অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शून्य मशागत तंत्रज्ञान

शून्य मशागत तंत्रज्ञान

अमेरिकेतील ओरेगॉन आणि वॉशिंग्टन भागातील ज्या गहू उत्पादकांनी शून्य मशागत तं त्रज्ञानाचा वापर केला आहे त्यांच्या शेतातील मातीची धूप कमी होण्यास व मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधन विभागातर्फे नुकताच एक प्रयोग हाती घेण्यात आला होता.

यात मातीची धूप, पीक उत्पादन यांचा परस्पर संबंध दर्शविण्यात आला होता. एकूण 13 पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून संकलित केलेल्या माहितीवरून असे निष्पन्न झाले की तेथील मशागत पद्धतीचा वापर केलेल्या शेतांमध्ये मातीची धूप झाली आहे, तर तीन पर्जन्यमानांमध्ये शून्य मशागत पद्धतीचा वापर केलेल्या शेतांमध्ये मातीची धूप झाली नसल्याचे आढळले.

शून्य मशागत पद्धतीचा वापर केल्याने मातीचा पृष्ठभाग विस्कटला जात नाही. मातीच्या पृष्ठभागाखाली पाणी झिरपण्यास मदत होते. शून्य मशागत केलेल्या शेतांमध्ये कार्बन अधिक साठून राहण्यास मदत होते. अमेरिकेतील विविध भागांत शास्त्रज्ञांनी या विषयावर प्रयोग केले असून या पद्धतीचे निष्कर्ष उत्साहवर्धक आढळले आहेत.

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate