Accessibility options
Accessibility options
Government of India
Loading content...
Contributor : Chhaya Nikrad16/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
आंब्याला मोहोर येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्यांचे व्यवस्थापन
नुकत्याच फुटू लागलेल्या मोहोराच्या बोंग्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा ज्या बागा नुकत्याच मोहोर फुटण्याच्या अवस्थेत आहेत, अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस(25 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच ज्या बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे; परंतु मोहोर अद्याप फुललेला नाही, अशा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमिडाक्लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) तीन मि.लि. किंवा अथवा क्लोथियानिडीन (50 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार कीटकनाशक) 1.2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मोहोर फुलण्याच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शक्यतो कीटकनाशकाची फवारणी टाळण्याचा प्रयत्न करावा अथवा फवारणी करावयाची झाल्यास कडुनिंबयुक्त कीटकनाशकाची फवारणी करावी.
ज्या बागांमध्ये मोहोर मावळलेला आहे आणि बाग फळधारणेच्या अवस्थेत आहे, अशा बागेत पाण्यात मिसळणारे थायामेथोक्झाम (25 टक्के दाणेदार कीटकनाशक) एक ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी या फवारणीमध्ये गंधक (80 टक्के पाण्यात मिसळणारे) 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 10 ग्रॅम ही बुरशीनाशके मिसळावीत.
सद्यःस्थितीचा विचार करता, पाऊस पडल्यास मोहोरावर करपा रोग येण्याची शक्यता आहे. तरी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 10 ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल 70 टक्के) 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संपर्क -
डॉ. एस.के.गोडसे - 9423804578
कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली
स्त्रोत : अग्रोवन
सुधारित तंत्रज्ञानामुळे बागायतदारांकडील आंबा पिकाच्या हेक्टरी उत्पादकतेत व फळाच्या गुणवत्तेत दीड ते दुपटीने वाढ झाली.
हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यातील चिंचणी (ता. डहाणू) येथील काशिनाथ पाटील हे चौदा एकरावरील क्षेत्रावर केशर आंबा फळबाग 25 वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने जोपासत आहेत.
आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते.
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होताना दिसून येते. हे नुकसान टाळल्यास आंबा देखील पडत राहिला आणि थंडीला उशीर झाला तर उशिरा मोहोर येतो.
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे यांनी आंबा पल्पनिर्मितीत खात्रीशीर ब्रॅंड व त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे.
अक्षय देशमुख
3/29/2019, 10:12:46 PM
आंबा नवीन लागवड केली आहे. तरी त्या झाडांची पाने शेंड्याकडून वाळूत आहेत.आणि शेंडा फुटत नाही.
शुभम शिंदे
5/8/2017, 1:25:05 AM
आंबा वांजपना नियंत्रण माहिती
milind katle
1/8/2016, 10:48:58 AM
mango फवारणिचि औषध सांगा
जय तरे , ठाणे -421302
12/26/2015, 12:20:55 PM
मी हापूस aambyaache कलम लावुन 10--12 वर्षे झालीत . सुरुवातीला थोडीफार फळे यायची पण आता अजिबात येत नाहीत .
बालाजी बुटनवाड नांदेड
10/13/2015, 8:29:00 AM
आंबा नविन लागवड केली आहे.तरी त्या झाडांची पाने शेड्या कडून वाळत आहेत.आनी झाडाचा शेंडा निघत नाहि..
Contributor : Chhaya Nikrad16/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
104