অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोर

बोर

    प्रस्तावना
  • जमीन
  • हलकी ते मध्यम

  • जाती-
  • उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण

  • लागवडीचे अंतर –
  • ६.० X ६.० मीटर

      अभिवृद्धी –

    डोळे भरणे

  • खते –
  • शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम

    पालाश प्रति झाड प्रति वर्ष नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.

    छाटणी –

    बोरांची छाटणी ६० सेमी पर्यंत मुख्य खोड ठेवून ४ ते ६ दुय्यम फांद्या ठेवून छाटणी एप्रिल व मे महिन्यात करावी. खुंटावरील फुट वेळोवेळी काढावी.

      किड व रोग नियंत्रण
  • फळे पोखरणा-या अळी
  • बोरीवर फळे पोखरणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी केनव्हरलेट, २० ई.सी. ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ ई.सी ७ मिली किंवा कार्बारील ५० %, २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

     

  • पाने कुरतडणारी अळी
  • पाने कुरतडणारी अळीच्या नियंत्रणासाठी कार्बारील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

     

  • भूरी
  • बोरीवरील भूरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणा-या गंधकाची २० ग्रॅम १० लीटर पाण्यात फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दर ७ ते ८ दिवसाचे अंतराने वरील प्रकारच्या सात फवारण्या कराव्यात.

     

    माहिती स्रोत : कृषि विभाग महाराष्ट्र शासन

    अंतिम सुधारित : 7/3/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate