অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उसावरील रोग नियंत्रण

उसावरील रोग नियंत्रण

ऊस पिकावर बुरशी, सूक्ष्मजंतू, अतिसूक्ष्म विषाणू, सूत्र कृमी, अन्नद्रव्याची कमतरता, परोपजीवी वनस्पती यामुळे रोग होतात.  आपल्याकडे जवळजवळ ३० रोगांची नोंद झालेली आहे.  उसावर बेण्याद्वारे काणी, गवताळ वाढ, खोड-कुजव्या, पांगशा फुटण, मोझॅक, वाढ खुंटण, ऊस रंगने इत्यादी रोग येतात.  तर हवेद्वारे पसरणारे रोग म्हणजे पोक्का बोंग,  तांबेरा,  पानावरचे ठिबके आणि जमिनिद्वारे पसरणारे रोग म्हणजे अननस ( पाईनॅपल ) कांडी – कुज, मुळकुज  आणि मर.

  • उसावरची काणी – चाबूक काजळी हा रोग सर्वांना परिचित आहे.  अशी चाबूक काणी प्लास्टिकच्या पोत्यात काढून घेवून ते सर्व बेत मुळासह उपटून जाळून टाकाव,  बेण्यास उष्णजल प्रक्रिया करावी.  तसंच १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०० लिटर पाण्यात कांडीप्रक्रिया करावी.  रोगप्रतिकारक ६७१, ८६०३२, ९४०१२ या जाती लावाव्यात.
  • गवताळ वाढ हाही रोग परिचित आहे.  ऊस बेत मुळासकट उपटून जाळून टाकाव.  रोगमुक्त बेण लावाव.  उष्णजल प्रक्रिया करावी.  रसशोषणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा.
  • ऊसावरचा तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे.  संपूर्ण पान ताम्बेरायुक्त होते.  ८६०३२ सारखी प्रतिकारक जात लावावी.  रोगग्रस्त वाळलेली पान काढून जाळून टाकावीत.
  • उसाला लहानपणी पाण्याचा तान पडू देऊ नये.
  • पाण्याची दलदल होऊ देऊ नये.  तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ४५, ३ ग्रॅम + १
  • लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवाराव.
  • उसवाराचा पोक्का बोंग हवेतल्या बुरशीमुळे होतो.  आर्द्रता आणि कमी तापमानात याचा प्रादुर्भाव वाढतो.  पान कुजल्याने, गुरफटल्याने कांड्यांचे पोषण न होता वेड्यावाकड्या आणि आखूड होतात.
  • शेंदेकुज + पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत. २ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवाराव.
  • उसवाराचा पोक्का बोंग हवेतल्या बुरशीमुळे होतो.  आर्द्रता आणि कमी तापमानात याचा प्रादुर्भाव वाढतो.  पण कुजल्याने, गुरफटल्यामुळे कांड्यांचे पोषण न होता वेड्यावाकड्या आणि आखूड होतात.
  • शेंडेकुज + पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत.  २ ग्रॅम कॉपर  ऑक्झिक्लोराईड + लिटर पपांनी यांचे मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवारावे.
  • दलदल होऊ देवू नये. खतमात्रा योग्यवेळी द्याव्यात.
  • उसाच्या कुजलेल्या कांड्यांचा अनानासासारखा वास येतो.  कार्बेन्ड्झिम + मेलेथियानची बेणेप्रक्रिया करावी.  जमीन निचऱ्याची असावी.  मोठी बांधणी चांगली करावी.  ऊस लोळणार नाही याची काळ्जी घ्यावी. १ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाणी याचं मिश्रण फवाराव.
  • उसावर मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.  बेण निरोगी असाव.  निचऱ्याची जमीन असावी.  कार्बेन्ड्झिम + मेलॅथीयानची बेनेप्रक्रिया करावी.  कांडी पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस एकरी २ लिटर + २०० लिटर पाणी याचं मिश्रण फवारावे.
  • पानावरच्या ठिपक्यांच्या रोगामुळे पान करपून वाळतात.  ३ ग्रॅम मॅकोझेब + १ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ – ३ वेळा फवारावे.
  • उसवरचा केवडा विशेषतः खोडव्यात केवडा दिसतो.  १० किलो फेरस – सल्फेट अगर झिंक  सल्फेट शेणखतातून जमिनीत द्यावे.  एकरी ५०० ग्रॅम फेरस सल्फेट + ५०० ग्रॅम झिंक  सल्फेट + २.५ किलो युरिया + १०० लिटर पाणी या मिश्रणाच्या २ – ३ फवारण्य १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.  उसवरच्या या नुकसानकारक रोगाव्यातिरिक्त पांगशा फुटणे, मोझॅक, करपा, पिवळसर ठिपके, तपाकीरी ठिपके, वाढ खुंटणे, पानावरचे पिवळे पट्टे, मूळ कुजव्या, इ.  रोगांचाही प्रादुर्भाव होतो.  त्याचं वेळीच नियंत्रण कराव.  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून – हंगामनिहाय जातनिहाय उसाची लागवड करावी.
  • बेणेमळ्यातील रोगमुक्त बेण वापराव.
  • लागण कोरड्यात करावी.
  • ट्रायकोडर्माचा अवश्य वापर करावा.
  • पिकाची फेरपालट करावी.
  • खोडव्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.
  • पाणी – व्यवस्थापन – खत – व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं म्हणजे उसाच निरोगी उत्पादन मिळू शकेल.
  • बाविस्टीन १०० ग्रॅम + ३०० मि. लि. मेलेथियान + १०० लिटर पाणी यांची बेणेप्रक्रिया करावी.

 

स्‍त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्‍हाद यादव

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate