অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैसे वाया न घालवता घरीच बनवा कीटकनाशके !

पैसे वाया न घालवता घरीच बनवा कीटकनाशके !

नैसर्गिक किटक नाशके

निमास्त्र

1 एकरसाठी
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर

नोट:लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.

नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.

हे मिश्रन एकत्र करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.

निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.

ब्रम्हास्त्र

मोठया आळीसाठी: 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
+ 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.

48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र

 

स्त्रोत: कृषी रहस्य

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate