অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्पिरूलीना : एक परिपूर्ण आहार

स्पिरूलीना : एक परिपूर्ण आहार

पोषण मूल्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक प्रथिने आहे. या प्रथिनांचा पारंपरिक स्रोत म्हणजे कडधान्ये, मांस आणि तृणधान्ये. वाढत्या लोकसंख्येच्या आहाराच्यादृष्टीने पारंपरिक प्रथिनांच्या स्रोतांच्याबरोबरीने अपारंपरिक स्रोतांचा वापर करावा लागणार आहे, त्यासाठी स्पिरूलीना हा चांगला पर्याय आहे.

स्पि रूलीना हे एक निळे-हिरवे शेवाळ आहे. यामध्ये 55 ते 72 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. याचबरोबरीने यामध्ये बिटा कॅरोटीन, जीवनसत्त्व-अ याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच जीवनसत्त्व-ब 12, जीवनसत्त्व-इ, फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह यांसारख्या खनिजांचे प्रमाण चांगले आहे. याशिवाय कॅरोटीनाईड, क्‍लोरोफिल ही रंगद्रव्येसुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार 1000 किलो विविध भाजीपाल्यांतून जेवढे अन्नघटक मिळतात तेवढे अन्नघटक फक्त एक किलो स्पिरूलीनातून मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेने 1974 च्या परिषदेत स्पिरूलीनाला भविष्यातील सर्वोत्तम अन्न म्हटले आहे. स्पिरूलीनाचा वापर आहार, आरोग्य, सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. स्पिरूलीना उत्पादन हे आपल्याला व्यावसायिक तत्त्वावर किंवा घरगुती पद्धतीने थोड्या प्रमाणात करता येते. स्पिरूलीनाच्या उत्पादनासाठी तांत्रिक सखोल ज्ञानाची आवश्‍यकता आहे.

स्पिरूलीनाचे फायदे

  • श्रयामधील प्रथिने सर्वाधिक प्रमाणात असून कमी उष्मांक, कोलेस्टेरॉलरहित आहेत. त्याचप्रमाणे त्याची पचनीयता सुद्धा 90-95 टक्के आहे. त्यामुळे कुपोषित लोकांसाठी, वयस्करांसाठी सर्वोत्तम पौष्टिक अन्न आहे.
  • श्खेळाडूंमध्ये स्टॅमिना वाढविणे, वजन स्थिर ठेवणे, शक्तिवर्धक अन्न म्हणून वापर होतो.
  • श्रयामध्ये असणाऱ्या बिटा कॅरोटीनमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच रातांधळेपणा, मोतीबिंदू यांसारखे डोळ्यांच्या विकारांचे प्रमाण कमी होते.
  • श्रगॅमा लीनोलीनिक आम्लामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळवली जाते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी केले जाते. यामुळे हृदयरोग, रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात यांसारख्या व्याधींवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते.
  • श्रस्पिरूलीनामध्ये सर्वाधिक प्रमाणात लोह असल्यामुळे ऍनिमिया प्रतिबंध होतो, त्याचप्रमाणे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
  • श्रविषाणूजन्य रोगाच्या प्रसारास प्रतिबंध होतो. चिरतारुण्य टिकविले जाते.
  • श्रयामध्ये कमी उष्मांक असल्यामुळे शरीर काटक ठेवणे, वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
  • श्रशरीरातील पांढऱ्या व तांबड्या पेशी निर्मितीस मदत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.
  • श्रमधुमेह, संधिवात, मोतीबिंदू, कॅन्सर यांसारख्या आजाराच्या उपचारासाठी होतो.
  • श्रयाचा वापर लहान मुलांची सुदृढ वाढ होण्यासाठी उपयोगी ठरते.
  • श्रसौंदर्यप्रसाधनांमध्ये (लीपस्टिक, आयशॅडो) नैसर्गिक रंग म्हणून याचा वापर होतो. विविध सौंदर्यप्रसाधनांच्या क्रीम (ऍन्टी मार्क क्रीम, फेस पॅक इ.) मध्येही वापर होतो.


संपर्क : 02422 - 252414, 253612
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, ता. राहाता, जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate