Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:12:20.706106 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/26 17:12:20.711493 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:12:20.740961 GMT+0530

एरंड

एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते.

एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. काही भागात ही वनस्पती लागवडीशिवायही वाढलेली आढळते. एरंड हे ३-५ मी. उंचीचे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूळ असते. पाने हस्ताकृती, विभागलेली पण साधी असतात. पानांचे खंड दातेरी आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर द्विलिंगी हिरवट फुले डिसेंबर-मार्च मध्ये येतात. नरफुले खालच्या भागात आणि मादीफुले वरच्या भागात असतात. फळे काटेरी व गोलाकार असून तडकून फुटणारी (स्फुटनशील) असतात. काटेरी बोंडात एक-बीजाणू तीन बिया असतात. बिया कठिण, लांबट व पिंगट असून त्यावर चित्रविचित्र ठिपके असतात.

एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. याचे मूळ दाहक व वातनाशक आहे. ते सूज,  ज्वर, दमा, कफ व आतड्यातील कृमी यांवर उपयुक्त असते. पानांचा काढा दुग्धवर्धक असतो. बियांपासून काढलेल्या तेलाला एरंडेल म्हणतात. ते रेचक असून हत्तीरोग, आकडी इत्यादींवरही उपयुक्त असते. तेलात केरोसिन  १:७  या प्रमाणात मिसळून इंधन म्हणून वापरतात. गोठणबिंदू कमी असल्यामुळे हे तेल विमानातील यंत्रांत वंगण म्हणून वापरतात. साबण, मेणबत्त्या व सुवासिक तेले यांसाठी ते वापरतात. कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे व कातड्याचे उद्योगधंदे यांकरिता ते उपयोगात आहे.

 

लेखक : वि. ज्ञा. लाळे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

2.93333333333
khillari nana Feb 06, 2016 01:06 PM

Mala arandel sheti karayhi ahe tya vishyai adik mahiti havi ahe jase bij khate pani niyojn bajar prth market bajar bhav etc. Hi mahiti kuthe milel
99*****40 whatsap no.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:12:20.928588 GMT+0530

T24 2019/06/26 17:12:20.934703 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:12:20.650021 GMT+0530

T612019/06/26 17:12:20.669603 GMT+0530

T622019/06/26 17:12:20.696080 GMT+0530

T632019/06/26 17:12:20.696865 GMT+0530