অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिमारुबा लागवड

सिमारुबा लागवड

सिमारुबा (लक्ष्मीतरू) या वनस्पतीच्या बियांमध्ये 55 ते 60 टक्के तेल असून, त्याचा खाद्यतेलासाठीही वापर करतात. या वृक्षाची लागवड 4 ु 4 मीटर किंवा 5 ु 5 मीटर अंतरावर करता येते. हलक्‍या जमिनीत 60 ु 60 ु 60 सें.मी. व भारी जमिनीत 45 ु 45 ु 45 सें.मी. आकाराचे खड्डे खोदून ते शेणखत, मिश्रखत आणि चांगल्या मातीने भरून घ्यावे. रोपांची लागवड करण्याअगोदर खड्ड्यात लिंडेन पावडर टाकावी. रोपांची लागवड जून, जुलै महिन्यांत करावी. लागवड करताना रोप खड्ड्याच्या मध्यभागी लावून माती पायाने दाबून घ्यावी. लागवडीसाठी सहा महिने ते एक वर्षे वयाच्या रोपांची निवड करावी.

सिमारुबाचे उपयोग

तेल

सिमारुबाच्या तेलाचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. त्यात औद्योगिक क्षेत्रात औषधेनिर्मिती, कलर, वंगण, साबण, इ.साठी वापर केला जातो. 2) पेंड - सिमारुबा तेलाच्या पेंडीमध्ये 7.7 ते 8.1 टक्के नत्र, 1.07 टक्के स्फुरद व 1.24 टक्के पालाश असून, त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करतात. 3) फळाचा गर - गरामध्ये साखरेचे 11 टक्के प्रमाण असते. यामुळे शीतपेये तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 4) पाने व साल - सिमारुबा झाडाच्या पानांत व सालीमध्ये सिमारुबीन रसायन द्रव्य असते. त्याचा उपयोग डायरिया, कुष्ठरोग, मलेरिया रोगांवरील औषधीनिर्मितीसाठी केला जातो. 5) लाकूड - लाकूड हलके व टिकाऊ असल्याने त्याचा उपयोग हलके फर्निचर, खेळणी, आगपेटी, पेपर इ. उपयोगात केला जातो. लाकडाची ज्वलनक्षमता चांगली असल्यामुळे त्याचा उपयोग जळाऊ लाकूड म्हणून केला जातो. 6) सिमारुबा वृक्षाला फुले मोठ्या प्रमाणात येतात. अशा फुलोरा असताना त्यामध्ये मधमाश्‍यांच्या पेट्यांद्वारे मधमाशीपालनाचा उद्योग चांगल्या प्रकारे करता येतो. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सिमारुबाची रोपे उपलब्ध आहेत.


संपर्क - 02426- 243252
वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate