Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:02:43.974187 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 16:02:43.979849 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:02:44.009955 GMT+0530

बिब्बा

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो.

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. पाने काहीशी हृदयाकृती, पानांच्या कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. फळे एक इंच आकाराची असतात. बी काळ्या रंगाची असते. काजूप्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळतात. 

रंगाने गर्द - काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर पिशवीत पेरावे. 5 x 8 आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये रोपे तयार करता येतात. रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लावावीत. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत मिसळावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होते. 

सद्यःस्थितीत "वॉर्निश', "पेन्ट' बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जातो. बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते. गाड्यांच्या ऍक्‍सलला वंगणासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला
संपर्क -02358-282717 
औषधी वनस्पती माहिती केंद्र, 
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

 

2.85
Pandhari dokade Mar 09, 2017 04:07 PM

उत्पादन व kimat

Pandhari dokade Mar 09, 2017 04:07 PM

उत्पादन व kimat

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:02:44.205655 GMT+0530

T24 2019/10/17 16:02:44.211696 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:02:43.915700 GMT+0530

T612019/10/17 16:02:43.935019 GMT+0530

T622019/10/17 16:02:43.962332 GMT+0530

T632019/10/17 16:02:43.963246 GMT+0530