Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 18:07:28.397596 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/26 18:07:28.403493 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 18:07:28.434931 GMT+0530

वाळा : बहुपयोगी वनस्पती

वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे.

वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे. या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलाबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याच्या मुळांचा वापर चटया, पंखे, टोप्या बनविण्यासाठी करतात. जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताच्या बांधावर, उताराला वाळा (खस) गवताची लागवड केली जाते. त्यामुळे वाळा या बहुउपयोगी वनस्पतीची लागवड शेतक-यांसाठी फायदेशीर आहे.

वाळा गवताची मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी ३० ते ९० सेंमी. लांब असून रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. फुले बिनदेठाची व पिवळसर काळ्या रंगाची असतात. फुलाचा दांडा लांब व पिरॅमिडच्या आकाराचा असतो.

हवामान

उबदार व दमट हवामानाच्या प्रदेशात या गवताची चांगली वाढ होते.

हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. विशेषत: तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळाची चांगली वाढ होत असून, मुळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. हे पीक उद्य सामू असणा-या जमिनीतही घेता येते. मशागत व लागवड : जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. हेक्टरी १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ६o-७५ सेंमी. अंतरावर सरी-वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ x ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी के.एस.-१, के.एस.-२ व सुगंधा या सुधारित जातींची निवड करावी. पावसाळ्याच्या सुरवातीला जून-जुलै महिन्यात (७५ x ३o) सेंमी. अंतरावर लागवड करावी. एक हेक्टर क्षेत्रावर ६0 हजार रोपे लागवडीसाठी लागतात. एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत.

आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

पिकांची काढणी १५-१८ महिन्यांनी केली जाते. सुरवातीला या पिकाची वाढ संथ असल्यामुळे तष्ण वाढते. तण नियंत्रणासाठी अट्रॅझीन ०.५ किलो प्रति लिटर हेक्टरी याप्रमाणे फवारणी केल्यास परिणामकारक तण नियंत्रण होऊन उत्पादनात वाढ होते. मुळांच्या उत्तम वाढीसाठी ६० दिवसांनी २० सेंमी. उंच मातीची भर लावावी. मुळांच्या योग्य व उत्पादनक्षम वाढीसाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. चांगले पाऊसमान असणा-या प्रदेशात सिंचनाची आवश्यकता नाही; परंतु कोरडवाहू प्रदेशात ७ ते ८ पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता असते. शेवटची पाण्याची पाळी काढणी सुरक्षित व्हावी म्हणून ऑक्टोबर महिन्यात काढणीपूर्वी द्यावी.

काढणी व उत्पादन

वाळपिकापासून तेलाच्या उत्पादनवाढीसाठी पीक १८ महिन्यांचे झाल्यानंतर डिसेंबर ते फेबुवारी महिन्यात खडे खणून मुळांची काढणी करावी. मुळापासून पाने वेगळी करून ती स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावीत. हेक्टरी ३ ते ४ टन मुळ्यांचे उत्पादन मिळते. मुळ्यांपासून बाष्प ऊध्र्वपतन प्रक्रियेने ४-५ अॅटमॉसस्फिअर दाबाखाली (२४ ते ३६ तास) सुगंधी तेल मिळविले जाते. तेल काढण्याचा वेळ हा बाष्प टाकीत सोडण्यात येणारी वाफ व दाब यांवर अवलंबून असतो. साधारणपणे तेलाचा उतारा १ टक्क्यापर्यंत असतो. हेक्टरी ३० ते ४० किलो सुगंधी तेलाचे उत्पादन मिळते.

औषधी उपयोग

वाळ्यामध्ये शीत, मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड उत्तेजक व मूत्रल आहे. वाळा पित व कफनाशक तसेच दुग्धीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. तसेच वाळ्याचे तेल अत्तरे, सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. बाजारात वाळ्याचे उशीरासव, पंडगोदक, उशीरादि चूर्ण मिळतात. वाळ्यात राळ, रंगद्रव्ये, आर्यन ऑक्साईड , आम्ल चुन्याचे प्रमाण असते.


स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

 

3.05714285714
कातोरे बाळासाहेब रामचंद्र Oct 31, 2017 06:50 AM

आपण वाळा किती ऊत्पन देतो. व काय भाव बाजार मिळतात या सबंधी माहिती नाही दिली

कातोरे बाळासाहेब रामचंद्र Oct 31, 2017 06:50 AM

आपण वाळा किती ऊत्पन देतो. व काय भाव बाजार मिळतात या सबंधी माहिती नाही दिली

कातोरे बाळासाहेब रामचंद्र Oct 31, 2017 06:50 AM

आपण वाळा किती ऊत्पन देतो. व काय भाव बाजार मिळतात या सबंधी माहिती नाही दिली

राजेंद्र काशिनाथ वैराळकर Mar 31, 2017 09:02 PM

नमस्कार आपण वाळा पाण्यात टाकुन रोज पाणी पिण्यास वापरु शकतो का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 18:07:28.669765 GMT+0530

T24 2019/06/26 18:07:28.676387 GMT+0530
Back to top

T12019/06/26 18:07:28.307395 GMT+0530

T612019/06/26 18:07:28.327253 GMT+0530

T622019/06/26 18:07:28.384498 GMT+0530

T632019/06/26 18:07:28.385495 GMT+0530