অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रबर लागवड तंत्रज्ञान

रबर लागवड तंत्रज्ञान

सायकलीपासून मोठ्या आणि जड वाहनांच्या टायरसाठी तसेच  वेगवेगळया उद्योगधंद्यामध्ये, कारखान्यामध्ये रबराचा वापर फार मोठया प्रमाणात केला जातो.

जवळपास ८0 टक्के नैसर्गिक रबराचाच वापर केला जातो, म्हणून रबर झाडांच्या लागवडीकडे जास्तीतजास्त अरुणाचलप्रदेश, गोवा, ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान-निकोबार आणि महाराष्ट्र इ. राज्यांच्या जास्त पाऊस आणि डोंगर उताराच्या भागात रबराची झाडे पहायला मिळतात. ही झाडे नैसर्गिक पध्दतीने किंवा अलिकडे लागवड पध्दतीने केलेली पहायला मिळतात.

रबर लागवडीसाठी वार्षिक पर्जन्यमान २000 ते ३000 मि. मी. एवढे असावे लागते. हवामान उष्ण, सुर्यप्रकाश भरपूर व तापमान २१ ते ३५ अंश से. असावे. १00 सें. मी. खोलीची पण उत्तम निच-याची व सामू४ ते ६.५ पर्यंत असलेल्या जमिनीत रबर झाडांची वाढ झपाटयाने योग्य वातावरणाच्या भागात रबराची लागवड करून पहिली २ ते ३ वर्षे चांगली निगा आणि काळजी घ्यावी.

साधारणत: ६ ते ७ वर्षांनंतर चिकाचे उत्पादन सुरू होते, त्यापुढे सातत्याने दरवर्षी २५ वर्षे रबरचीक मिळत राहतो. झाडाचे वय ३o वर्षाचे झाल्यानंतर चीक मिळण्याचे प्रमाण कमी होते म्हणून झाड तोडून त्याच्या लाकडाचा वापर उत्तम प्रतीच्या फर्निचरसाठी, येणा-या बियापासून अखाद्य तेल काढता येते. या तेलाचा उपयोग उत्तम प्रतीची साबणे तयार करण्यासाठी होतो. तेल काढून राहिलेल्या चोथ्याचा रबराच्या निवड आणि संकरित अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. संकरित जातीपासून रोपे तयार करून रोपाव्दारे लागवड करावी लागते.

साधारणतः १६ x १६ फूट अंतरावर ७५ x ७५ x ७५ सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खडे घ्यावेत.

खत, कसदार माती, रॉकफॉस्फेट, कुजलेले सेंद्रिय पदार्थ, थोडासा ट्रायकोडर्मा टाकून खडु भरून घ्यावेत. चांगल्या मोसमी पावसाला सुरूवात झाल्यानंतर त्या खडुयात रबर रोपांची लागवड करावी. एकरी २०० रोपे बसतात. सुरुवातीची २ ते ३ वर्षे खतपाणी आणि इतर बाबींची काळजी घ्यावी. त्यानंतर ६ ते ७ वर्षांनी झाडाच्या खोडाची उंची १२५ सें.मी. (४ फूट) आणि त्या उंचीपर्यंतच्या खोडाची गोलाई ५ सें.मी. एवढी झाली असेल तर चीक काढण्यास सुरुवात करावी. चीक काढण्याचे तंत्र समजून घेऊन चीक काढावा. एकाद्या रबर बागेतून चीक कसा काढायचा याचे अनुभवातून प्रशिक्षण घ्यावे, म्हणजे सोईचे होते.

