Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/18 22:33:43.357650 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/18 22:33:43.363006 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/18 22:33:43.392300 GMT+0530

जायफळ लागवड

नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.

योग्य अंतर ठेवलेल्या नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. लागवडीसाठी कोकण सुगंधा, कोकण स्वाद आणि कोकण श्रीमंती या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत.

7.5 x 7.5 मी. अंतर ठेवलेल्या नारळाच्या बागेत चार झाडांच्या मध्यभागी अथवा दोन नारळांच्या बरोबर मध्यभागी जायफळांची लागवड करण्यासाठी 90 x 90 x 90 सें. मी. आकाराचा खड्डा करावा. या खड्ड्यामध्ये एक घमेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, एक किलो निंबोळी पेंड आणि वरच्या थरातली चांगली माती मिसळून खड्डा पूर्ण भरून घ्यावा.

पावसाळ्याच्या सुरवातीला अथवा पावसाळ्यांच्या शेवटी पावसाळा संपता संपता जायफळाची लागवड करावी. लागवड करताना या भरलेल्या खड्ड्याच्या मधोमध जायफळाच्या हंडीइतकी माती काढावी. जायफळ कलमाची पिशवी धारदार चाकूने अगर ब्लेडच्या साह्याने कापून पिशवीमधून मुळांची हंडी अलगद बाहेर काढावी. खड्ड्यामध्ये ही हंडी लावून चारी बाजूंनी माती घट्टपणे सभोवार दाबावी.

माती दाबताना कोणत्याही परिस्थितीत मुळे दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर जायफळाला आधार द्यावा. त्यासाठी जायफळाच्या बाजूस सुमारे 30 सें. मी. अंतर सोडून रोपाच्या अथवा कलमाच्या उंचीइतक्‍या दोन काठ्या जमिनीत पुराव्यात. या दोन काठ्यांना एक काठी आडवी बांधून रोपे अथवा कलमे या काठीवर सैलसर बांधून ठेवावीत. नियमित पाणीपुरवठा करावा, आच्छादनाचा वापर करावा. जायफळाचे कलम लावले असल्यास सुरवातीच्या काळात कलमांना आकार देणे आवश्‍यक आहे.

संपर्क - 02358- 280238, 280233
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

स्त्रोत : अग्रोवन

3.0
रणजित May 25, 2017 01:40 PM

कृपया कोकणातील मसाला शेती आणि त्याची लागवड, फायदे यांची माहिती द्यावी. मला कोकणातील आमच्या जमिनीत मसाला पिके गायीची आहेत.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/18 22:33:43.580255 GMT+0530

T24 2019/06/18 22:33:43.586144 GMT+0530
Back to top

T12019/06/18 22:33:43.302213 GMT+0530

T612019/06/18 22:33:43.320584 GMT+0530

T622019/06/18 22:33:43.347282 GMT+0530

T632019/06/18 22:33:43.348090 GMT+0530