অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्ष : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

द्राक्ष : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

राज्यातील विविध फळपिंकांमधील द्राक्ष या फळपिंकाने मागील ५g वर्षांत जी काही प्रगती केली ती खरोखरच पथदर्शी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टकल्चरल रिसर्च, बेंगलुरु व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञांनी व महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने यासाठी वेळोवेळी मोलाची मदत केली. परंतु द्राक्षामध्ये ख-या अर्थाने प्रगती झाली ती द्राक्ष बागायतदारांच्या स्वतःच्या कष्टाने. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीशांच्या काळात द्राक्षबागा प्रथम नाशिकमध्ये आल्या.

हैद्राबादच्या निजामाने अनाब-ए-शाही जातींच्या बागा वाढविल्या, तेथून अनाब-ए-शाही नाशिकमध्ये आली. पुढे भोकरी, फकरी, सिलेक्शन-७ या बी असलेल्या जातींची द्राक्षे प्रामुख्याने नाशिक विभागात वाढली. त्यानंतर वेंगाने प्रगती झाली ती ब्रेिनबेियांच्या श्रॉम्पसन सीडलेस व त्यानंतर किंशमेिश चर्नी ही काळी बॅिनर्बियाची द्राक्षे आली तेंव्हा.

थॉम्पसन सीडलेस अमेरिकेतून भारतात हिमाचल प्रदेशाच्या कृषी विंद्यापीठात आणि तमिळनाडूच्या मदुराई येथील कृषी महाविद्यालयात आली. तेथून सर्वप्रथम ही द्राक्षे बारामतीतील शेतक-यांनी आणून बारामतीमध्ये या वाणांची बाग उभी केली. पुढे याच शेतक-यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ उभा केला व त्यानंतर आजतागायत महाराष्ट्रात द्राक्षशेती वाढतच आहे. द्राक्षामध्ये झालेल्या काही महत्वाच्या प्रगतीमुळे द्राक्ष हे पथदर्शीं फळपिंक मानले जाते.

द्राक्षाच्या चांगल्या उत्पादनासाठी संजीवकांची आयात

थॉम्पसन सीडलेंस व किंशमिश चर्नी या जातींची द्राक्षे बिनर्बियाची असल्यामुळे त्यांच्या चांगल्या वाढीसाठी GA७,5BA यासारख्या संजीवकांची आवश्यकता असते. ही संजीवके पूर्वी भारतात उपलब्ध नव्हती. बाहेरच्या देशांतून त्यांची आयात करून चांगल्या दर्जाची संजीवके बागायतदारांना उपलब्ध करून देण्याचे काम पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केले व त्यामुळे दर्जेदार द्राक्षे राज्यात बनू शकली.

देशांतर्गत दूरबाजारात मार्केटिंग

तसे पाहता द्राक्ष हे नाशवंत फळ. काढणींनंतर पाच ते सह्या दिवस ती चांगली राहतात. हैद्राबादमध्ये तयार होणारी द्राक्षे फक्त हैद्राबादमध्येच विकली जायची. परंतु महाराष्ट्रातल्या शेतक-यांनी पंचवीस वर्षांपूर्वी कोरॉगेटेड बोर्डच्या बॉक्समध्ये द्राक्षे पॅक करण्याची पद्धतीं तयार केली व काढणींनंतर फक्त दोन ते तीन दिवसांत द्राक्षे मुंबई, दिली, कलकता, चेन्नई सारख्या दूरवरच्या बाजारांत पोहोचविण्याची यंत्रणा उभी केली. तासगाव, नाशिकची द्राक्षे भारतभर प्रसिद्ध झाली व त्यांना चांगला भाव मिळू लागला हे याचमुळे.

द्राक्षांची युरोपमध्ये निर्यात

सन १९५0 मध्ये काही द्राक्ष बागायतदारांच्या लक्षात आले की, युरोपमध्ये वेगवेगळ्या देशांतून संपूर्ण वर्षभर द्राक्षे येतात व त्यांना चांगली किंमत मिळते. परंतु एप्रिल व मे महिन्यामध्ये जगामध्ये कुठेही द्राक्षे मिळत नसल्यामुळे या महिन्यामध्ये युरोपमध्ये द्राक्षांना विशेष मागणी असते. भारतामध्ये या वेळीं द्राक्षे उपलब्ध असतात. एप्रिल-मे महिन्यात भारतीय द्राक्षे युरोपमध्ये पाठविल्यास त्यांना चांगली किंमत मिळेल. एका शेतक-याने उत्तम दर्जाचीं द्वाहों कोरोगेटेड़ बोर्डच्या बॉक्समध्यें फेंक केलों व दोन-तीन ट्न द्राक्षे विंमानातून्न स्वतः बरोबर लङनला मे महिन्यामध्ये तो घेळ्न गेला. तेथील बाजारपेठेत त्यांची भारतीय द्राक्षे म्हणून विक्री केली.

द्राक्षे विकून त्यांनी जेमतेम येण्याजाण्याचा खर्च परत मिळविला, परंतु शेतक-यानी द्राक्ष नेिर्यातींसाठी लागणाच्या तंत्रज्ञानाची मोलाची माहिती मिळविली. परत येऊन या माहितीची चर्चा तत्कालिन मुख्यमंत्र्यासोबत केली. द्राक्षे काढणींनंतर चार तासात विशिष्ट प्रकारच्या बॉक्समध्ये पॅक करून त्याचे प्री-कूलिंग' करून शुन्य अंश सें. ग्रे.तापमानात ठेवणे व या तापमानामध्ये त्यांना रेफर कंटेनरमध्ये घालून युरोपपर्यंत पोहोचविल्यास आपली द्राक्षे पज्ञास दिवसांपेक्षा जास्त दिवस ताजी राहू शकतील व युरोपमध्ये समुद्रमार्गे किफायती खर्चामध्ये पाठवून शेतकरी ब-यापैकी नफा मिळवू शकतील अशी ती संकल्पना होती. याच संकल्पनेमुळेच पुढे अमूलच्या धर्तीवर द्राक्ष निर्यातींसाठी महाग्रेपची स्थापना झाली.

राज्य शासनाने महाराष्ट्रात अद्यावत अशी सतरा इंटिग्रेटेड कोल्ड स्टोअरेंज उभी केलीं आहेत. प्रत्येक कोल्ड स्टॉरेंजबरोबर त्या विभागातील द्राक्ष उत्पादक संघटित होते व सर्व द्राक्ष उत्पादन महाग्रेप या एका डॅड नावाने देशाबाहेर नेिर्यात होऊ लागले. अशा प्रकारचे इन्फ़ास्ट्रक्चर त्या काळातच काय आजसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर भारतात कुठेही नाही. आज महाराष्ट्रात अद्ययावत अशी बरीच कोल्ड स्टोरेज खाजगी किंवा कार्पोरेट मालकीची आहेत व त्यातून द्राक्षे व इतर फळे निर्यात होतात. परंतु सुरुवातील द्राक्ष बागायतदारांच्या पुढाकारास शासनाने केलेली मदत पथदर्शींच होती.

नेिर्यातीच्या द्राक्षांसाठी उर्वरित अंशाचे संनेियंत्रण (Residue Monitoring Plan - RMP)

Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA)ने द्राक्ष निर्यातीसाठी सुरुवातीपासूनच  भरपूर मदत केली. द्राक्ष निर्यात दरवर्षी हळूह्ळू वाढत होती. त्यातच सन 2002 मध्ये भारतीय द्राक्षांमध्ये मिश्रोर्मिल या कीटकनाशकाचे उर्वरित अंश युरोपमध्ये मिळाले व त्यामुळे युरोपियन युनियनने भारतीय द्राक्षांची आयात बंद केली.

जर भारत सरकार निर्यातींच्या द्राक्षांसाठी अॅग्रोकेमिकल्सचे उर्वरित अंश मॉनिटर करणारी सिस्टीम उभी करून त्याचे कायदेशीर पालन करू लागले तरच आम्ही भारतीय द्राक्षे आयातीवरील निर्बंध कडू असे युरोपियन युनियनने भारत सरकारला सांगितले. यामुळे पुन्हा द्राक्षशेती व त्याची निर्यात धोक्यामध्ये आली होती. परंतु अपेंडा (APEDA) ने पुढाकार घेऊन रेसिड्यू मॉनिटरिंग  प्लॅन (Residue Monitoring Plan-RMP) एका वर्षात तयार  करून त्याची कायदेशीर अंमलबजावणी केली व द्राक्ष निर्यातींमध्यें एक वर्ष सुद्धा खंड पडू दिला नाही. मे महिन्यामध्ये द्राक्ष निर्यातीला निर्बंध लागला

द्राक्षाखालील क्षेत्र व उत्पादन : सध्यस्थिती

एफ.ए.ओ.च्या आकड्यांप्रमाणे सन २०१३ मध्ये संपूर्ण जगामध्ये ७१,५५, १८७ हेक्टर क्षेत्रावरती ७,७१,८१,१२२ मेट्रिक टन द्राक्षाचे उत्पादन होते. द्राक्ष उत्पादनामध्ये स्पेन, फ्रान्स, चीन, इटली, टर्की, अमेरिका हे देश अग्रेसर आहेत. जगातले ५0 टक्के क्षेत्र व उत्पादन या देशांमध्ये आहे. सन २0१२-१३ मध्ये भारतामध्ये १,१७,६00 हेक्टर क्षेत्रामध्ये २४,८३,000 मेट्रिक टन द्राक्षांचे उत्पादन झाले. ते जगातील क्षेत्राच्या व उत्पादनाच्या अनुक्रमे १.६५ टक्के व ३.२२ टक्के होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील द्राक्षाचे क्षेत्र व उत्पादन या दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

सन २oo६-०७ मध्ये भारतात ६५,000 हेक्टर क्षेत्रावर १६,८५,000 मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन होते ते सन २०१३-१४ मध्ये ११,४७,000 हेक्टर क्षेत्रामधून २,५८,५३,000 मेट्रिक टनापर्यंत वाढले. द्राक्षावरील क्षेत्र व उत्पादन हे दोनही दरवर्षी हळूहळू वाढतच आहे. एक एकर द्राक्षबाग उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे ५-६ लाख रुपये खर्च येतो. व त्यानंतर प्रतिवर्षी बागेत १.५ ते २.0 लाख रुपये उत्पादन खर्च होतो. हा खर्च पाहता दरवर्षी द्राक्षाच्या क्षेत्राखालील होणारी वाढ चांगलीच आहे.

जगामध्ये द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने वाईन बनविण्यासाठी होते. फारच थोडे देश थोड्याच क्षेत्रावरती ताजी द्राक्षे खाण्यासाठी वाढवितात. भारतामध्ये द्राक्षे प्रामुख्याने ताजी खाण्यासाठी लावली जातात. भारतातील १-२ टक्के द्राक्षे वाईनसाठी आहेत तर बाकी सर्व द्राक्षे ताजी खाण्यासाठीच लावली जातात. या द्राक्षांपैकी जवळजवळ २६ टक्के द्राक्षे वाळवून त्याचे बेदाणे बनविले जातात. द्राक्षाखाली असलेल्या भारतातील एकूण १,१८,७४0 हेक्टर क्षेत्रापैकी ९0,000 हेक्टर (७५.८० टक्के) क्षेत्र महाराष्ट्रात आहे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र २१,६०,000 मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन करतो, जे भारताच्या एकूण उत्पादनाच्या ८३.२४ टक्के आहे. म्हणजेच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रति एकरी जास्त उत्पादन काढले जाते. महाराष्ट्रातील बहुतांशी (६१.०९ टक्के) द्राक्षांचे नाशिक जिल्ह्यामध्ये उत्पादन होते. त्यापाठोपाठ २९.९८ टक्के द्राक्षे सांगली जिल्ह्यात होतात. यानंतर सोलापूर जिल्ह्यात ३.०९ टक्के व उस्मानाबाद जिल्ह्यात २.६९ टक्के द्राक्षे उत्पादन होते. उरलेली ३.१५ टक्के द्राक्षे अहमदनगर, पुणे, लातूर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा व जालना जिल्ह्यात होतात.

अलीकडे सर्वसाधारण जमिनीमध्ये मोजकेच पाणी उपलब्ध असल्यास खात्रीचे पैसे देणारे फळपिक म्हणून द्राक्षाची लागवड ब-याच ठिकाणी यशस्वीरीत्या केली जात आहे. जालना जिल्ह्यात पाऊस फारच कमी पडतो परंतु या जिल्ह्यात मागील काही वर्षात ३५oo एकर द्राक्षबागांची लागवड झाली आहे. या भागामध्ये चालू वर्षी फक्त ११० मि.मी. इतका एकाच दिवशी पाऊस पडला. या पावसाने जेवढे पाणी साठविले तेवढ्याच पाण्यावर बहुतांशी बागा या वर्षी द्राक्षाचे उत्पादन देत आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जालनाजवळील कडवंची या गावातील द्राक्षबागांची पाहणी केली.

या गावात जालनाच्या कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने व नाबार्डच्या आर्थिक मदतीने कडवंची पाणलोट क्षेत्रातील कडवंची, नंदापूर व वाघूल या तीन गावांत सन १९९६-९७ व सन २00१-0२ मध्ये जी कामे झाली होती , त्याचा हैद्राबादच्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अॅग्रीकल्चर (CRDA) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी सन २०१२ मध्ये पुन्हा अभ्यास केला. पूर्णा नदीच्या या पाणलोट क्षेत्रात सर्वसाधारणपणे ६४५ मिलीमीटर प्रतिवर्षी पाऊस होतो. या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या विविध कामामुळे १३६५.९५ हेक्टर शेतजमिनीपैकी १२२७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. या गावात सध्या ३०० हून जास्त छोटी-मोठी शेततळी आहेत. यावर्षी संपूर्ण वर्षात फक्त

एकच मोठा पाऊस मिळालेला असला तरी बहुतांशी शेततळी पाण्याने भरलेली होती. उपलब्ध पाण्याचा उपयोग फळबागा वाढविण्यासाठी केलेला होता. त्यामध्ये द्राक्ष पिकाला सर्वांकडे प्राधान्य होते. गेल्या २ ते ३ वर्षात या गावांत ११o० एकरहून जास्त क्षेत्र द्राक्ष बागेखाली आले आहे. सोनाका, माणिक चमन या द्राक्षाची लागवड या विभागात प्रामुख्याने आहे आणि २५ मेट्रिक टन प्रती हेक्टरी उत्पादन घेऊन द्राक्षे दूरवर मार्केटिंगसाठी पाठविली जातात. कमी व अनिश्चित पावसाच्या क्षेत्रामध्ये पाणलोट व्यवस्थापन चांगल्याप्रकारे झालेले असल्यास त्याभागात द्राक्ष पिकाला किती चांगले भविष्य आहे याचे हे चांगले उदाहरण आहे.

द्राक्षाच्या नवीन जाती / वाण

गेले कित्येक वर्षे महाराष्ट्रात थॉम्पसन सिडलेस व किसमिस चरनी या पांढ-या व काळ्या द्राक्षांची लागवड केली जाते. या दोनही जाती / vitis vinifera मध्ये येतात. या स्पेसीस मध्ये म्यूटेशन्स स्वाभाविकरित्या मोठया प्रमाणात होतात. प्रगतीशील द्राक्ष बागायतदार त्यांच्या बागेमध्ये दिसणा-या म्यूटेशन्सची नोंद घेतात.

विशेषतः काही काड्यांवर येणारी मोठया आकाराची द्राक्षे किंवा सुटत नाहीत. विशेष प्रकारची द्राक्षे लागलेल्या काड्यांना वाढवून त्यांची कटिंग्स तयार करून स्वतंत्र वेली तयार होतात. त्या वेलींवर एक - दोन वर्षे सातत्याने विशेष चांगल्या दज्यांची द्राक्षे लागल्यास त्या वेलीपसून मोठी बाग उभी होते व एक-दोन वर्षात या बागांतील काड्या द्राक्ष बागायतदारांना नवीन बागेत कलमे करण्यासाठी दिल्या जातात. अशा धर्तीवर थॉम्पसन सीडलेस व केिशमिश चरनी या दोन वाणाचे बरेच क्लोन लागवडीमध्ये आहेत. त्यातील काही जास्त प्रचलित क्लोन खाली नमूद केले आहेत.

अ) थॉम्पसन सिड्लेसची क्लोन (पांढरी द्राक्ष
१) तास -ए-गणेश मोठ्या आकाराचे मनी निर्यातीसाठी उपयुक्त
२) सोनाका व माणिक चमन , विजय चमन , सुपर सोनाका ,आरके सीडलेस लांब मनी . अंतरदेशीय बाजारपेठेत ताजे विकण्यासाठी अथवा बेदाणे बनविण्यासाठी
ब) किशमिश चरणीचे क्लोन (काळ्या रंगाची द्राक्षे)
१) शरद सीडलेस , नाना परपल,नाथ जंबो , ज्योती सीडलेस मोठे मणी
२) कृष्णा सीडलेस लांब मनी
भारताच्या बाहेरून पुढील काही चांगले द्राक्षाचे वन देशात आणले गेले. त्यांची लागवड सुधा छोट्या क्षेत्रावर आहे.
१) काळी सीडलेस द्राक्षे फॅनटासी सीडलेस ,ऑटम रॉयल
२) लाल सीडलेस द्राक्षे फ्लेम सीडलेस ,क्रीमसण सीडलेस
३) लाल बिया असलेली द्राक्षे रेड ग्लोब
४) पांढरी सीडलेस २ A क्लोन , किशमिश रोझावीस व्हाईट

नवीन संकरित द्राक्षे बनविण्याचे काम सन १९८० च्या आधीपासून सन १९९४ पर्यंत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च (ARI) बेंगलुरू व इंडियन अग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) नवी दिल्ली येथे केले गेले. तेथून खालील नवीन संकरित द्राक्ष जाती प्रसारित केल्या.

इंडियन इंन्स्टिटयूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च (IAR)बेंगलुरु
क्षेता सीडलेस, अकविती, अकाँ कांचन, अकां शाम, अकां हंस, अक तृष्णा, अकां सोमा, अकाँ कृष्णा, अर्का मॅजेस्टिक.
इंडियन अग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिटयूट (IARI) नवी दिल्ली पुसा सीडलेस , पुसा नवरंग , पुसा उर्वशी

वर नमूद केलेल्या संकरित द्राक्ष वाणांपैकी एकही वाण लागवडीखाली नाहीत. परंतु हे सर्व वाण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे त्यांनी संग्रहीत केलेल्या ४00 जर्मप्लाझम मध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे हे सन १९९७–९८ पासून कार्यरत आहे. या संशोधन केंद्रातून मांजरी हे नवीन वाण शेतक-यांसाठी दिले गेले.

हे वाण सेंटीनियल सिडलेस या १६ मि.मी. पेक्षा जास्त आकाराचे मणी तयार होतात. थॉम्पसन सिडलेस पेक्षा २०-२५ दिवस आधी द्राक्षे काढणीस तयार होतात. पुण्याजवळील बाफना फार्ममध्ये याची मोठ्या प्रमाणात ६ वर्षांपासून लागवड झालेली आहे व तेथून या वाणाची द्राक्षे युरोपमध्ये निर्यात होतात. या वाणाच्या द्राक्षांचे उत्पन्न वर्षातून दोन वेळा घेणे शक्य आहे.

नवीन हायब्रीड वाण तयार करण्याचे काम राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये चालू आहे. खाली नमूद केलेल्या वाणांच्या विविध ठिकाणासाठी (मल्टीलोकेशनल) चाचण्या चालू आहेत.

मेडिका लाल रंगाचे टॅम्पिरियन (मण्याचे साल व गुदा दोन्ही रंगीत असलेली) हायब्रीड. या वाणामध्ये रेसविरेंस्ट्रोल हा अँटीऑक्सीडंट पदार्थ ५ ते ८ पीपीएम पर्यंत आहे व यातून ६ ग्रॅम प्रति किलो अन्थोसायनीन वेगळे करता येतात. म्हणून हे वाण फूड अडेटिव्ह तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत.
१८/३ हे हायब्रीड काळ्या रंगाचे असून त्यात पातळ बिया आहेत. समान आकाराचे छोटे घड असून त्यात सहजतेने रंग येतो. पनेटमध्ये पॅकिंग करण्यास सोपे जाते.

पेटंटेड जाती व भविष्यात त्यांची भारतात येण्याची शक्यता

भारतात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व वाणांपासून चांगल्या दर्जाची द्राक्षे उत्पादन घेण्यासाठी भरपूर प्रमाणात संजीवके वापरणे आवश्यक असते. घड फुलोच्यामध्ये येण्याआधी GA. ची फवारणी अथवा डिपिंग केल्याने घडाच्या पाकळ्या लांबतात व घड सुट्टा होऊन त्यामध्ये जास्त मणी सहजतेने मावतात. घड फुलोन्यामध्ये असताना घडाला GA ची डिपिंग दिल्यास मण्यांचा आकार लांबतो तर सेटिंग झाल्यानंतर GA, आणि CPPU किंवा ब्रासिनो टेस्टोइड्सचे डिपिंग दिल्यास मण्याचा आकार मोठा होतो. या सर्व

संजीवकाच्या ट्रेिटमेंट फार खर्चीक तर असतातच परंतु त्या घेण्यासाठी जास्त


मजूर लागतात आणि त्यावर सुद्धा खर्च होतो तसेच मजूर वेळेवर मिळतही नाहीत. घडांमध्ये जास्त मण्यांचे सेटिंग झाले असल्यास त्याचे थिनिंग मजुराद्वारे करावे लागते. संजीवकांसाठी व त्यांच्या ट्रेिटमेंट बागेत देण्यासाठी लागणा-या मजुरांवर प्रति एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च होतो. हा खर्च करूनसुद्धा ट्रेिटमेंट योग्य वेळेवर झाली नाही तर उत्पादित द्राक्षांचा दर्जाही खालावतो. मागील काही वर्षांपर्यंत जगात जेथे जेथे ताज्या खाण्याच्या द्राक्षांचे उत्पादन होते तेथे प्रामुख्याने थॉम्पसन सीडलेस द्राक्षेच लावली जात होती व या सर्व देशांमध्ये दर्जेदार द्राक्षे तयार करण्यासाठी जास्त मजूर व इतर खर्च होत असे. या सर्वांना पर्याय म्हणून अमेरिका (यूएसए) व इतर काही प्रगत देशांमध्ये नवीन संकरित द्राक्षांचे वाण तयार केले गेले. या नवीन वाणांचे ब्रिडींग काही विशिष्ट गुणधर्मासाठी (Characters) केले गेले. ते गुणधर्म खालीलप्रमाणे.

● स्वभावतःच मणी सुटे-सुटे असणारा घड

● संजीवकांचा वापर न करता १६ मि.मी. पेक्षा जास्त मोठे होणारे मणी

● प्रतिवर्षी भरपूर घडांची निर्मिती

● काढणीनंतर शीतगृहांमध्ये बरेच दिवस चांगले राहू शकणारे घड

● मण्यांना वेगवेगळा वास व चव (Aroma & Flavour)

गेल्या काही वर्षात अमेरिका, चिली, दक्षिण आफ्रिका, स्पेन, इटली या देशात असे गुणधर्म (Characters) असलेल्या पेटंटेड वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रगत देशांमध्ये ब्रिडींगचे काम खाजगी ब्रीडर्स करतात व नवीन वाण पेटंटेड असतात. द्राक्ष बागायतदार या वाणांची लागवड केल्यानंतर आलेल्या उत्पादनावर जो फायदा मिळतो त्यातील काही टक्के भाग त्या वाष्णाच्या पेटंटचे मालकीहक असलेल्या ब्रीडरला रॉयल्टीच्या स्वरुपात २o ते २५ वर्ष दिला जातो. वर नमूद केलेले गुणधर्म (Characters) असलेली द्राक्षाच्या नवीन पेटंट जाती भारतात आल्यास द्राक्षाचे उत्पादन करताना मजूरांचा व संजीवकांचा प्रति एकरी येणारा ४० ते ५० हजार रु. खर्च कमी होऊ शकतो. परंतु या खर्चातील बचतीपैकी काही पैसे द्राक्ष बागायतदारांना रॉयल्टीच्या स्वरुपात त्या वाणाच्या ब्रीडरला द्यावे लागतील. प्रगत देशामध्ये

द्राक्षाचे मार्केटिंग संपूर्णपणे संगणकाद्वारे नियंत्रित असते. द्राक्ष वाणाच्या रजिस्टर्ड नावाने विकली जातात व पेटंट वाणाच्या द्राक्षाची विक्री झाल्यानंतर रॉयल्टीचे पैसे कापून बाकी पैसे बागायतदाराला दिले जातात. अशाप्रकारची प्रणाली ज्या ठिकाणी आहे त्या देशात पेटंट वाणांची द्राक्षशेती सहज शक्य आहे.

ज्या पिकांमध्ये F1 Hybrid बिया विकल्या जातात, त्या पिकांत लागवड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन (Vegetative Propogation) ने केली जाते. प्रगत वाणाची एक काडी मिळाल्यास दोन वर्षांत त्याची हजारो रोपे तयार हक सुरक्षित ठेवणे सोपे नाही. भारतामध्ये पेटंटेड वाणाचे हक सुरक्षित ठेवण्यासाठी Protection of Plant varieties and Farmer's Right Authority (PPVFRA) Clivci आहे. प्रत्येक वाणाची डी.यू.एस. (DUS) चाचणी करून त्या वाणाची नोंदणी होते. वेगवेगळ्या पिकासाठी विशिष्ट डी.यू.एस. चाचणीची पद्धती विकसित करावी लागते.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या पुढाकाराने द्राक्षामधील RMP चाचणीच्या पद्धती विकसित केल्या. PPVFRA ने त्याचे नुकतेच कायद्यात रुपांतर केले. देशाबाहेरून द्राक्षाचे पेटंटेड वाण भारतात आणल्यास त्या वाणाच्या ब्रीडरचे मालकीहक सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या डी.यू.एस.चाचण्या PPVFRA मार्फत भारतात होणे आवश्यक आहे. PPVFRA ने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (NRCG) पुणे; इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च, बेंगलुरु; व पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना ही तीन ठिकाणे द्राक्षाच्या डी.यू.एस. चाचणीसाठी अधिकृत केली आहेत.

देशामध्ये द्राक्षाचे नवीन पेटंटेड वाण आणण्याचे प्रयत्न द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यात करणा-या कंपन्या करीत आहेत. त्यांना यश आल्यास भारतात पुढे नमूद केलेल्या वाणांपैकी काही वाणांचे उत्पादन होऊ शकेल.

पांढरी : क्रिमसन सीडलेस, आयवरी साडलेस, मेलँनी, आरा-१६,

सुग्रा-३५.

लाल : मजेन्टा, टिमको, मेलोडी, आरा-१३, स्वीट सेलिब्रेशन, सूग्रा-१९

काळी : सूग्ना-३४

स्वभावत: लांब मणी असलेले वाण

पांढरी :आरा-१५

काळी : स्वीट सफायर, विच फिंगर

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate