Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:46:16.415701 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/26 11:46:16.422469 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:46:16.465710 GMT+0530

पानवेल लागवड आणि जाती

पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.

पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून, जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी.

राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने "कृष्णा पान' ही जात विकसित केली आहे. या जातीची पाने आकाराने जाड व मोठी, पानांचा टिकाऊपणा चांगला, पानांचा आकार लंबगोलाकार असतो. याशिवाय कालीपत्ती, मीठा पान, मघई, बनारसी, देशावरी आणि बांगलावर्गीय जातींची लागवड काही भागांत केली जाते.

पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. साधारणपणे चार वर्षे वयाच्या वेलीच्या शेंड्याकडील 45 सें. मी. लांबीचे चार पेरांचे व पाच पाने असलेले रसरशीत फाटेदार जोमदार बेणे निवडावे. आधारासाठी लावलेल्या शेवगा, हादगा या झाडांची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी. शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस 25 ते 30 सें. मी. लांब आठ ते 10 सें. मी. रुंद आणि दहा सें. मी. खोल चर तयार करावा. यात शेणखत टाकावे. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात ठेवून व माती घालून पायाने दाबावे. दोन वेलींतील अंतर 60 सें. मी. ठेवावे. कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील, याची काळजी घ्यावी. पानमळ्याच्या चारही बाजूंस ताट्या बांधून निवारा करावा. पानवेलींना बांधणी, आंतरमशागत, मातीची भर देणे आवश्‍यक आहे. 

संपर्क - 02426- 243861 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

2.96825396825
शिवाजी पाटील Oct 14, 2017 09:11 PM

मला पानवेल शेती करायची आहे.पानवेल लागवडीसाठी मला कृषीविभाग कडुन अनुदान मिळु शकतो का.आणि लागवडीसाठी बेणे पाहिजे

श्री राकेश सारपा वळवी मु.पो सिसा ता.अक्राणी जि.नंदुरबार Mar 29, 2016 05:43 PM

मला पानवेल शेती करायची आहे.पानवेल लागवडीसाठी मला कृषीविभाग कडुन अनुदान मिळु शकतो का.

वनस्पतीची माहिती Dec 03, 2015 08:29 PM

माहिती

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:46:17.128049 GMT+0530

T24 2019/06/26 11:46:17.134306 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:46:16.325313 GMT+0530

T612019/06/26 11:46:16.348729 GMT+0530

T622019/06/26 11:46:16.403225 GMT+0530

T632019/06/26 11:46:16.404278 GMT+0530