Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:46:22.718436 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:46:22.723973 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:46:22.752936 GMT+0530

अंजन

अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे.

अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान इत्यादी देशांत हा आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनांत हा वृक्ष आढळतो.

अंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे २५ - ३५ मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे १२ - १५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची, एकाआड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून २-६ सेंमी. लांब आणि २-३ सेंमी. रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, हिरवट-पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येतो. या वृक्षाच्या शेंगा ६ - ९ सेंमी. लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते. ती टोकाकडून बाहेर पडते.

अंजन या वृक्षाचा पाला गुरे खातात. तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घरबांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते.

 

लेखक : नरेंद्र देशमुख

स्त्रोत: मराठी विश्वकोश

2.97916666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:46:22.922323 GMT+0530

T24 2019/10/18 04:46:22.929070 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:46:22.660998 GMT+0530

T612019/10/18 04:46:22.678728 GMT+0530

T622019/10/18 04:46:22.707864 GMT+0530

T632019/10/18 04:46:22.708690 GMT+0530