অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृगबहार घेण्यासाठी उपाययोजना

मृगबहार घेण्यासाठी उपाययोजना

1) संत्रा व मोसंबीचा मृग बहार हा पूर्णपणे पावसामुळे फुटत असतो. या वर्षी बहुतेक विभागांमध्ये पावसाची सरासरी 50 टक्के इतकीसुद्धा नोंदवली गेली नाही, त्यामुळे जूनअखेर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले, तसेच हवेतील आर्द्रता 60 टक्‍क्‍यांच्या खाली राहिली.

2) मृग बहार चांगला येण्यासाठी जून महिन्याचे पर्जन्यमान 125 मिलिमीटर, उच्चतम तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 70 टक्के असणे गरजेचे आहे. ही पोषक हवामान स्थिती नसल्यामुळे या वर्षी बहुतांश संत्रा-मोसंबी बगीच्यांमध्ये मृग बहार फुटला नाही.

3) ज्या बागेमध्ये जून महिन्यामधील पावसांमुळे फूट सुरू झाली होती, त्या बागेमध्ये पुढे पावसात खंड पडल्यानंतर सिंचनाची व्यवस्था कमी असल्यामुळे हा बहर तग धरू शकला नाही.

4) काही बागांमध्ये फुले न येता नुसती पालवी फुटलेली आहे, तर काही बागांमध्ये अजून फुले-पालवी नाही अशी परिस्थिती आहे.

5) ज्या बागांमध्ये अजून फुले किंवा पालवी दोन्हींपैकी काहीही दिसत नाही, अशा बागांमध्ये अजूनही उशिरा आलेल्या पावसामुळे फुले येण्याची शक्‍यता आहे.

6) ज्या बागांमध्ये आलेला बहार गळून पडला आहे आणि केवळ पालवीच दिसत आहे. अशा बागांमध्ये चार 4 मिलि क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (सीसीसी) या रसायनाच्या (2000 पीपीएमच्या 50 टक्के तीव्रता) प्रतिलिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात.

7) या उपाययोजनेमुळे ऑगस्ट महिन्यात मृग बहार फुटण्यास पोषक स्थिती झाडांमध्ये निर्माण होईल आणि समाधानकारक मृग बहार येऊ शकेल.

संपर्क -
- डॉ. मिलिंद लदानिया
डॉ. अंबादास हुच्चे - 07588006118
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर
--------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate