অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रब्बी पिकातील तण व्यवस्थापन

तणे ही कृषि उत्पादन पद्धतीमधील प्रमुख जैविक अडथळा आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पादनातील घट ही केवळ तणांमुळे येते. तसेच तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. तणामुळे केवळ पीक उत्पादनच घटत नाही तर तणांच्या प्रादुर्भावामुळे कृषि उत्पादनाची गुणवत्ता, जैव विविधता, मनुष्याचे व प्राण्यांचे आरोग्य या गोष्टींवरही विपरीत परिणाम होतो. तष्ण व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रज्ञान विकसित करूनही तणांचा प्रादुर्भाव अपेक्षेप्रमाणे नियंत्रित करता आलेला नाही, याची बरीच करणे आहेत. यात प्रामुख्याने रासायनिक खत व पाणी यांचा अतिरेक वापर, अधिक उत्पादन देणा-या जातींचा वापर, अधिक प्रमाणात जमिनीची मशागत, एकपीक पध्दतीत द्विदल पिकांच्या अंतर्भावाचा अभाव, जागतिकीकरण व हवामानबदल तसेच परदेशी तणांचा प्रादुर्भाव, तणनाशकास प्रतिकारक्षम अशी तयार होणारी तणे या बाबी भविष्यात तण व्यवस्थापनातील प्रमुख अडथळे ठरणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता तणांत विविधांगी गुणधर्मामुळे कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता तणांचे सातत्याने परीक्षण आणि तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे.

तणांमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पिके व पिकांच्या सभोवतील कृषि परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते. तणांमुळे पीक उत्पादनात सरासरी ३३ टक्के घट येते, या तुलनेत कीटकांमुळे २६ टक्के, रोगामुळे २० टक्के व इतर घटकांमुळे २१ टक्के घट येते. याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांमुळे येणा-या घटीपेक्षा पीक उत्पादनामध्ये तणांमुळे येणारी घट ही अधिक असते. आपल्या देशाचे भरडधान्य, कडधान्य व तेलबिया पिकामध्ये प्रतिवर्षी रु. ५० हजार कोटीचे नुकसान निविष्ठा कार्यक्षमता, पिकावर वाढणारे कोड व रोगांचा प्रादुर्भाव याचा विचार करता तणांमुळे होणा-या वार्षिक नुकसानीची आकडेवारी ही अधिक होऊ शकते.

या सर्व बाबींचा विचार करता प्रभावी तण व्यवस्थापनासही पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे.

तण नियंत्रणाच्या पद्धती

प्रतिबंधात्मक उपाय

तणांचा शेतामध्ये प्रादुर्भाव व तणांची वाढ होऊ उदा. प्रमाणित बियाणांचा वापर करणे, तण विरहित बियाणे पेरणीकरिता वापरणे, पेरणीपूर्वी तणे नष्ट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत / कंपोस्टखत वापरणे, जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे, शेताचे बांध पाण्याच्या चारी/पाट व शेतातील रस्ते तण विरहित ठेवणे इत्यादि.

निवारणात्मक उपाय

तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. यामध्ये प्रामुख्याने भौतिक, मशागत व यांत्रिक पद्धतीचा समावेश होतो.

उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्छादनाचा वापर करणे.

मशागत पद्धती

स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतीचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, प्रती हेक्टरी पिकाची अवलंब करणे, पिकास खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा अवलंब करणे या व्यतिरिक्त जैविक व रासायनिक पद्धतीने तणांचा व्यवस्थापन केले जाते. तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा वापर करून त्यांचे दिसून येणारे अपेक्षित परिणाम व विशिष्ट प्रकारच्या तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावयाची शक्यता ही प्रामुख्याने तणांचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र, त्या भागातील हवामान परिस्थिती, त्या विभागाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती, आर्थिक बाजू व वापरावयाच्या पद्धतीची कार्यक्षमता या घटकांवर अवलंबून असते. वरील प्रतिबंधात्मक व निवारणात्मक तण व्यवस्थापन पद्धतीचा विचार दर यामुळे पारंपरिक यांत्रिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे शेतक-यांना अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक पद्धतीने तण व्यवस्थापन हा पर्याय शेतक-यांनी अंगीकारला असून, आजमितीस कृषि क्षेत्रात तण व्यवस्थापनाकरिता तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये सन १९७०-७१ मध्ये तणनाशकांचा वापर केवळ १६ मेट्रिक टन होता. तो आजमितीस वाढून सन २०११-१२ मध्ये २० हजार मेट्रिक टनावर पोहचला आहे, परंतु रासायनिक पद्धतीने योग्य ताण व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे.

  1. लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे.
  2. तणनाशकाचा शिफारशीत मात्रा इतकाच वापर करणे. त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे.
  3. योग्य वेळी तणनाशकांची फवारणी उदा. तणनाशकाच्या प्रकारानुसार पीक पेरणीपूर्वी तणनाशक जमिनीत मिसळणे, पीक पेरणीनंतर परंतु पीक व तण उगवण्यापूर्वी जमिनीवर तणनाशक फवारणे व पीक व तणे उगवल्यानंतर तणनाशकाची पिकावर व तणावर फवारणी करणे.
  4. तणनाशक फवारणी पद्धतीनुसार नोझलचा वापर करणे.

परंतु या तांत्रिक बाबी संदर्भातील ज्ञानाचा अभाव असल्यास त्याचा विपरीत परिणाम तण व्यवस्थापनावर होऊन फवारणी केलेल्या पिकावरही होऊ शकतो, किंबहुना पूर्ण पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अधिक काळ जमिनीत अंश राहणा-या तणनाशकामुळे इतर संवेदनशील पीक घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे रासायनिक पद्धतीचा अवलंब करताना वरील बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. रब्बी हंगामातील पिकातील प्रभावी तण व्यवस्थापन कसे करावे, तण व्यवस्थापनासंबंधी कृषि विद्यापीठाने कोणते तंत्रज्ञान विकसित करून शेतक-यांसाठी शिफारशीत केलेले आहेत, याचा उल्लेख या लेखात करण्यात आलेला आहे.

रब्बी पिकातील रासायनिक व एकात्मिक तण व्यवस्थापन

अ.क्र. पिकाचे नाव वापरावयाच्या तणनाशकाचे शास्त्रीय नाव तणनाशकाचे प्रमाण प्रती १0 लीटर पाण्याकरिता तणनाशकामुळे नियंत्रित होणारे तणांचे प्रकार तणनाशक वापरण्याची पद्धत
१) रब्बी ज्वारी अॅट्राझीन - ५0 टक्के डब्लू.पी. ४० ते ८० ग्रॅम सर्व प्रकारची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ८0 ते १00 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे
२-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी. २५ ते ३६ ग्रॅम वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवडयानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
२) मका अॅट्राझीन ५० टक्के डब्लू पी. ४० ते ८० ग्रॅम सर्व प्रकारची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ८0 ते १00 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
२-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी. २५ ते ३६ ग्रॅम वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवडयानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
३) गहू पेंडोमिथिलीन ३० टक्के ई.सी. ७0 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी
मेथॉबॅथीझुरॉन ७० टक्के डब्लू पी. २१ ते २८ ग्रॅम जंगली ओट, केना गवत,रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी
२-४-डी डायमेथील अमाईन क्षार ५८ टक्के ई.सी. १७ ते २० मि.ली. सर्व रुंद पानाची तणे हे तणनाशक गव्हाच्या वाढीच्या अवस्थेशी संवेदनशील असल्यामुळे याची फवारणी जास्तीत जास्त फुटव्याच्या अवस्थेत करावी. वेळेवर पेरणीच्या गव्हाच्या पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी उशिरा पेरणीच्या गव्हाच्या ४५ ते ५० दिवसांनी करावी.
२-४-डी इथील इस्टर २६ ते ४४ मि.ली.
३८ टक्के ई.सी. २-४-डी सोडियम क्षार ८० टक्के डब्लू.पी. १२ ते २५ ग्रॅम
मेट्रीब्यूझिन ७० टक्के डब्लू. पी. ५ ते ६ ग्रॅम जंगली ओट, केना गवत,रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
मेटसल्फ्युरॉन मेथाइल २० टक्के डब्लू.पी. २.५ ग्रॅम रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
४) हरभरा, मसूर व वाटाणा पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० ते ८० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८ ते १० मि. ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
५) बागायती भुईमुग ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८.५ ते १७ मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
इझामेथापर १० टक्के एस.एल. १५ ते २० मि. ली. काही रुंद व अरुंद पानाची तणे पेरणीनंतर २० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
६) सुर्यफुल पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
७) बटाटा पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ५० ते ६० मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे. लावणीनंतर ३० दिवसांनी खुरपणी करावी.
ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ७५ मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
क्युझालोफोप इथाइल ५ टक्के ई.सी. १० ते १५ मि.ली. गवतवर्गीय तणे बटाटा लावणीनंतर २० ते २५ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
मेट्रीब्यूझिन ७० टक्के डब्लू. पी. १५ ते २० ग्रॅम गवतवर्गीय रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर ३ ते ४ दिवसांनी किंवा बटाटा पिकाची उंची ५ सें.मी. झाल्यानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.

तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी

  1. फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा.
  2. तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक.
  3. फवारणी वारा शांत असताना करावी.
  4. फवारणी पंपासाठी शिफारशीनुसार नोझलचा वापर करावा.
  5. फवारणीसाठी लागणारे पाणी ठरविण्याकरिता फवारणी पंप कॅलीबरेट करुन घ्यावा.
  6. तणनाशके पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा, हाताचा वापर कस्त नये.
  7. तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गढूळ किंवा गाळ मिश्रित पाणी वापरु नये.
  8. अपेक्षित ताण नियंत्रणाकरिता शिफारस तणनाशकाची मात्रा फवारणी क्षेत्रावर पडेल याची काळजी घ्यावी.
  9. फवारणी करीत असताना सेवन, धूम्रपान किंवा डोळे चोळणे टाळावे.
  10. तणनाशक खरेदी करण्यापूर्वी संबधित तणनाशकाचा फवारणी करावयाच्या पिकाकरिता लेबलक्लेम आहे किंवा नाही, याची खात्री करावी.
  11. तणनाशके फवारण्यापूर्वी फवारणी करावयाच्या क्षेत्राजवळ दुसरे करुनच योग्य ती काळजी घेऊन तणनाशकाची फवारणी करावी.

तणनाशक फवारणीसाठी वापरावयाचे नोझल्स

तणनाशकाच्या प्रकारानुसार फ्लॅटफेन अथवा फ्लडजेट प्रकारातील नोझलचा वापर तणनाशक फवारणी करताना करावा. जमिनीवर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेटनोझलचा वापर करावा. तणनाशक फवारणी करताना होलोकोन व सॉलिडकोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate