অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेरुसाठी फेरोमोन सापळे

फेरोमोन सापळ्यांचा वापर

पेरुच्या बागांमध्ये आयपीएम उपचार म्‍हणून फेरोमोन सापळ्यांचा वापर वाढवि‍ण्यासाठी शेतकरी सहभाग पध्‍दतीचा वापर करण्‍यात आला. इथेनॉल, मिथाईल युगेनॉल आणि मॅलाथिऑन 6:4:1 या प्रमाणात वापरुन फेरोमोनचे द्रावण तयार करण्यात आले. पाणी शोषून घेऊ शकणार्‍या लाकडाचे 2” X 2” आकाराचे तुकडे द्रावणामध्ये बुडवून ठेवले आणि प्लॅस्टिकच्‍या एका लहान बरणीत अडकवून बसविले. जारच्या वरच्या भागात विरुद्ध दिशांना प्रत्येकी 1.5 सेमी व्यासाची चार छिद्रे पाडली आणि बागेमध्ये दर एकरी एक याप्रमाणे हा सापळा लावला.

पहिल्या पिकाच्या हंगामाच्या 50-60% च्या तुलनेत फळांवरील माश्यांचे प्रमाण 10% कमी झाल्याचे आढळले. माश्यांसाठी वापरण्‍यात येणार्‍या कीटकनाशकांचे प्रमाणसुध्‍दा 80-90% कमी झाल्याचे आढळले.

फळांवरील माश्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे एक उत्तम वरदान

सध्या ह्याच्‍या प्रभावामुळे आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नोलॉजी (सायफेट) च्या प्रयत्नांमुळे हे तंत्रज्ञानाचा अवलंब अबोहर प्रदेशातील 1500 हेक्टर क्षेत्रफळामध्ये करण्‍यात आहे. पेरु लागवडीमध्ये फळांवरील माश्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे एक उत्तम वरदान ठरले आहे.

आकृती 1: फळांवरील माश्यांसाठी लैंगिक फेरोमोन जाळी

Pheromen.jpg

स्त्रोत: CIPHET, लुधियाना

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate