावर झाला आहे. वर्षातील एकूण पाऊस सरासरी इतका झाला तरी हंगामाची सुरवात उशिरा होणे, पीक वाढीच्या काळात पावसाच्या दीर्घ कालावधीचे खंड, हंगाम लवकर संपणे, पीक काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील गारपिटीने रब्बी पिके, फळबागा व भाजीपाल्याचे नुकसान याबाबी अलीकडच्या काळात जणू नेहमीच्याच झाल्या आहेत.

हंगामातील पावसाचे दिवस कमी होऊन अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असल्याने गेल्या काही वर्षीपासून राज्यात एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कोरडवाहू शेती अभियान, जलयुक्त शिवार अभियान इ. विविध विकास कार्यक्रमातून विकेंद्रित जलसाठे निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

यामध्ये बांध, साखळी सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण इ. मृद व जल संधारणाची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय, शेततळी सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून सीमित सिंचन किंवा संरक्षित सिंचनाची संकल्पना रुजविली जात आहे.

तसेच जमिनीच्या खोलीनुसार प्रतवारी विचारात घेऊन पिकांचे नियोजन करावे. प्रत्येक पिकाला मुबलक पाणी देण्याऐवजी त्यांच्या संवेदनशील अवस्थेत फक्त एक किंवा दोनच पाण्याच्या पाळया दिल्यास मोजक्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊन एकूण आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ होईल.

गवताची पिके - फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन )

क) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत पाऊस

  1. पिके- सूर्यफूल, तूर, एरंडी, रांगडा कांदा, मका, हुलगा, तीळ
  2. चारा पिके -गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका )
  3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत )
  4. कमी पाणी व्यवस्थापनांर्तगत तांबडा भोपळा व गवार ही भाजीपाला पिके घ्यावीत.
  5. रब्बी ज्वारी करिता पाणी संवर्धनाची तयारी सुरु करावी (Compartment Bunding)

ड) १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत पाऊस

  1. पिके -सूर्यफूल, तूर’, एरंडी, रांगडा कांदा, मका
  2. चारा पिके - गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका
  3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन)

पाणी टंचाई कालावधीतील तूर + सोयाबीन

आंतरपीक पद्धतीचे सुधारित तंत्रज्ञान

  1. पाणी टंचाईच्या काळात ६ फुटावर तुरीची पेरणी करून दोन रोपातील अंतर १ फूट ठेवावे
  2. तुरीच्या मधल्या पट्ट्यामध्ये संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सोयाबीनच्या दीड फुटाच्या अंतराने ३ ओळी पेराव्यात.
  3. यात किंवा मधल्या पट्ट्यात रीजरने खोल सरी काढून त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण करावे. किंवा
  4. तूर- सोयाबीन आंतरपीक घेताना ३ फुटावर सलग सरी पाडाव्यात. एकाआड एक वरंब्यामध्ये तूर व सोयाबीनची टोकन करून लागवड करावी. तुरीची लागवड वरंब्याच्या मध्यभागी (१८o x ३० सें.मी.) तर सोयाबीन वरंब्याच्या दोन्ही बगलांमध्ये (४५ x १० सें.मी.) लागवड करावी .

आपत्कालिन परिस्थितीत पाऊस पाण्याचे व्यवस्थापन

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम पावसाच्या वितरणावर झाला आहे. वर्षातील एकूण पाऊस सरासरी इतका झाला तरी हंगामाची सुरवात उशिरा होणे, पीक वाढीच्या काळात पावसाच्या दीर्घ कालावधीचे खंड, हंगाम लवकर संपणे, पीक काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील गारपिटीने रब्बी पिके, फळबागा व भाजीपाल्याचे नुकसान याबाबी अलीकडच्या काळात जणू नेहमीच्याच झाल्या आहेत.

हंगामातील पावसाचे दिवस कमी होऊन अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असल्याने गेल्या काही वर्षीपासून राज्यात एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कोरडवाहू शेती अभियान, जलयुक्त शिवार अभियान इ. विविध विकास कार्यक्रमातून विकेंद्रित जलसाठे निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

यामध्ये बांध, साखळी सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण इ. मृद व जल संधारणाची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय, शेततळी सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून सीमित सिंचन किंवा संरक्षित सिंचनाची संकल्पना रुजविली जात आहे. तसेच जमिनीच्या खोलीनुसार प्रतवारी विचारात घेऊन पिकांचे नियोजन करावे. प्रत्येक पिकाला मुबलक पाणी देण्याऐवजी त्यांच्या संवेदनशील अवस्थेत फक्त एक किंवा दोनच पाण्याच्या पाळया दिल्यास मोजक्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊन एकूण आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ होईल.

अ) खरीप पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आणि पाण्याच्या गरजेनुसार पिकांचे पाणी व्यवस्थापन

अ.क्र. पिकांचे नाव पाण्याच्या एकूण पाळ्या पाण्याची गरज (से.मी) पाण्याच्या गरजेनुसार पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या अवस्था वाढीच्या अवस्थेचा पेरणी पासूनचा काळ (दिवस)
ज्वारी खरीप ४०-५० गर्भावस्था २८-३०
पिक पोटरीत असताना ५०-५५
पिक फुलोरयात  असताना ७०-७५
दाणे भरताना ९०-९५
बाजरी २५-३० फुटवे फुटण्याची अवस्था २५-३०
पिक फुलोऱ्यात असताना ५०-५५
मका खरीप ४०-४२ रोप अवस्था २५-३०
तुरा बाहेर पडताना ४५-५०
पिक फुलोऱ्यात असताना ६०-६५
दाणे भरताना ७५-८०
भुईमुग खरीप ४०-५० फांद्या फुटण्याची अवस्था २५-३०
आरया उतरण्याची अवस्था ४०-४५
शेंगा भरण्याची अवस्था ६५-७०

अ.क्र. पिकांचे नाव पाण्याची एकूण पाळ्या पाण्याची गरज (से.मी पाण्याच्या गरजेनुसार पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या अवस्था वाढीच्या अवस्थेची पेरणी पासूनचा काळ (दिवस)
5
सुर्यफुल ३०-३५ रोप अवस्था १५-२०
फुलकळ्या लागण्याची अवस्था ३०-३५
पिक फुलावर असताना ४५-५०
दाने भरण्याची अवस्था ६०-६५
6
तूर मुख्य पिक ४०-४५ पेरणीच्या वेळी ३५-४०
फांद्या फुटण्याची अवस्था ६५-७०
फुल येण्याची अवस्था १००-१०५
शेंगा भरण्याची अवस्था १२०-१२५

7

सोयाबीन २५-३० वाढीची अवस्था ३०-३५
फुलोरा अस्ता ४५-५०
शेंगा भरण्याची अवस्था ६०-७०

विहीर पुनर्भरण

दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याची अत्यंत कमतरता असल्याने अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास वाहून जाणारे पावसाचे पाणी विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी मुफूकृवी  , राहुरी  यांनी शिफारस केलेली चार थरांच्या गाळणीचा (चार थर : खडी, जाडवाळू, बारीकवाळू, विटाचा चुरा) शेतक-यांनी वापर करावा. जेणेकरून विहिरीमध्ये पाणी मुरविले जाईल आणि अशा पाण्याचा आवश्यकतेनुसार पिकांना संरक्षित पाणी म्हणून ठिबक / तुषार सिंचनाद्वारे वापरता येईल.

आपत्कालिन परिस्थितीत रब्बी हंगामाचे नियोजन

ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस लक्षात घेऊन रब्बी पिकांचे नियोजन करावे. ज्या भागात ७५ ते १oo मिमी. पेक्षा पाऊस जास्त झाला त्या ठिकाणी रब्बी ज्वारी, हरभरा व करडईची पेरणी करावी. यावर्षी पाऊसमान व पावसाचे वितरण लक्षात घेऊन हलक्या जमिनीमध्ये जवसाचे पीक घ्यावे. रब्बी हंगामामध्ये योग्य वेळी पेरणी करणे महत्वाचे ठरते. रब्बी पिकांच्या दृष्टीने प्रमाणित बियाणांचा वापर करावा किंवा सुधारित दर्जेदार बियाणे वापरावे तथापेि त्याची उगवणक्षमता तपासावी.

अ.क्र. पिकाचे नाव पाण्याच्या एकूण पाळ्या पाण्याची गरज (से.मी.) पाण्याच्या गरजेनुसार पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या अवस्था वाढीच्या अवस्थेचा पेरणी पासूनचा काळ (दिवस)
ज्वारी ३९-४१ गर्भावस्था २८-३०
पिक फुलोऱ्यात असताना ७०-७५
दाणे भरताना ७५ मिमी बाष्पीभवन झाल्यानंतर पाणी द्यावे (वीस दिवसाच्या अंतराने ४-५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात ) ९०-९५
गहू ४-५ ४० मुकुट मुळे फुटण्याची अवस्था १८-२१
फुटवे फुटण्याची अवस्था ३५-४२
पिक फुलोऱ्यात असताना ६०-६२
दाने चिकात असताना ९०-९५
सुर्यफुल ३०-३५ रोग अवस्था १५-२०
फुलकळ्या लागण्याची अवस्था ३०-३५
पिक फुलावर असताना ४५-५०
दाणे भरण्याची अवस्था ६०-६५
करडई २५-३० पिकांची लुसलुशीत वाढीच्या अवस्था २५-३०
पिक फुलावर येताना ५०-६०
हरभरा २५-३० पिकास फांद्या फुटताना ३०-३५
घाटे भरताना

६०-६५

 

क) उन्हाळी पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आणि पाण्याच्या गरजेनुसार पिकांचे पाणी व्यवस्थापन

अ.क्र. पिकांचे नाव पाण्याच्या एकूण पाळ्या पाण्याची गरज (से.मी. ) पाण्याच्या गरजेनुसार पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या अवस्था
भुईमुग १२-१३ ७०-८० पाण्याची पाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे  ०८-ते १० दिवसाच्या अंतराने द्यावी.
कांदा १३-१४ ७५-८० पाण्याची पाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२-१४ दिवसाच्या अंतराने द्यावी .
वांगी १४-१५ ८५-९० पाण्याची पाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १४ दिवसाच्या अंतराने द्यावी

रब्बी पिकांची पेरणी योग्य खोलीवर व अंतरावर करावी. या सोबतच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आच्छादनाचा वापर करावा. तसेच जमिनीतील ओलावा टिकवणे व जमिनीतील उपलब्ध जिवाणूच्या माध्यमातून खताची उपलब्धता वाढविण्याकरिता सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यादृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. रब्बी पिकांमध्ये आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास जमीन, पाणी, अन्नद्रव्य सूर्यप्रकाश याचा कार्यक्षम वापर करून बाजारभावातील जोखीम कमी होते तसेच पिकामध्ये कोड व रोग नियंत्रणाच्या दृष्टीने विविध प्रतिबंधात्मक उपाय तसेच जैविक कोड व रोगनाशकांचा वापर करावा. यातून खर्च कमी होईल तसेच किडीचा बंदोबस्त करता येईल.

आपत्कालिन परिस्थितीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब

पावसाने ओढ दिल्यास उगवलेली पिके वाचविण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. तसेच पीक उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. तुषार व ठिबक संच विविध शासकीय योजनामधून अनुदानावर उपलब्ध आहेत. प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नसते. तसेच पिकाला नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणे तुषार सिंचन पद्धतीत शक्य आहे.

प्रवाही सिंचन पद्धतीत शेतीचारीतुन ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. ज्या जमिनीचा पाणी

झिरपण्याचा वेग जास्त आहे, अशा जमिनीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. सरी, वरंबे व चरीखालील  जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास १६ टक्के जास्तीचे क्षेत्र वापरता येते. आधुनिक -- सिंचन पद्धतीचा अवलंब करून नेमकेच पाणी दिल्याने फै पाण्याचा निचरा खोलवर होत नाही व जमिनीची धूप \ होत नाही, तसेच, या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य असते. पाणी वापरातील बचत ५० टक्क्यांपर्यंत व ` उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने व मुळाभोवतीची संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते, तुषार वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते. पाण्याच्या कमतरतेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर (ठिबक सिंचन व तुषार सिंचन) पिकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपांत करावा. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो तसेच आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर न केलेल्या पिकांच्या तुलनेत १oo टक्के उत्पादनात वाढ दिसून येते आणि उत्पादित होणा-या मालाची गुणवत्ता व प्रत देखील उल्लेखनीय असते.

फायदे

  1. ४०-६० टक्के पाण्याची बचत होते.
  2. गरजेनुसार आद्रता पुरविणे.
  3. आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य होते.
  4. तसेच खते, कीटकनाशके देता येतात.
  5. बाष्पीभवन कमी होते.
  6. जमिनीची सुपीकता वाढते.
  7. कोड व रोग तण नियंत्रण होते.
  8. पाणी थेट पिकाच्या मुळाजवळ देणे शक्य होते.
  9. गुणवत्तापूर्व आणि दर्जेदार अधिक उत्पादन मिळते.
  10. वा-याचा परिणाम पाण्याच्या थेंबावर होत नाही.
  11. कोणत्याही परिस्थितीत आवश्यक तेवढेच पाणी पिकास उपलब्ध होते

क्षेत्रावरील उपलब्ध असलेले पाणी, उपलब्ध स्रोत

उदा. विहीर, बोअरवेल, शेततळे, नाला, तळे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, लघू बंधारे, मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्पातील  पाणी वापर, पीक आणि हंगामनिहाय आधुनिक सिंचन  प्रणालीद्वारे गरजेनुसार उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता  वाढविणे गरजेचे आहे. त्याकरिता वरीलप्रमाणे सुचविण्यात आलेल्या सर्व तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिक उत्पादनात वाढ घडविणे सहज शक्य होईल आणि जमिनीची आरोग्य देखील अबाधित राहून सुपीकता वाढविण्यास मदत होईल .

 

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate