चिंचेची लागवड मुरमाड, हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीवर, तसेच मध्यम - खोल जमिनीत करावी. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये तळाला पालापाचोळा, एक पाटी चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.
लागवडीसाठी प्रतिष्ठान, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या जाती निवडाव्यात.लागवडीनंतर कलमांची योग्य काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (02426 - 243861) किंवा फळ संशोधन केंद्र,
हिमायत बाग, औरंगाबाद (0240 - 2392077) यांच्याकडे संपर्क साधावा.
माहिती संदर्भ :अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 7/29/2020
आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छाम...
या विभागात कलिंगड व खरबूज या पिकांविषयी माहिती दिल...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-...