অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फलोत्पादन पिकांवरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता लेबल क्लेमचे महत्व

फलोत्पादन पिकांवरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता लेबल क्लेमचे महत्व

महाराष्ट्र्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची व्यवसायिक दृष्टीकोनातून लागवड करून निर्यातक्षम दर्जाच्या मालाचे उत्पादन करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. खुल्या जागतीक व्यापारामध्ये कृषिमाल निर्यातीसाठी जागतीक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातून युरोपियन युनियन व इतर देशांना फळे व भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात कोडनाशके उर्वरित अंशाची हमी देण्याकरीता द्राक्षासाठी ग्रेपनेट, डाळिंबासाठी अनारनेट, आंब्यासाठी मॅगोनेट व भाजीपाला पिकांसाठी व्हेजनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जागरूकता निर्माण झालेली आहे.

तसेच कीटकनाशकांच्या उर्वरित अंशामुळे मानवावर होणा-या दुष्परीणामाचा विचार करता सेंद्रिय प्रमाणित शेतीमाल व कोडनाशके उर्वरित अंशमुक्त शेतीमालाच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. सदरची वास्तवता लक्षात घेऊन केंद्र शासनाने फुड सेफ्टी स्टॅडर्ड अॅक्ट २0११ (Food Safety Standard ACT-2011) अन्वेय कृशिमालातील कीडनाशके  उर्वरित व हेवी मेटलच्या अंशाच्या अधिकतम मर्यादा निर्धारीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच कीटकनाशकांचे मानवावर व प्राण्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीकोनातून औषधांचा सुरक्षित व सामंजसपणे वापर करून सुरक्षित अन्न उत्पादन करण्याकरीता ग्रो शेफ फुड (Grow Safe Food) या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंदशासनाने प्रमुख फळे व भाजीपाला

पिकांवरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता केंद्रिय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी कायदेशीर प्रमाणित केलेल्या (Label Claim) औषधांचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणून येथून पुढे फळे व भाजीपाल्यातील कोडनाशके उर्वरित अंशमुक्तची हमी देण्याकरीता लेबल क्लेम (Label Claim) औषधांचाच वापर करणे अपरिहार्य झालेले आहे.

कोटकनाशक अधिनियम-१९६८ व कोटकनाशक नियम-१९७१ अन्वये कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री करीता केंद्रिय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरीदाबाद यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. कीटकनाशकांची नोंदणी करताना त्यामधील विषाच्या तीव्रतेचे प्रमाण विचारात घेऊन त्याची नोंदणी केली जाते. नोंदणी प्रमाणपत्रासोबत लेबल व लिफलेट मंजूर करून दिली जाते. त्यामध्ये सदरचे औषध कोणत्या पिकाकरीता, कोणत्या किडी व रोगाकरीता व किती प्रमाणात वापरावयाचे तसेच औषधांचा वापर केल्यानंतर त्यामधील उर्वरित अंशाचे प्रमाण किती दिवसापर्यंत मालात राहू शकते (पीएचआय), याचा सविस्तर तपशील दिलेला असतो. तो प्रत्येक औषधाच्या बाटलीसोबत घडीपत्रिकेच्या स्वरुपात स्थानिक भाषेबरोबरच आंग्ल व हिंदी भाषेत तपशील देणे बंधनकारक आहे. म्हणून शेतक-यांनी फळे व भाजीपाला पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरीता औषधांची खरेदी करताना मंजूर लेबल क्लेम  (Label Claim) असलेल्या औषधांचीच अधिकृत परवानाधारक कीटकनाशक विक्रेत्याकडून रितसर पावती घेऊनच खरेदी करावी तसेच औषधासोबत घडीपत्रिकाही त्यांच्याकडून लगेच मागून घ्यावी.

शेतकऱ्यांनी औषधाचा वापर, करताना औषधाच्या प्रकारानुसार त्याचा वापर , साठवणूक व रिकाम्या डब्याची/बाटलीची विल्हेवाट योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. तसेच आपण उत्पादित करीत असलेल्या कृषिमालावरील किडी व रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरीता एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. तसेच औषधांच्या लेबल क्लेम प्रमाणेच प्राथमिक अवस्थेमध्येच याचा कोड व रोग नियंत्रणासाठी वापर करण्यात यावा. ज्या औषधांचा पुर्वहंगाम कालखंड (पीएचआय) जास्त आहे, अशी औषधे फळे व भाजीपाल्यांच्या काढणीपुर्व वापरू नयेत. कारण पीएचआयचा कालावधी लक्षात न घेता औषधांचा वापर न केल्यास आपण उत्पादित केलेल्या मालात कोडनाशके उर्वरित अंशाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. मर्यादेपेक्षा जास्त किडनाशके उर्वरित

अंशाचे प्रमाण आढळून आल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे असा माल निर्यातीसाठी देखील पाठविता येत नाही.

फळे व भाजीपाला पिकातील किडनाशके उर्वरित अंश तपासणी करण्याकरीता शासनाच्या पुणे व नागपूर येथे किडनाशके उर्वरित अंश प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सदर प्रयोगशाळेमार्फत स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यातीकरीता फळे व भाजीपाला तपासणीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे अपेडाव्दारे खाजगी एनएबील प्रमाणित कोडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळांनाही प्राधिकृत केलेले आहेत. कृषिमालावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरीता लेबल क्लेम प्रमाणे अधिसुचित केलेल्या कीटकनाशकांची पिकनिहाय व औषधनिहाय अद्यावत यादी  (www.cib&rc.com )या वेबसाईटवर दिलेली आहे.

प्रमुख फळे व भाजीपाला पिकावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ ब नोदणी समिती ,फरीदाबाद यांनी कायदेशीर प्रमाणित केलेल्या (Lable Claim) रसायनांची यादी .

उपरोक्तप्रमाणे प्रमुख फळे व भाजीपाला पिकांवरील विविध किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोदणी समिती, फरीदाबाद यांनी कायदेशीर प्रमाणित (लाभले Claim) केलेल्या रसायनांचा वपर करावा .

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate