Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:42:47.807731 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 16:42:47.813566 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:42:47.851843 GMT+0530

जायफळ लागवड

किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या, तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन चांगली मानवते.

  1. किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या, तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन चांगली मानवते.
  2. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने जायफळाची "कोकण सुगंधा' ही पहिली जात प्रसारित केली. या जातीच्या पूर्ण वाढीच्या झाडापासून सरासरी 500 फळे वर्षाला मिळतात. या जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. नुकतीच विद्यापीठाने "कोकण स्वाद' ही दुसरी जायफळाची जात प्रसारित केली. या जातीपासून वर्षाला सरासरी 750 फळे मिळतात.
  3. या झाडाची लागवड नारळाच्या किंवा सुपारीच्या बागांमध्ये करतात (सहा ते आठ मीटर अंतरावर). नारळाच्या बागेमध्ये नारळाच्या चार झाडांना चौफुलीवर 90 सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. हे खड्डे चांगली माती व प्रत्येक खड्ड्यात 50 किलो शेणखत / कंपोस्ट खत मिसळून भरून घ्यावेत.
  4. भेट कलम, मृद्‌काष्ठ कलम, बगल कलम आणि अंकुर कलम या पद्धतींचा वापर करून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरता येतात. कलमे लावून लागवड केल्यामुळे आपल्याला मादी व नर झाडांचे आवश्‍यक प्रमाण (10ः1) राखता येते. तिसऱ्या व चौथ्या वर्षापासून उत्पादन मिळते.
  5. तयार केलेल्या खड्ड्यामध्ये जून महिन्यात कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने घट्ट दाबावी. रोपाची लागवड करावयाची झाल्यास एक ते दोन वर्षे वयाचे निरोगी रोप निवडावे; तसेच कलमाद्वारे लागवड करावयाची झाल्यास कलमांचा जोड व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि लागवड करताना जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी.

 

संपर्क - 02352 - 235077 
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी.

स्त्रोत: अग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:42:48.047900 GMT+0530

T24 2019/10/17 16:42:48.054819 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:42:47.713649 GMT+0530

T612019/10/17 16:42:47.743959 GMT+0530

T622019/10/17 16:42:47.795783 GMT+0530

T632019/10/17 16:42:47.796727 GMT+0530