प्रत्येक झाडापासून एक दिवसाआड चीक काढता येतो. वर्षांकाठी प्रत्येक झाडापासून १५० वेळा चीक काढता येतो. रबर झाडाच्या १२५ सें.मी. उंचीवरच्या खोडावर ३० अंश उताराच्या झाडाच्या भागावर आतल्या गाभ्याला इजा न होता १.५ मि.मी. एवढा काप (खाच) घेऊन एका विशिष्ट अशा कपात तो चीक भरून जमा करावा. दिवसाआड कपात

जमा केलेला चीक सकाळी बादल्यामध्ये जमा करावा. बादलीत जमा केलेला चीक ६० मेसच्या गाळणीतून गाळून घेऊन त्यात चिकाच्या दुप्पट पाणी ओतावे. त्यानंतर या मिश्रणात एक टका फार्मिक अॅसिड मिसळून ते एकसारखे ढवळावे. चांगले ढवळलेले हे मिश्रण वेगळया प्रकारच्या खास तयार केलेल्या ट्रेमध्ये २४ तास ठेवावे. त्यानंतर त्यातले पाणी काढून टाकावे.

खाली राहिलेली रबराची लादी चांगली सुकवून पुन्हा ४ ते ५ दिवस उन्हात सुकवावी म्हणजे चांगल्या प्रकारची रबरलादी तयार होते. या नैसर्गिक रबर लाद्यांना विशेषत: ज्या लाद्यांना करडा रंग प्राप्त झाला आहे, साधारणत: एकरात २oo झाडे बसतात. दरवर्षी २oo झाडांपासून १000 ते १२oo किलो शुध्द रबर मिळतो. पुढे दरवर्षी एवढ्या प्रमाणात रबराचे उत्पादन मिळते.

२५ वर्षांपर्यंत रबर झाड चिकाचे उत्पादन देते. चिकाबरोबरच बियाचे उत्पादनही मिळते आणि या बियापासून अखाद्य तेल मिळते. तेल काढून राहिलेली पेंड पशुखाद्यात वापरता येते. त्यानंतर रबर झाडांना सुवासिक फुले मोठया प्रमाणात येतात. मध पेटयासाठी याचा चांगला उपयोग होतो. म्हणजे रबर झाडापासून गुणवत्तेचा नैसर्गिक रबर लागवडीपासून वर्षाकाठी एका एकरातून अतिशय कमी उत्पादन खर्चात लाखभर रुपये निळ्ळ उत्पन्न मिळते. म्हणजे ब-यापैकी उत्पन्न मिळवून देणारे हे पीक आहे. जास्त पाऊसमान असणा-या कोकणात आणि पश्चिम घाटमाथ्याच्या भागात रबर लागवडीला योग्य वातावरण अनुकूल असून या भागात लागवड यशस्वीही झाली आहे. मोठया प्रमाणात या भागात लागवड झाली तर नैसर्गिक रबराचे उत्पादन वाढेल.

जेथे अनुकूलता आहे तेथे सलग पडजमिनीवर, डोंगर उताराच्या जमिनीवर, बांधावर जेवढी झाडे लावता येतील तेवढी झाडे लावून रबर उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करावा. ज्या ठिकाणी रबर लागवडीसाठी अनुकूल हवामान आहे, तिथल्या शेतक-यांनी इतर जंगली निरुपयोगी झाडे वाढविण्यापेक्षा रबराची झाडे वाढवण्याकडे लक्ष द्यावे.

अगदी एकाद्याला १o ते २o झाडे लावता आली तर त्यांना त्यापासून चांगले पैसे मिळतील म्हणून सलग नाही लावता आली तर बांधावर, तालीवर, ओढाकाष्ठ अगर पडीक जमिनीवर ५ ते २५ रबर झाडे रबर लागवडीची माहिती घेऊन जास्त पाऊस आणि उष्ण हवामान असणा-या भागात जास्तीतजास्त आणि मोठयाप्रमाणात रबराची लागवड पातळीवरच्या शेतक-यांनी व इतर संस्थांनी रबर लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन रबर लागवडीस चालना द्यावी.

सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अगर रबर बोर्ड प्रादेशिक कार्यालय, तिस्क फोंडा, गोवा यांचेशी संपर्क साधावा ९४२२७७४o९0

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate