অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय अन्न व्यवसायासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग

सेंद्रिय अन्न व्यवसायासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग

आपणास माहितीच आहे कि सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजन हा सुखी व निरोगी राहण्याचा प्रयत्न करत आहे तसेच निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला सकस आहार घेण्याची गरज भासत आहे. पूर्वीच्याकाळी जैविक/सेंद्रिय अन्नधान्य असे वेगळे काहीच नव्हते, कारण सर्व काही उत्पादित अन्त्र हे जैविक/सेंद्रियच होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सुध्दा सेंद्रिय अन्न आवश्यक झाले आहे. कारण की सध्या अन्नधान्यामध्ये (शेतामध्ये) रासायनिक कीटकनाशक व औषधी वापरामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे किडनी रसायनविरहित अन्नधान्य उत्पादित करुन त्याचा आता तरुणवर्गानी त्याकडे लक्ष देऊन आपल्या हातातील मोबाइलचा उपयोग आपल्या शेतीसाठी कसा करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.

ज्या शेतकरी वर्गाकडे ४ ते ५ एकर शेती आहे, असे बरेचशे शेतकरी त्यांनी लावलेला भाजीपाला व इतर धान्य हे भाजीमंडईत न विकता स्वत:चे छोटे दुकान टाकून 'सेंद्रिय उत्पादित भाजीपाला किंवा 'सेंद्रिय उत्पादित धान्य' अशी पाटी लावून सरळ ग्राहकांना ते विकू शकतात व चांगला मोबदला कमावू शकतात. मी माझ्या तरुण शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, त्यांनी आता नवीन माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला/ पिकवलेला माल विकण्यासाठी करावा, बरेचदा आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही, परंतु आपणसुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतीची वाट धरुया. आपल्या गावातील दोन ते चार प्रगतिशील शेतकरी मिळून एक वेबसाइट तयार करून त्यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला माल ते online च्या माध्यमातून विकू शकतात. on-line खरेदीमध्ये एवढ्या प्रमाणात वाढ होईल असे वाटले नव्हते, परंतू आज प्रत्येक घराघरात संगणकावर/ मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी व्यवहार होत आहेत व त्या सर्व कंपन्या अफाट पैसा कमावत आहेत.

आपण तर माल पिकवणारे शेतकरी, मग आपला सुद्धा माल आपण त्याच पद्धतीनुसार विकल्यास हरकत काय? आवश्यकता आहे ती आपल्या दृढ संकल्पनेची व योग्य शेतकरी मित्रांची. आज बरेचशे शेतकरीबांधव सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विकून इतर ठिकाणच्या भाजीपाल्यापेक्षा जास्त दर घेत आहेत. स्वास्थाबाबत सजग ग्राहक आपल्या व आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी शुद्ध व दर्जेदार सेंद्रिय अन्नधान्याकरीता जास्त पैसे मोजण्यास तयार आहेत, गरज आहे ती सेंद्रिय पदार्थाच्या सहज उपलब्धतेची.

आपणास माहितच आहे की, रासायनिक कीटकनाशके वापराचा परिणाम काही प्रमाणात आपल्या कुटुंबाच्या स्वास्थावर होत आहे. आयुष्यभर कमावलेला पैसा हा पुन्हा औषधोपचारावर खर्च होत आहे. आज सर्वांना सेंद्रिय शेतीव्दारे उत्पादित केलेल्या मालाची आवश्यकता आहे. विशेषत: तरुण शेतकरी बांधवांनी याकडे लक्ष केंद्रित करून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या स्वतःची एक संगणकावर छोटी ... (संकेतस्थळ) तयार केल्यास उत्पादनाची माहिती उदा: गहू, ज्वारी, डाळ, इत्यार्दीची माहिती आपण छोट्या प्रमाणात टाकू शकतो. सुरुवातीला आपण आपल्या मोबाईलवरून y:ST what's App (Social networking)च्या माध्यमातून मदत घेऊ शकतो व आपल्या उत्पादनाचा प्रचार करु शकतो.

आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर इंटरनेट चालू करून Google सर्च इंजीन या संकेतस्थळावर गेल्यास आपणाला ब-याच प्रकारच्या सेंद्रिय अन्नपदार्थाची माहिती ( Organic Farming Food Website असे टाईप  करून घेवू शकतो तसेच वेगवेगळ्या संकेतस्थळांची बरीच माहितीसुध्दा मिळू शकते.

सेंद्रिय शेती प्रकल्प ही आता काळाची गरज झालेली आहे. भविष्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने घरपोच सेंद्रिय अन्न मिळू लागेल. ज्या तरुणवर्गांना इंटरनेटची उपयुक्तता समजली आहे, त्यांनी आपल्या स्वतःची Website (संकेतस्थळ) तयार करून स्वतःचा व्यवसाय चालू करावा.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate