অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फायदेशीर कोकम लागवड

कोकणामध्ये  विविध प्रकारची फळझाडे आढळतात. त्यांमध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे.

गोवा, सह्याद्रीचा डोंगरउतार आणि पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये नारळ, सुपारीच्या कोकमाचे फळ कचे असताना तसेच पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्याचे विविध पदार्थ करून साठवून वर्षभर विविध अन्नपदार्थात वापरतात.

कोकमास उष्ण आणि दमट हवामान मानवते. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते; मात्र त्यामध्ये ५0 टक्के नर आणि ५0 टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर ५० टक्के झाडांपासूनच किफायतशीर उत्पादन मिळते.

आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या कोकणात मोठ्याप्रमाणात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनीवर या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास खालीलप्रमाणे फायदे होतील.

  1. लागवडयोग्य पडीक जमीन लागवडीखाली येईल.
  2. फळप्रक्रिया उद्योगाला चालना मिळून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  3. कृषि उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने मृदुकाष्ठ कलम पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे खात्रीशीर अधिक उत्पादन देणा-या कोकम जातींची लागवड करणे शक्य आहे. लागवड करताना ९o टक्के मादी झाडे आणि १o टक्के नर झाडांची कलमे घेऊन लागवड करावी.

सुधारित जाती

  1. कोकण अमृता : डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून १४0 किलो फळे प्रतिवर्ष मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळ्यापूर्वी पिकतात; त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
  2. कोकण हातीस : डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून १५o किलो फळे प्रतिवर्ष मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठ्या आकाराच्या फळामुळे या जातीला मागणी जास्त आहे.

लागवड आणि निगा

लागवडीसाठी मे महिन्यात ६x६ मीटर अंतरावर ६ox६ox६0 सें.मी. आकाराचे खडे खोदावेत आणि पावसाळ्यापूर्वी चांगली माती, १ घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने ते भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी


५0 ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खडुष्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खडुष्यात एक वर्षांची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.

विशेषत: कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार द्यावा. आधार देऊन सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पादन देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पादन मिळू शकते. कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो. तो काढून टाकावा; अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते. लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे / रोपांना सावली करावी. बागेमध्ये साधारणत: १o टक्के नर झाडे लावावीत. लागवडीनंतर प्रत्येक झाडाला पहिली किमान दोन वर्षे १o लिटर प्रतिदिन ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.

खते

कोकमापासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पहिल्या वर्षापासून खते देणे आवश्यक आहे. खते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये द्यावीत. खताची मात्रा पहिल्या वर्षापासून त्याचप्रमाणात १० वर्षांपर्यंत वाढवावी आणि १० व्या वर्षी आणि पुढे तीच कायम ठेवावी. खताची मात्रा पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष शेणखत नाःत्र स्फुरद | पालाश

वर्ष शेणखत नत्र स्फुरद  पालाश
१ ले २ किलो १०० ग्रॅम ५० ग्रॅम
१० वे २० किलो १ किलो ५०० ग्रॅम

पिंक रोग

या बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीला पांढ-या रंगाचे गोलदार ठिपके पानांवर पडतात. अनेक फांद्यांना या रोगाची लागण झाल्यास फांद्या मरतात झालेला भाग कापून काढून त्यावर बोडॉपेस्ट लावावी.

काढणी, उत्पादन व उपयोग

कोकमामध्ये फळधारणा पाचव्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले लागतात आणि मार्च ते मे महिन्यामध्ये फळे तोडणीस तयार होतात. मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि बा उपयोग अमसुले (वाळवलेली रस लावलेली कोकम  साल) कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि अमृत कोकम (कोकम सरबत) इत्यादींसाठी फैं: केला जातो.

कोकमच्या बियांमध्ये घनस्वरुपातील तेल बटरचा उपयोग सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये,  क्रीममध्ये केला जातो. पूर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून १४0 ते १५o किलो फळे मिळतात.

विशेष सल्ला

  1. कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पादन वाढते. त्यामुळे त्याला नियमित खताची मात्रा द्यावी. खत दिल्यामुळे फळे नियमित मिळतात,
  2. कोकमच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी द्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास
  3. कोकमच्या झाडावरील मेलेल्या आणि कमकुवत फांद्या कापून नष्ट कराव्यात. मात्र, कोकममध्ये जमिनीकडे वाढणा-या (जिओट्रोपिक) फांद्यांवर फुले आणि फळे लागतात अशा फांद्या तोडू नयेत.
  4. कोकमच्या झाडाला फळे लवकर तयार होण्यासाठी डॉ. बाळासाहेबसावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे फळधारणा  झाल्यावर (जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात) ३ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (१३:०:४५) फवारणी करावी. पुन्हा ही फवारणी २० दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे फळे लवकर तयार होतात, प्रतदेखील सुधारते.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate