Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/01/22 17:29:57.451045 GMT+0530
शेअर करा

T3 2018/01/22 17:29:57.456357 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/01/22 17:29:57.484467 GMT+0530

डेझी पिकाची लागवड

पिवळी डेझी (गोल्डन रॉड) या फुलांचे लांब दांडे असतात. दांड्यांवर असंख्य छोट्या, गोल, पिवळसर-हिरव्या कळ्या व नाजूक, छोटी, उमललेली पिवळी फुले असतात.

1) लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी 15 टन कुजलेले शेणखत मिसळावे, त्यानंतर लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड करता येते.

2) याची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारे करण्यात येते. फुटव्यांची लागवड 30 x 30 सें.मी. किंवा 50 x 50 सें.मी. अंतरावर करावी. सरीत लागवड करताना 45 ते 50 सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर 30 सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत. मुनवे आणताना ते गोणपाटात गुंडाळून आणावेत आणि लगेच शेतात लावावेत.

3) जास्त दाट लागवड केल्यास कालांतराने मुनव्यांची दाटी होते व रोपे व्यवस्थित वाढत नाहीत. अशा खुरटलेल्या वाढीवर लहान, कमी उंचीचे फुलदांडे येतात. अशा लहान दांड्यांना बाजारात फारशी मागणी नसते. सुरवातीला तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. कालांतराने रोप वाढून सर्व जागा व्यापते व त्यामुळे तण फारसे वाढत नाही; मात्र रोपाभोवती येणारे मुनवे वेळोवेळी काढावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत व इतर काढून टाकावेत. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

4) रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्‍टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी. लागवडीनंतर दहा दिवसांनी पाच किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम प्रति 50 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग प्लॅस्टिकच्या कागदामध्ये आठवडाभर झाकून ठेवावा. पाच किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रति 50 किलो शेणखतात वेगवेगळे ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. याचबरोबरीने पाच किलो ट्रायकोडर्मा 50 किलो शेणखतात वेगवेगळे ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. आठवड्यानंतर तीनही ढीग एकत्र करून हे मिश्रण एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. दर चार महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी.

5) लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत. दांड्याच्या खालील भागातील फुले उमलण्यास सुरवात झाल्यावर तुरे दांड्यासहित तोडावीत. दांडा जमिनीपासून खोडावर चार डोळे ठेवून कापावा. दांडा काढण्यासाठी चाकू किंवा सिकेटर वापरावे. काढलेल्या दांड्याचे कापलेले टोक पाण्यात बुडवून ठेवावे. दोन तासांनंतर दांडे काढून त्यांचे बंडल तयार करावे. एका बंडलमध्ये 10-12 काड्या बांधाव्यात.

संपर्क - 020- 25693750

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.9756097561
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2018/01/22 17:29:57.675525 GMT+0530

T24 2018/01/22 17:29:57.681579 GMT+0530
Back to top

T12018/01/22 17:29:57.362618 GMT+0530

T612018/01/22 17:29:57.381351 GMT+0530

T622018/01/22 17:29:57.440640 GMT+0530

T632018/01/22 17:29:57.441494 GMT+0530