Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:19:57.545173 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/26 11:19:57.551063 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:19:57.582593 GMT+0530

कोरफड

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे.

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीजमध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात. पाने मांसल, गुच्छासारखी एकत्र, ४५-६० सेंमी. लांब, एकाआड एक, मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी, बिनदेठाची, भाल्यांसारखी पण टोकाकडे बोथट झालेली, टोकांवर व कडांवर काटे असलेली असतात. फिकट हिरव्या पानांवर पांढरट ठिपक्यांच्या रांगा असतात. ऑगस्ट-डिसेंबरमध्ये लांब दांड्यावर अनेक लोंबत्या पिवळसर केशरी रंगाच्या लांबट फुलांचा फुलोरा येतो. बोंडे त्रिकोणी व अनेकबीजी असतात.

कोरफडीची पाने औषधी आहेत. त्यांचा आसव करण्यासाठी उपयोग करतात. ती भूक वाढविणारी ( दीपक ), रेचक, कृमिनाशक व शामक आहेत. तसेच ती कडवट, थंडावा देणारी आणि डोळे, यकृत, श्वासनलिका इत्यादींच्या विकारांवर व ज्वरामध्ये उपयुक्त आहे. पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, असे दिसून आले आहे. चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.

 

लेखक: वि. ज्ञा. लाळे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

3.18518518519
भीमराव गाडेकर औरंगाबाद Jul 07, 2018 06:29 PM

कोरफड बाजारपेठ ,खरेदी करणाऱ्या कंपन्या यांची माहिती, वेबसाईट पत्ता पाठवावे

Hakke Krishna Sep 23, 2017 10:30 AM

कृपया मला कोरफड या औषधी पिकाविषयी सर्व माहिती
देण्यात यावी. माझा ई-मेल *****@gmail.com
उदा.
१) पिकासाठि योग्य जमिनची निवड,
२) पिक लागवडयोग्य काल
३) कोणत्या प्रकारच्या जातीची निवड करावी,
४ पाण्याचे नियोजन
५) रासायनिक खतांचा वापर
६) पिक कापणी नियोजन
७) पिक खरेदि करणार्या कंपन्या/ मार्केटिंग/
पिकाची विक्री

उमेश बळवंत पाटील Aug 18, 2017 06:09 PM

कृपया मला कोरफड या औषधी पिकाविषयी सर्व माहिती
देण्यात यावी. माझा ई-मेल आय डी आहे *****@gmail.com
उदा.
१) पिकासाठि योग्य जमिनची निवड,
२) पिक लागवडयोग्य काल
३) कोणत्या प्रकारच्या जातीची निवड करावी,
४ पाण्याचे नियोजन
५) रासायनिक खतांचा वापर
६) पिक कापणी नियोजन
७) पिक खरेदि करणार्या कंपन्या/ मार्केटिंग/
पिकाची विक्री

राजेश सुरजुसे Apr 26, 2017 09:01 PM

मला कोरफड शेती विषयी माहिती हावी आहे

ravindra banarase Apr 06, 2017 01:36 PM

मला कोरफड व तुलसी
लागवड विषयी व मार्केटिंग (विक्री ) विषयी माहिती लवकरात लवकर देण्यात यावी हि नम्र विनंती . तसेच सरकारी वनॊऔषधी लागवडीबद्दल योजना माहिती द्यावी .माझा इ मेल banaraser1962 @rediffmail .कॉम व मोबाइलला नो. ८३०८४२९८२६./९४२२९४९५६६ हा आहे .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:19:57.842263 GMT+0530

T24 2019/06/26 11:19:57.849224 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:19:57.490104 GMT+0530

T612019/06/26 11:19:57.507081 GMT+0530

T622019/06/26 11:19:57.534322 GMT+0530

T632019/06/26 11:19:57.535185 GMT+0530