सीताफळ लागवड ही हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीवर करावी. लागवडीसाठी 5 मीटर x 5 मीटर अंतरावर 45 सें.मी. x 45 सें.मी. x 45 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
खड्ड्यात तळाशी पालापाचोळा टाकावा. मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून खड्डा भरावा. लागवडीसाठी बाळानगर, टी.पी.- 7, दौलताबाद, धारूर- 6, धारूर-3,अर्का सहान या जातींची निवड करावी.
सुरवातीची दोन वर्षे सीताफळ बागेत कांदा, काकडी, मूग, चवळी, सोयाबीन यांसारख्या पिकांची लागवड करता येते.
अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (02426- 243247) किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (02452- 229000) या ठिकाणी संपर्क साधावा.
स्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...