অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा बागांचे पुनरुज्जीवन

सध्या अस्तित्वात असलेल्या संत्रा बागांपैकी  फारच कमी बागा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या आढळतात . संत्रा बागेचे खते व पाणी देण्यास तसेच किडी रोगाच्या नियंत्रणाचे  व्यवस्थापन फारच कमी  बागायतदार  करतात. त्याला अनेक  कारणे  कारणीभूत असली तरी तांत्रिक  माहितीचा चा अभाव हे एकप्रमुख  कारण आहे. यामुळे बहुतांशीं संत्र्याच्या बागांचा -हास द्हा  अपेक्षित उत्पादन देण्यापूर्वीच झालेला पहावयास मीळतो. याची प्रमुख कारणे म्हणजे लागवडीसाठी अयोग्य जमिनीची  व कलमांची निवड, ओलितासाठी पाण्याची कमतरता, भारतीय दृष्टीकोनातून खताचे, पाण्याचे व किडीचे  व्यवस्थापन करण्याचा अभाव, मृगबहार  येण्यासाठी वाजवीपेक्षा  जास्त ताणदेण्याची  प्रवृत्ती, झाडावरील  रोगट, वाळलेल्या फांद्या, सल न काढण्याच वृत्ती, पणी व खते देण्याची चुकीची पद्धत, बागेच्या  सुरुवातीच्या काळात ज्वारी, कपाशी इत्यादिसाठी आंतरपिक घेण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती रोग आणि किडी  नियंत्रणाकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळं संत्र्याच्या  झाडापासून अपेक्षित चांगल्या प्रतीचं उत्पादन मीळत नाई व बागेचा अल्पावधीत ऱ्हास होतो.

संत्रा बागा सलाटण्याची कारणे

अयोग्य भारी जमिनीमध्ये संत्र्याची झालेली लागवड , अन्नद्रव्यची कमतरता , अयोग्य ओलीत व्यवस्थापन ,मशागतीचा अभाव आणि बुरशीजन्य रोगाचा (फायटोप्थोरा ) प्रादुर्भाव इत्यादीमुळे काही ठिकाणी योग्य जमिनीमध्ये लावलेल्या संत्रा बागासुधा खालावलेल्या किंवा ऱ्हास होण्याच्या स्थितीत आहेत. या वयस्क , सलाटलेल्या आणि ऱ्हास होणाऱ्या संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचे प्रत्याक्षित काही बागायतदारांच्या संत्रा बागेत सुधा  घेतले आणि त्याचे निष्कर्ष फार उत्तम मिळाले.

प्रतिबंधात्मक उपाय

  1. अयोग्य  भारी, खोल , पाण्याचा योग्य निचरा न होणा-या जमीनीत लागवड करू नये.
  2. ताण देण्याचा  कालावधी हा जमिनीच्या मगदुरानुसार व झाडाचे क्षमतेनुसारच द्यावा. अतिरिक्त ताण देऊ नये.
  3. रंगपूरकिंवा जंबेरी खुंटावरील कलमे निवडावीत.
  4. ओलिताच्या पाण्याचा खोडाशी होणारा  संपर्क टाळावा.
  5. आळ्यामध्ये  पाणी साचू देऊ नये अतिरिक्त  पाण्याचा निचरा होण्याकरिता उताराच्या  दिशेने चर काढावे .
  6. शिफारशीनुसार एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य  व्यक्स्थापन करावं.
  7. कीड व रोगांचे  वेळीच नियंत्रण करावं.
  8. झाडाच्या वयानुसार व ताकदीनुसार झाडावर फळांची संख्या [७०० , ते ९०० ) राखावी . झाडाच्या  शक्तीपेक्षा  जास्त फळधारणा झाल्यास सल येण्याचे प्रमाण वाढते .

संत्र्याच्या जुन्या बागेचे पुनरुज्जीवन करण्याकरिता उपाय

झाडाची छाटणी

जून महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात ( पाऊस सुरु होण्यापूर्वी ) झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या ओल्या (हिरव्या) भागापासून १ इंच अंतरापासून छाटून टाकाव्यात. मध्यम व मोठ्या फांद्या अरीने छाटाव्यात  तसेच हिरव्या फांद्या सुधा शेंड्यापासून ४५ से.मी. लांब अंतरावर छाटाव्यात

बोर्डो मलम लावणे

छाट दिलेल्या भागावर बोर्डो मलम (१:१:१०)लावावा. तसेच झाडाच्या मुख्य खोडास (बुंधा ) बोर्डो मलम लावावा व कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.

खत व्यवस्थापन

छाटनीनंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत +७.५ किलो निंबोळी ढेप झाडाच्या घेराखाली मातीत मिसळून द्यावे . ऑक्टोबर महिन्यात ५०० ग्रॅम नत्र + ५०० ग्रॅम स्फुरद द्यावे .

ओलीत व्यवस्थापन

झाडाच्या गरजेपुरते ओलीत करावे . ओलीताकरिता दुहेरी अळे पद्धतीचा अवलंब करावा तसेच ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत केल्यास ३० टक्के पाण्यात बचत होऊन उत्पादन उत्तम प्रतीचे मिळते.

छाटणीचे फायदे

  1. संत्र झाडावर जोमदार फांद्यांची वाढ होते. पानाचा आकार मोठा होतो आणि पानाचा रंग गेर्ड हिरवा होऊन चकाकी येते.
  2. संत्र्यांची फळे मोठ्या आकाराची उत्तम प्रतीची मिळतात . फळे पातळ सालाची, घट्ट , बत्तीदार , चमकदार आणि एकसारख्या आकाराची मिळतात व या फळांना बाजारात भरपूर भाव मिळतो.
  3. प्रत्येक झाडावर साधारणतः ७०० ते १२०० पर्यंत फळे येतात.
  4. फलधारणा झाडाच्या पेट्यात होते. त्यामुळे फांद्या व झाडाला बाबूंचा आधार देण्याची गरज नसते. तसेच फलधारणा योग्य प्रमाणात होत असल्यामुळे फांद्या तुटण्याची भीती नसते.
  5. छाटणी केलेल्या झाडाला दरवर्षी बहार नियमित येतो.
  6. झाडाचे आयुष्यमान ५ ते ७ वर्षाने वाढते आणि अधिक उत्पादन मिळते
  7. संत्रा झाड सशक्त, जोमदार, निरोगी व दीर्घायुषी बनते.

छाटणीकरिता लक्षात ठेवण्याच्या आवश्यक बाबी

  1. संत्रा झाडाची छाटणी एकदाच जून महिन्यात करावी, छाटणी दरवर्षी करू नये.
  2. छाटणी केल्यानंतर पहिल्या वर्षी मृग आणि आंबिया बहार येतो.
  3. छाटणी केलेल्या संत्रा बागेची निगा शिफारस केल्याप्रमाणे खत व्यवस्थापन, ओलीत व्यवस्थापन आणि कोड व रोगाच्या नियंत्रणाद्वारे वेळीच करावे.
  4. छाटणी ही वयस्क १८ ते २० वर्ष वयाच्या झाडाचीच करावी. तरुण संत्रा झाडाची छाटणी करू नये.

सलाटलेल्या बागांचे पुनरुजीवन करण्याकरिता उपाय

  1. वाळत असलेल्या संत्रा झाडाच्या हिरव्या फांद्या ३o ते ४५ सें.मी. शेंड्यापासून सिकेटरच्या साहाय्याने छाटाव्यात.
  2. वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग २ ते ३ सें.मी. घेऊन छाटावा. छाटणी करताना प्रत्येकवेळी सेकेटर काबॅन्डॅझिमच्या द्रावणात बुडवावी.
  3. छाटणी केल्यानंतर लगेच १ लीटर पाण्यात १ ग्रॅम काबॅन्डॅझिम टाकून फवारणी करावी. मोठ्या फांद्या छाटल्या असतील तर त्या ठिकाणी त्वरित बोडॉपेस्ट लावावी.
  4. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्यात व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि वाफा ५ ते ७ दिवस उघडा ठेवावा.
  5. एक लीटर पाण्यात २ ग्रॅम मेटॅलेक्झील एमझेड किंवा फोसीटील एल टाकून त्याचे १० ते २0 लीटर द्रावण झाडाच्या वयानुसार खोदलेल्या वाफ्यात टाकावे. ६) प्रती झाडास ५० किलो शेणखत + ७.५ केिली निंबोळी ढेप + १ किलो अमोनियम सल्फेट +
  6. १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १/२ किलो म्युरेट ऑफ पोटेंशचे मिश्रण टाकावे व खोदलेले वाफे मातीने चांगले झाकावेत. सेंद्रिय खतासोबत ट्रायकोडम व्हर्जीयान्म + ट्रायकोडर्मा व्हरीडी + सुडोमोनोस फ्लोरोसन्स 100 ग्रेम प्रती झाड़ टाकावे.
  7. १५ दिवसांनी पुन्हा ०.६ टक्के बोडॉमिश्रणाचे (६:६:१oo) २0 लीटर द्रावण वाफ्यात शिंपडावे.
  8. या बोडॉमिश्रणाची झाडावरसुद्धा फवारणी करावी.
  9. झाडाच्या बुध्याला १ मीटर उंचीपर्यंत बोडॉमलम लावावा.
  10. साल खाणा-या अळीच्या नियंत्रणाकरिता झाडावरील अळीने खालेला भाग साफ करून छिद्रात तार टाकून छिद्रे मोकळी केल्यानंतर त्या छिद्रात पिचकारीच्या साहाय्याने केरोसीन किंवा पेट्रोल किंवा कीटकनाशक द्रावण सोडावे व छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate