অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नारळप्रक्रियेबाबत माहिती

 

डेसिकेटेड खोबरे

यामध्ये खोबऱ्यावरील काळा भाग काढला जातो. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे छोटे तुकडे केले जातात. यामध्ये दोन ते तीन टक्के पाणी असते, तर तेलाचे प्रमाण 68 ते 70 टक्के असते. मिठाई, इतर खाद्य कारखाने विशेषतः चॉकलेट आणि कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो. डेसिकेटेड कोकोनट बनविण्यासाठी पूर्ण परिपक्व नारळाची निवड केली जाते. नारळ प्रथम सोलून, त्याचे दोन तुकडे करून, खोबरे करवंटीपासून वेगळे करून, खोबऱ्यावर असलेली तपकिरी रंगाची साल वेगळी केली जाते. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने ते धुतले जातात. यामुळे खोबऱ्याला चिकटलेला नको असलेला भाग काढला जातो. हे तुकडे ठराविक तापमानाला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात. नंतर या तुकड्यांचा कीस करून वाळवणी यंत्रामध्ये वाळविले जातात. वाळविलेला कीस जसाच्या तसा प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवाबंद केला जातो किंवा त्याची भुकटी करून हवाबंद केली जाते. 

शहाळ्याचे पाणी

शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. "चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ' ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. 

स्नोबॉल टेंडर नट

यामध्ये शहाळे नारळाचे सोडण, करवंटी आणि खोबऱ्यावरील लाल साल काढून टाकली जाते. आठ महिने वयाच्या नारळापासून स्नोबॉल टेंडर नट तयार केले जातात. यामध्ये पूर्ण पाणी असते. तसेच खोबरे मऊ असते. 

संपर्क -02352-235077. 
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate