অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिंबूवर्गीय फळपिकातील फळगळीचे व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळझाडांवर फुले येण्याची प्रक्रीया ,फलधारणा , फळगळ व झाडावर फळे टिकून राहण्याची क्षमता हि निरनिराळ्या नैसर्गिक व वनस्पतीशास्त्रीय घटकांवर  अवलंबून असते. व्यापारी तत्वांवर लागवड करण्यात येणाऱ्या  बहुतांश फळझाडांवर सुमारे एक ते दोन लाखांपर्यंत फुले येतात. परंतु यापैकी केवळ १ ते २ टक्के फुलेच केवळ पूर्णत: परिपक्व फळांमध्ये रुपांतरित होतात. उरलेली फुले व फळे निरनिराळ्या अवस्थांमध्ये आढळून आले आहे की, एकूण गळलेल्या फळांपैकी ७० ते ८३ टक्के फळे वनस्पतिशास्त्रीय कारणांमुळे, ८ ते १७ टक्के फळे कीटकांमुळे आणि ८ ते १० टक्के फळे रोगांमुळे गळून पडतात.आंबिया बहारातील पिकात ही फळगळ प्रामुख्याने खालीलप्रमाणे तीन अवस्थांमध्ये विभागली जाते.

अ) पहिल्या अवस्थेत फळधारणेनंतर लगेच मोठ्या प्रमाणात फळगळ होते व ही फळगळ नैसर्गिकरीत्या जास्त फुले येण्यामुळे व फळधारणा झाल्याने होत असल्यामुळे अटळ असते व झाडाच्या एकूण आरोग्यासाठी हितावह असते.

ब) दुस-या अवस्थेतील फळगळ ही प्रामुख्याने उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे (उन्हाळी फळगळ) होते. ही फळगळ विशेषत: उष्ण व कोरड्या हवामानात जास्त होते.

क) तिस-या अवस्थेतील फळगळ ही पूर्ण वाढ झालेल्या परंतु अपरिपक्व फळांची असते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसानकारक गणली जाते. यालाच तोडणीपूर्व फळगळ असे संबोधले जाते.

वरील अवस्थांपैकी फळधारणेनंतर होणा-या फळगळीमध्ये प्रामुख्याने पूर्णतः विकसित न झालेली फुले, पुरेशा परागसिंचनाअभावी गळलेली फुले तसेच अपुष्ट अंडबीजांपासून तयार झालेली फुले यांचा समावेश होतो. दुस-या अवस्थेत प्रामुख्याने अतिउष्ण तापमान व कोरड्या हवेमुळे तसेच पाण्याच्या सदोष व्यवस्थापनामुळे काही वेळा मोठ्या प्रमाणावर फळगळ होते व यावर नियंत्रण करणे अतिशय गरजेचे आहे अन्यथ: एकूण उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे तिस-या अवस्थेतील फळगळ ही फळांची वाढ पूर्ण झाल्यानंतर फुले पिकण्याआधी होत असल्यामुळे अतिशय नुकसानकारक ठरते. त्यामुळे पुढील तीन प्रकारे होणा-या फळगळीचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

वनस्पतिशास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ

फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ जरी वनस्पतिशास्त्रीय कारणांमुळे होत असली तरी मे व जून महिन्यात होणारी फळगळ ही प्रामुख्याने 'जून गळ' म्हणून ओळखली जाते. ही गळ फळे साधारणत: 0.५ ते २.0 सें.मी.व्यासाची असताना होते. वनस्पतिशास्त्रीय फळगळ

ही बहुतांशी वाढणा-या फळांमधील पाणी, कर्बोदके व संजीवके प्राप्त करण्यासाठीच्या स्पर्धेमुळे होते. याच दरम्यान पाण्याचा ताण व उच्च तापमानामुळे लहान फळे जास्त काळ तग धरून राहू शकत नाहीत. यामुळे फळवाढीच्या सुरुवातीच्या काळात जर | / तापमान ३५ ते ४0 अंश सें.ग्रे.व्या वर असेल व " पाणी व्यवस्थापन योग्य नसेल तर वनस्पतिशास्त्रीय फळगळ ही चिंतेचा विषय बनू शकते. उद्य तापमान व पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानाखालील स्टोमॅटांचे तोंड बंद होते व प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिणामत: वाढत्या फळांना कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो व फळांच्या देठातील पेशीक्षय झपाट्याने वाढतो व अशी फळे लवकर गळून पडतात. ही फळगळ कमी करण्यासाठी बागेत स्प्रिंक्लर्स बसविल्यास फायदा होतो. कर्बोदकांच्या व संजीवकांच्या असंतुलनामुळेसुद्धा फळगळ मोठ्या प्रमाणावर होते. फळवाढीच्या पूर्ण कालावधीत फळे झाडावर टिकून राहणे हे निरनिराळ्या कारणांवर अवलंबून असते. फळगळ होण्याआधी फळाच्या देठामध्ये गुंतागुंतीच्या वनस्पतिशास्त्रीय प्रक्रिया होत असतात ज्याला पेशीक्षय असे म्हणतात. साधारणत: वनस्पतीच्या अवयवाची निरोगी स्थिती, फळातील भूणाचा योग्य विकास, ऑक्सिजन या संजीवकांचा तसेच पाण्याचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा यामुळे फळे झाडावर पूर्ण वाढ व कार्बन-नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अतिआर्द्रता किंवा जमिनीत असणारा अतिशय जास्त ओलावा यामुळे फळगळ

झाडांची सुदृढता

फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे अत्यावश्यक आहे. जी फळे बहाराच्या सुरुवातीलाच पानेविरहित फांद्यांवर पोसली जातात त्यांची वाढ मंदगतीने होते व ती कमकुवत राहतात. याउलट जी फळे नवतीसोबतच्या फुलांपासून तयार होतात त्यांची वाढ जोमदार होते. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास ४० पाने असावी लागतात. झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी व पुढील पिकांवर होणारा प्रादुर्भाव ब-याच अंशी कमी होतो. या छाटणीमुळे सुप्तावस्थेतील कळ्यांपासून पालवी फुटण्यास मदत होते. नत्र फळांच्या वाढीसाठी (कार्बन - नत्राच्या संतुलनाचे महत्व) अनन्यसाधारण आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते.ऑक्सजन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया-अमोनिअम (NH - NH+) या संयुगाची मात्रा फळांच्या

सशक्त वाढीसाठी महत्वाची आहे. या संयुगांची मात्रा कृत्रिमरित्या युरियाची फवारणी केल्याने वाढवता येते.

कर्बोदके

कर्बोदकांच्या अभावाने पाने, फुले व फळे यांच्यात पेशीक्षय होतो. कर्बोदके पेशीक्षय दोन प्रकारे टाळू शकतात. कर्बोदकांच्या मुबलक उपलब्धतेमुळे पेशीभित्ती सशक्त होतात. त्याचप्रमाणे बीजांडाचे आवरण सशक्त होऊन भ्रूणाच्या वाढीला मदत होते व विकसनशील धुणातुन ऑक्सिजन संजीवकांचा स्राव सुरू राहतो व पेशीक्षय टाळण्यास मदत होते.

जमिनीतील आद्रता

अतिजास्त व अतिकमी पाण्याची परिस्थिती टाळली पाहिजे. पावसाळ्यात होणा-या सततच्या पावसाच्या पाण्याने जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायू कमी मिळतो. त्याचप्रमाणे पाण्याच्या अतिशय कमी उपलब्धतेमुळे फळांच्या सुरुवातीच्या वाढीवर वाईट परिणाम होतो व या फळांमध्ये पेशीक्षय लवकर दिसून येतो.

तापमान

फळगळीचे प्रमाण हे कमी तापमानात कमी असते व उद्य तापमानात जास्त असते. प्रदीर्घ काळाच्या उद्य तापमानामध्ये (४० अंश सें.ग्रे.पेक्षा जास्त) पाने, फुले व फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. लिंबुवर्गीय फळझाडांमध्ये होणारी जास्त फळगळ ही अतिशय उच्च तापमानामुळे व कोरड्या हवेमुळे होते. यासोबतच जर यांत्रिक इजा, अन्नद्रव्यांची मर्यादित उपलब्धता किंवा इतर प्रकारचा ताण यामुळेही पेशीक्षय लवकर होतो.

रोगामुळे होणारी फळगळ

लिंबूवर्गीय फळझाडांवर फळगळ प्रामुख्याने बोट्रीओडीप्लोडिआ थिओब्रोमि,कलेट्रोटीकम ग्लोंअीओस्पोरीऑइडस व काही अंशी आल्टरनेरीआ सीटी बुरशींमुळे होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. या बुरशींचे जिवाणू झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या जास्त असतील तर मोठ्या प्रमाणात पसरतात तसेच काही कीटकांच्या प्रादुर्भावामुळे जसे काळी माशी, मावा-तुडतुडे, त्यांच्या शरीरातून निघालेल्या शर्करायुक्त तरल पदार्थावर वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होतो व परिणामी फळगळ वाढते. या प्रकारची फळगळ १० टक्के वाळलेल्या फांद्या असलेल्या झाडावर २२ टक्क्यांपर्यंत होते.

कीटकांमुळे होणारी फळगळ

लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटकापैकी  प्रामुख्याने सिट्रस सिल्ला, सिट्रस बड माईटस् (अष्टपदी) या किडींमुळे फुले व लहान फळे गळून पडतात. याशिवाय देशाच्या पुर्वोत्तर भागात आढळणारी फळमाशी (Dacus dosals), रस शोषण करणारे पतंग हे दोन मुख्य कीटक लिंबुवर्गीय फळझाडांमध्ये प्रामुख्याने आढळून येतात. यांपैकी रस शोषण करणा-या पतंगाच्या सर्व जीवन अवस्था या इतर वनस्पतींवर होत असल्यामुळे या पतंगाचा बंदोबस्त करणे अतिशय जिकिरीचे काम आहे. हे पतंग संध्याकाळच्या वेळी परिपक्व फळांतील रसशोषण करतात व अशी फळे एक ते दोन दिवसात गळून पडतात. या प्रकारची फळगळ मध्य भारतात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होते. कधी कधी तोडणीपूर्व फळगळीपैकी ४० टक्के फळगळ या पतंगामुळे होते.

फळगळीचे नियंत्रण

काही कृत्रिम जैवसंजीवके उदा. २, ४ -डायक्लोरोफिनॉक्सि

अॅसेटिक अॅसिड (२, ४-डी), नॅफथंलीन अॅसेटीक अॅसिड (एन.ए.ए.), २, ४, ५- ट्रायक्लोरोफिनॉक्सि अंसेटिक ऑसिड (२, ४, ५-टी), जिबरेलिक ऑसिड (जी.ए.-३) वगेरे तत्सम रासायनिक संयुगे वनस्पतीतील अंतर्गत ऑक्सिजन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. अशी कितीतरी संयुगे लिंबूवर्गीय फळगळीच्या नियंत्रणासाठी वापरली गेली आहेत. लिंबूवर्गीय फळझाडांची फळधारणेनंतर होणारी फळगळ जरी नैसर्गिक व झाडाच्या सर्वसाधारण आरोग्यासाठी हितकारक असली तरी विपरित वातावरणाच्या तडाख्याने पूर्ण फळगळ होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता अांबिया बहाराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यात एन.ए.ए. हे संजीवक १० पी.पी.एम. (१ ग्रॅम प्रती १oo लीटर पाणी) + १.५ टक्के युरिया (१.५ किलो प्रती १oo लीटर पाणी) या प्रमाणात घेऊन फळे वाटाण्याएवढी असताना फवारणी करावी किंवा २, ४-डी १५ पी.पी.एम. किंवा जिबरेलिक आम्ल १५ पी.पी.एम् + बेनोमिल किंवा बाविस्टिन १000 पी.पी.एम + युरिया १ टका या मिश्रणाची प्रत्येकी एक फवारणी करावी. याच मिश्रणाच्या दोन फवारण्या पुन्हा एक महिन्याच्या अंतराने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तोडणीपूर्वी फळगळ रोखण्यासाठी कराव्यात. त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोगांमुळे होणारी गळ जास्त प्रमाणात निदर्शनास आल्यास बेनलेट किंवा बाविस्टिन या बुरशीनाशकांच्या एक ग्रॅम एक लीटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने तोडणीच्या साधारण दोन महिने आधीपासून कराव्यात. कीटकांमुळे होणा-या फळगळीत फुले येताना व फळधारणा होताना सिट्रस सिल्ला या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस १.२५ मि.ली. किंवा अॅसिफेट १.२५ ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रिड 0.५ मि.ली. एक लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

रसशोषण करणा-या पतंगाचे नियंत्रण

अ) विषारी आमिषाचे कंदील बगिच्यात ठेवावेत. यासाठी २० गॅम मॅलॉथिऑनची विद्राव्य भुकटी किंवा ५० मि.ली. डायझिनॉन + २०० ग्रॅम गूळ + ५० मि.ली. शिरका किंवा फळांचा रस दोन लीटर पाण्यात मिसळून प्रत्येक दोन कंदील किंवा दोन पसरट तोंडाच्या बाटल्यात वरील मिश्रण टाकून २५ ते ३0 झाडांच्या मध्ये ठेवाव्यात.

ब) पतंगाच्या नरांना आकर्षित करणारे ०.१ टक्के मिथाईल युजेनॉल आणि o.o५ टक्के मॅलॅथिऑन असलेले सापळे प्रती हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण दोन महिने आधीपासून ठेवावेत.

फळगळ नियंत्रणासाठी काही खबरदा-या

  1. फळांना पुरेसे पोषण मिळण्यासाठी पालवी राहावी म्हणून शिफारशीनुसार अन्नद्रव्यांचा वापर करावा.
  2. तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्याची छाटणी करावी.
  3. पावसाळ्यात बगिच्यात पाणी साठून देऊ नये.
  4. बागेत गळून पडलेली फळे ताबडतोब उचलून दूर फेकून द्यावीत किंवा कंपोस्ट खडुष्यात पुरून टाकावीत.
  5. २, ४-डी व जिबरेलिक आम्ल रसायने पाण्यात पूर्णपणे विद्राव्य नसल्यामुळे ही रसायने आधी ४० ते ५० मि.ली. अल्कोहोल किंवा ऑसिटोनमध्ये विरघळून घ्यावीत.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate